ठाण्यात समूह संसर्गाचा धोका, प्रसिद्ध हॉटेलमधील 21 कर्मचाऱ्यांना कोरोना
तसेच इतर कर्मचाऱ्यांना अलगीकरण कक्षात ठेवण्यात आले आहेत. (Thane Hotel Staff Tested Corona Positive)
मीरा-भाईंदर : राज्यात कोरोनाचा विळखा वाढत असताना ठाण्यात एका हॉटेलमधील 21 कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यामुळे मीरा-भाईंदर पालिकेकडून हे हॉटेल सील करण्यात आले आहे. मात्र एकाच हॉटेलमधील एवढे कर्मचाऱी पॉझिटिव्ह आल्याने ठाण्यात खळबळ उडाली आहे. (Thane Hotel Staff Tested Corona Positive)
मिळालेल्या माहितीनुसार, ठाणे-घोडबंदर रोडवरील एक्सप्रेस इन हे प्रसिद्ध हॉटेल आहे. या हॉटेलमधील 21 कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण झाली आहे. गुरुवारी (18 फेब्रुवारी) या हॉटेलमधील सर्व कर्मचाऱ्यांची कोरोना चाचणी करण्यात आली. या कोरोना चाचणीचा रिपोर्ट शुक्रवारी आल्यानंतर हॉटेल मालकासह कर्मचाऱ्यांची दाणादाण उडाली.
या हॉटेलमधील तब्बल 21 कर्मचाऱ्यांचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आला होता. यामुळे परिसरात एकच खळबळ उडाली. त्यानंतर मीरा-भाईंदर पालिकेकडून हे हॉटेल 4 मार्चपर्यंत सील करण्याचे आदेश दिले आहेत. तसेच इतर कर्मचाऱ्यांना अलगीकरण कक्षात ठेवण्यात आले आहेत.
दरम्यान गेल्या काही दिवसांपासून कोरोना रुग्णांच्या संख्येत सातत्याने वाढ होत आहे. सर्वसामान्य जनतेकडून शासनाच्या नियमांचे पालन करण्यात येत नाही. त्यामुळे ही वाढ होताना दिसत आहे. ठाणे शहरात शुक्रवारपर्यंत 26 हजार 665 रुग्ण कोरोना पॉझिटिव्ह आले आहेत. त्यापैकी 25 हजार 516 रुग्ण बरे झाले आहेत. तर आतापर्यंत 802 कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
राज्यात कोरोनाचा आकडा वाढला
गेल्या काही दिवसांपासून राज्यात कोरोनाचा आलेख वाढताना पाहायला मिळतोय. त्यामुळे राज्य सरकारकडून खबरदारीचे उपाय म्हणून निर्बंध कडक करण्याकडे कल वाढला आहे. राज्यातील अनेक जिल्ह्यात स्थानिक प्रशासनाने लॉकडाऊन जाहीर केलाय. तर कोरोना नियमांचं उल्लंघन करणाऱ्यांवर कठोर कारवाई केली जात आहे. शनिवारी दिवसभराचा आढावा घ्यायचा झाल्यास, राज्यात 6 हजार 281 नव्या रुग्णांची भर पडली आहे. तर दिवसभरात 2 हजार 567 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. दिवसभरात कोरोनामुळे 40 जणांचा मृत्यू झाला आहे. (Thane Hotel Staff Tested Corona Positive)
संबंधित बातम्या :
नवी मुंबईकरांनो सावधान! फेब्रुवारीत 2110 कोरोना रुग्णांची वाढ
मोठी बातमी : राज्यात नाईट कर्फ्यू लागू होण्याची शक्यता, ठाकरे सरकारमधील मंत्र्यांचे संकेत