ठाण्यातील मुंब्रा इथं इमारतीच्या प्रवेशद्वाराजवळील भाग खचला, 40 खोल्या सुरक्षेच्या कारणास्तव सील
ठाण्यातील मुंब्रामध्ये ठाकूरपाडा नजिक असलेल्या 8 मजली स्वस्तिक इमारतीतील 40 खोल्या सुरक्षेच्या कारणासाठी सील करण्यात आल्या आहेत. इमारतीच्या गेट समोर नाल्याच्या बाजूला मोठं भगदाड पडल्यामुळे या इमारतीतील नागरिकांना सुरक्षित ठिकाणी नेण्यात आलं.
ठाणे : राज्यात मुसळधार पाऊस आणि महापुरामुळे अनेक दुर्घटना घडत आहेत. भूस्खलन आणि दरड कोसळून रायगड, रत्नागिरी आणि सातारा जिल्ह्यात 100 पेक्षा अधिक नागरिकांचा जीव गेला आहे. अशावेळी ठाण्यातील मुंब्रामध्ये ठाकूरपाडा नजिक असलेल्या 8 मजली स्वस्तिक इमारतीतील 40 खोल्या सुरक्षेच्या कारणासाठी सील करण्यात आल्या आहेत. इमारतीच्या गेट समोर नाल्याच्या बाजूला मोठं भगदाड पडल्यामुळे या इमारतीतील नागरिकांना सुरक्षित ठिकाणी नेण्यात आलं. रात्री 830 च्या सुमारास ही घटना घडली आहे. त्यानंतर पोलीस, आपत्ती व्यवस्थापन पथक आणि अग्निशमन दल घटनास्थळी दाखल झालं होतं. (entrance to the Swastika building at Mumbra in Thane was destroyed)
मुंब्रा इथं स्वस्तिक इमारतीच्या प्रवेश द्वाराजवळील भाग खचल्याने एकच खळबळ उडाली आहे. ठाकूरपाडामधील स्वस्तिक इमारत ही एका मोठ्या नाल्याच्या बाजूला बांधली गेल्याने इथल्या रहिवाशांच्या डोक्यावर नेहमीच टांगती तलवार होती. केवळ 10 वर्ष जुन्या असलेल्या या आठ मजली इमारतीत तब्बल 40 फ्लॅट्स आहेत. काल रात्री अचानक अचानक या इमारतीच्या प्रवेश द्वारासमोरील भाग खचला. त्यामुळे एकच गोंधळ उडाला. इमारतीला असलेला धोका पाहता घटनास्थळी पोहोचलेल्या ठाणे महापालिकेच्या आपत्ती व्यवस्थापन कक्षाचे जवान आणि अग्निशमन दलाच्या जवानांनी सर्व रहिवाशांना सुखरूप बाहेर काढले. या सर्वांना जवळच्या महापालिका शाळेत ठेवण्यात आलं आहे. ही संपूर्ण इमारत सील करण्यात आली आहे.
स्वस्तिक इमारतीमध्ये राहणारे 69 कुटुंब, कोकण नागरी इमारती मधील 63 कुटुंब आणि जयराम भगत चाळीत राहणाऱ्या 7 कुटुंबाला जवळच्या महापालिका शाळेत ठेवण्यात आलं आहे. आपत्ती व्यवस्थापन विभागाने ही संपूर्ण इमारत सील केली आहे. त्यानंतर खचलेल्या भागत दगड टाकण्यात आले आहेत.
ठाण्यात इमारतीची भिंत कोसळली
19 जुलै रोजी ठाण्यात मुसळधार पावसामुळे एका इमारतीची भिंत कोसळून अनेक गाड्यांचं मोठं नुकसान झालं होतं. कॉसमॉस इमारतीची संरक्षक भिंत कोसळून पाच कार आणि पाच दुचाकींचं नुकसान झालं. सुदैवाने या घटनेत जीवितहानी टळली.
नेमकं काय घडलं?
ठाण्यातील घोडबंदर रोडवरील मानपाडा मुल्ला भागातील कॉसमॉस इमातीत ही दुर्घटना घडली. रविवारी रात्रीच्या सुमारास इमारतीची संरक्षक भिंत कोसळली. भिंतीचा ढिगारा पडून 5 चारचाकी आणि 5 दुचाकी वाहनांचे नुकसान झाले आहे. घटनास्थळी आपत्ती व्यवस्थापन, अग्निशमन दलाच्या पथकासह जेसीबी दाखल झाली. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही. मात्र गाड्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.
चेंबुर-विक्रोळीत मोठ्या दुर्घटना
याआधी, मुंबईतील चेंबुर आणि विक्रोळी या भागात पावसामुळेदोन मोठ्या दुर्घटना घडल्या आहे. चेंबूरमध्ये घरांवर संरक्षक भिंत कोसळल्याने 21 जणांना प्राण गमवावे लागले, आणि दोघे जखमी झाले. तर विक्रोळीत घरांवर दरड कोसळून दहा जणांचा मृत्यू झाला आहे.
Video : Satara Landslide : मुंडक्यापर्यंत चिखलात रुतली, अख्खी रात्र पावसात काढली, पाहा, आजी कशी वाचली?#SataraLandslide #SpecialReport pic.twitter.com/OCqy1oCKQd
— TV9 Marathi (@TV9Marathi) July 26, 2021
संबंधित बातम्या :
entrance to the Swastika building at Mumbra in Thane was destroyed