उद्धव ठाकरेंच्या टीकेला देवेंद्र फडणवीसांचं जशास तसं प्रत्युत्तर; म्हणाले, तुमको मिरची लगी तो मै…
Devendra Fadnavis on Uddhav Thackeray Statement and Loksabha Election 2024 : उद्धव ठाकरेंनी केलेल्या टीकेला देवेंद्र फडणवीस यांनी जशास तसं प्रत्युत्तर दिलंय. ते नेमकं काय म्हणाले? रेकॉर्ड ब्रेक जागा ठाण्यातील जिंकायची आहे, असंही फडणवीस म्हणालेत. वाचा सविस्तर...
जाहीर सभांच्या माध्यमातून सध्या राजकीय नेते एकमेकांवर टीका-टिपण्णी केली जात आहे. उद्धव ठाकरे यांनी महायुतीवर जोरदार हल्लाबोल केला. त्याच्या टीकेला राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे. नरेंद्र मोदी मुंबईत येऊन गेले. देशाची दिशा काय असेल? ते नरेंद्र मोदी यांनी सांगितलं आहे. पुढील 10 वर्ष भारत कुठे असणार हे सांगण्यासाठी मोदी मुंबईमध्ये आले होते. महायुती विकासाच्या मुद्द्यावर बोलते. महाविकास आघाडी शिव्यापासून सुरवात करतात आणि शिव्याच असतात… आमची शिवसेना आणि त्यांची ‘शिव्या’सेना आहे, असं मुख्यमंत्री म्हणाले. उद्धव ला मिरची लागली मोदी नकली सेना बोलले. तुमको मिरची लगी तो मै क्या करूँ?, असं देवेंद्र फडणवीस म्हणाले.
उद्धव ठाकरेंवर निशाणा
जी शिवसेना बाळासाहेब ठाकरे यांची आहे ती टिपू सुलतान नारे लावू शकतो का? याकूब मेमन कबर, पाकिस्तानचे झेंडे वापरत आहेत. प्रचारात व्होट जिहाद मागत आहे. मग ती काय आहेच नकली शिवसेना… उद्धव ठाकरे हे बाळासाहेब यांच्या संपत्ती चे वारसदार आहे, पण त्यांच्या विचाराचे वारसदार नाहीत. राज ठाकरे आणि एकनाथ शिंदे हे बाळासाहेबांच्या विचाराचे वारसदार आहे. उद्धव ठाकरे याना आरएसएस ध्वज त्यांना फडकं वाटत आहे. शिवसेनेचे भगवे ध्वज फडके वाटू लागेलत…, असं म्हणत देवेंद्र फडणवीस यांनी उद्धव ठाकरेंवर जोरदार टीका केली आहे.
आज भारत कोणालाही रोखू शकतो. आपण काम करत आहे नव्या भारतसाठी… जो मोदीला निवडून देणार तो नव भारत सैनिक असेल. आता पुढचे दोन दिवस महत्वाचे आहेत. लोकांच्या मनात मोदी आहेत. लोकांच्या मनातील मोदी पोहोचवायचे आहेत. ठाणे जागा प्रेसटीजची आहे आपण अपवाद राहिलो. 14 निवडणुका पैकी 12 वेळा महायुती म्हणून निवडून आलो, असंही देवेंद्र फडणवीस म्हणाले.
निवडणुकीवर देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?
आपली निवडणूक आहे, असं समजून जनतेपर्यंत पोहचलं पाहिजे. या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जास्तीत जास्त काम नगरसेवकांनी करावीत. यावर आपले भवितव्य अवलंबून असेल. दुपारच्या काळात देखील मतदान आले पाहिजे. महायुतीच्या घरातील लोकांनी आधी मतदान करा. नंतर मतदारांना बाहेर काढा. शेवटच्या दिवशी काय होईल सांगता येत नाही. 20 तारीख आराम करायची नाही. करो की मरो… तुमची स्पर्धा हार-जीत नाही. जास्त मतांनी जागा आल्या पाहिजेत, असंही देवेंद्र फडणवीसांनी म्हटलं आहे.