संजय शिरसाट 72 मजल्यावर कसा पोहोचला?, सगळी लफडी बाहेर काढतो; चंद्रकांत खैरे यांचा इशारा

लोकसभा निवडणुकीचं रण तापलेलं असताना संभाजीनगरमध्ये मात्र आरोपप्रत्यारोपाच्या तोफा धडधडताना दिसत आहेत. ठाकरे गटाचे चंद्रकांत खैरे आणि शिंदे गटाचे संजय शिरसाट आमनेसामने आले आहेत. संजय शिरसाट यांच्या टीकेला उत्तर देताना खैरे यांनी त्यांचा एकेरी शब्दात उल्लेख केला. संजय शिरसाट यांची सर्व लफडी बाहेर काढतो, असा इशाराही त्यांनी दिला आहे.

संजय शिरसाट 72 मजल्यावर कसा पोहोचला?, सगळी लफडी बाहेर काढतो; चंद्रकांत खैरे यांचा इशारा
Follow us
| Updated on: May 01, 2024 | 3:05 PM

ठाकरे गटाचे उमेदवार चंद्रकांत खैरे यांनी यांनी शिवसेना आमदार संजय शिरसाट यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला आहे. हा हल्लाबोल करताना खैरे यांनी शिरसाट यांचा एकेरी उल्लेख केला. संजय शिरसाट यांची सगळी लफडी बाहेर काढतो. 72 मजल्यावर कसा गेला ते पाहतो. आता त्याला सोडणार नाही. त्याच्यासाठी मी अडीच हजार फोन केले, तेव्हा तो निवडून आला. आता तो मस्तीत आला आहे. भुमरेकडे काय मिळेल ते काढून घेण्यासाठी गेला आहे, अशी जोरदार टीका चंद्रकांत खैरे यांनी केली आहे.

चंद्रकांत खैरे यांनी मीडियाशी संवाद साधताना हा हल्लाबोल केला आहे. संजय शिरसाट गद्दार आहेत. त्यांच्याकडे अमाप पैसा आला आहे. त्यामुळे ते दादागिरी करत आहेत, अशी टीका चंद्रकांत खैरे यांनी केली. आपण आपल्या धर्माचा आदर आणि पूजा पाठ केला पाहिजे. भाईचारा पाळला पाहिजे. दंगली होता कामा नये. सर्वांनी प्रेमानं राहिलं पाहिजे. आता या वक्तव्यावर काही बोलू नका. आता निवडणूक आहेत. पुन्हा तेच दिवसभर चालत राहतं. धर्म पाळला की संसार शांततेत चालतो, असंही खैरे म्हणाले.

10 मे रोजी उद्धव ठाकरे संभाजीनगरमध्ये

6 मेला आदित्य ठाकरे आणि 10 मे रोजी उद्धव ठाकरे यांची सभा होणार आहे. सध्या खूप धावपळ सुरू आहे, असंही ते म्हणाले. दरम्यान, उद्धव ठाकरे यांची सभा होणार असल्याने या सभेकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. या सभेत उद्धव ठाकरे काय बोलतात याकडे राजकीय निरीक्षकांचं लक्ष लागलं आहे.

तो दिवस लवकर यावा

दरम्यान, बेळगाव संयुक्त महाराष्ट्रात समाविष्ट करा अशी मागणी चंद्रकांत खैरे यांनी केली आहे. अनेकांनी बलिदान दिले, त्यामुळे आजचा दिवस पाहायला मिळाला हा महत्वाचा दिवस आहे. त्यामुळे संयुक्त महाराष्ट्र झाला पाहिजे. भाषेच्या अनुषंगाने राज्यांची निर्मिती झाली. बेळगाव, बिदर, असे अनेक भाग मराठी भाषिक भाग आहेत. त्यामुळं ते महाराष्ट्रात आला पाहिजे. त्यासाठी अनेक वेळा मागणी करण्यात आली. बाळासाहेब ठाकरे यांनी देखील त्याबाबत लढा दिला. तो दिवस लवकर यावा ही इच्छा आहे, असंही ते म्हणाले.

तुमच्य़ा राजकारणात आम्हा कलाकारांना का ओढता? प्राजक्ता माळी यांचा सवाल
तुमच्य़ा राजकारणात आम्हा कलाकारांना का ओढता? प्राजक्ता माळी यांचा सवाल.
'...यातून न्याय मिळाला नाहीत तर...,' काय म्हणाले संभाजीराजे छत्रपती
'...यातून न्याय मिळाला नाहीत तर...,' काय म्हणाले संभाजीराजे छत्रपती.
Beed Morcha: दोन तारखेच्या आधी अटक करा, अन्यथा... - बंजरंग सोनावणे
Beed Morcha: दोन तारखेच्या आधी अटक करा, अन्यथा... - बंजरंग सोनावणे.
'पंकूताई...वाट वाकडी करुन...,' काय म्हणाले सुरेश धस
'पंकूताई...वाट वाकडी करुन...,' काय म्हणाले सुरेश धस.
डॉ. मनमोहन सिंग यांना अखेरचा निरोप, शासकीय इतमामात अंत्यसंस्कार
डॉ. मनमोहन सिंग यांना अखेरचा निरोप, शासकीय इतमामात अंत्यसंस्कार.
Beed Morcha : सत्य महत्वाचं असते, सत्ता नाही...काय म्हणाले बच्चू कडू
Beed Morcha : सत्य महत्वाचं असते, सत्ता नाही...काय म्हणाले बच्चू कडू.
सरपंच देशमुख हत्या प्रकरणात न्यायासाठी मोर्चा सुरु, मुंग्यासारखी गर्दी
सरपंच देशमुख हत्या प्रकरणात न्यायासाठी मोर्चा सुरु, मुंग्यासारखी गर्दी.
18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?
18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?.
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती.
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल.