ठाकरे गटाच्या नेत्याच्या कारचा भीषण अपघात, गाडीचा चेंदामेदा

रायगडमधून एक मोठी, महत्वाची बातमी समोर आली आहे. ठाकरे गटाच्या नेत्याचा कारचा भीषण अपघात झाला आहे. सुदैवाने अपघातात कोणतीही जीवितहानी झालेली नाही. शिवसेना उबाठा गटाचे नेते, रायगड लोकसभा मतदार संघाचे समन्वयक संजय कदम यांच्या कारला ट्रकने मागून जोरदार धडक दिल्याने हा अपघात झाला.

ठाकरे गटाच्या नेत्याच्या कारचा भीषण अपघात, गाडीचा चेंदामेदा
Follow us
| Updated on: Apr 22, 2024 | 12:33 PM

रायगडमधून एक मोठी, महत्वाची बातमी समोर आली आहे. ठाकरे गटाच्या नेत्याचा कारचा भीषण अपघात झाला आहे. सुदैवाने अपघातात कोणतीही जीवितहानी झालेली नाही. शिवसेना उबाठा गटाचे नेते, रायगड लोकसभा मतदार संघाचे समन्वयक संजय कदम यांच्या कारला ट्रकने मागून जोरदार धडक दिल्याने हा अपघात झाला. संजय कदम हे प्रचार सभा आटोपून मुंबईच्या दिशेने येत असताना हा अपघात झाला. सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी झआली नाही, वा कोणी जखमीही झाले नाही. मात्र कारचे यात बरेच नुकसान झाले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, संजय कदम हे शिवसेना उबाठा गटाचे रायगड लोकसभा मतदार संघाचे समन्वयक आहेत. रायगड जिल्ह्यातील रोहा येथुन प्रचार सभा आटोपून ते मुंबईला परत जात होते. रात्रीच्या सुमारा मुंबई-कुर्ला मार्गावर त्यांच्या कारला आयशर ट्रकने मागून जोरदार धडक दिली. त्यामध्ये कारच्या मागच्या बाजूचा अक्षरश: चेंदामेंदा झाला आहे. या अपघाताचा माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळ गाठून तपास सुरी केला. कारला धडक देणारा आयशर ट्रक पोलिसांनी ताब्यात घेतला आहे.

या अपघातामध्ये कारचे मोठे नुकसान झाले असले तरी संजय कदम आणि कारमधील इतर कोणालाही दुखापत झालेली नाही. सर्वजण सुखरूप आहेत.

नाना पटोले यांच्या कारलाही झाला होता अपघात

काही दिवसांपूर्वी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या गाडीला भीषण अपघात झाला होता. 9 एप्रिल रोजी भंडारा जिल्ह्याच्या प्रचार दौ-यावर असताना मंगळवारी रात्री कारदा गावाजवळ पटोले यांच्या कारला एका ट्रकने जोरदार धडक दिली. सुदैवाने या अपघातात कोणीही जखमी झालं नाही. कारला धडक बसली तेव्हा कारमधील सर्वजण खाली उतरल्याने कोणालाच इजा झाली नाही. मात्र यामध्ये कारचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालं . नाना पटोले हे या अपघातामधून थोडक्यात बचावले आहेत. अपघाताची माहिती मिळातच पोलिसांनी तत्काळ घटनास्थळ गाठले आणि तपास सुरू केला.

मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?
मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?.
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?.
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.