TMC Election 2022 Ward 43; एकनाथ शिंदेच्या बंडखोरीमुळे शिवसेनेचा बालेकिल्ला असलेल्या ठाण्यात आता काय होणार?

ठाणे  महापालिका निवडणुकीत खरी लढत ही शिवसेना विरुद्ध शिंदे गट अशी असणार आहे. तर, दुसरीकडे जाहीर झालेल्या प्रभाग रचनेचा आणि आरक्षणाचा फटका अनेक उमेदवारांना बसण्याची शक्यता आहे.  प्रभाग क्रमांक 43 मध्ये अपेक्षेनुसार आरक्षण पडल्याचे दिसून आले आहे. या ठिकाणी महिलांसाठी आरक्षण जाहीर झाल्याने येथील तत्कालीन नगरसेवकांच्या पत्नींला संधी द्यावी लागणार आहे.

TMC Election 2022 Ward 43; एकनाथ शिंदेच्या बंडखोरीमुळे शिवसेनेचा बालेकिल्ला असलेल्या ठाण्यात आता काय होणार?
Follow us
| Updated on: Aug 26, 2022 | 8:05 PM

ठाणे : मुख्यमंत्री एकनाथ शिंदेच्या बंडखोरीमुळे शिवसेनेचा बालेकिल्ला असलेल्या ठाण्यात आता नेमकं काय होणार याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे. अनेक जण एकनाथ शिंदे गटात सामील झाले आहेत. याचा परिणाम ठाणे महापालिका निवडणुकीवर(Thane Municipal Corporations Elections) होणार आहे. शिंदे गटातर्फे निवडणुक लढवणारे आणि शिवसेने तर्फे निवडणुक लढवणारे असे उमेदवार पहायला मिळणार आहेत. यामुळे ठाणे  महापालिका निवडणुकीत खरी लढत ही शिवसेना विरुद्ध शिंदे गट अशी असणार आहे. तर, दुसरीकडे जाहीर झालेल्या प्रभाग रचनेचा आणि आरक्षणाचा फटका अनेक उमेदवारांना बसण्याची शक्यता आहे.  प्रभाग क्रमांक 43 मध्ये अपेक्षेनुसार आरक्षण पडल्याचे दिसून आले आहे. या ठिकाणी महिलांसाठी आरक्षण जाहीर झाल्याने येथील तत्कालीन नगरसेवकांच्या पत्नींला संधी द्यावी लागणार आहे.

ठाणे महापालिकेत एकूण 142 नगरसेवक आहेत. यपैकी शिवसेनेचे 67 नगरसेवक आहेत. राष्ट्रवादीचे 34, भाजपचे 23, काँग्रेसचे 3 आणि एमआयएमचे 2 नगरसेवक आहेत.

पक्षउमेदवारविजयी उमेदवार
शिवसेना
भाजप
काँग्रेस
राष्ट्रवादी
मनसे
इतर आणि अपक्ष

प्रभाग क्रमांक 43 ची लोकसंख्या आणि मतदार संख्या

प्रभाग क्रमांक 43 हा साबे (भाग), दिवा (भाग), दातिवली (भाग) असा असा विस्तारीत आहे. प्रभाग क्रमांक 43 ची एकूण लोकसंख्या 36393 इतकी आहे. अनुसूचित जातीचे 3323 मतदार आहेत. तर 481 मतदार हे अनुसूचित जमातीचे आहेत.

पक्षउमेदवारविजयी उमेदवार
शिवसेना
भाजप
काँग्रेस
राष्ट्रवादी
मनसे
इतर आणि अपक्ष

मतदारसंघ कुठून कुठपर्यंत?

उत्तर: उल्हास नदी आणि देसाई खाडी जंक्शन पासून उल्हास नदीने पूर्वेकडे रेल्वे नाल्याच्या रेषेत उल्हास नदी पर्यत

पूर्व : रेल्वे नाल्याच्या रेषेत उल्हास नदीपासून दक्षिणेकडे निलेश चाळ येथील रेल्वे नाल्याच्या मुखापर्यंत आणि त्यानंतर दक्षिणेकडे नाल्याने लक्ष्मी अपार्टमेंटपर्यंत, त्यानंतर मोकळ्या जागेलगत क्रिश प्लाझा येथील नाल्यापर्यंत, त्यानंतर नाल्याने मुंबादेवी रस्त्यावरील शिवम अपार्टमेंटपर्यंत आणि त्यानंतर पश्चिमेकडे गंगुबाई अपार्टमेंटपर्यंत आणि त्यानंतर पूर्वेकडे लेनने सुभद्रा अपार्टमेंटपर्यंत, त्यानंतर दक्षिणेकडे रस्त्याने त्यानंतर दक्षिणेकडे रस्त्याने लक्ष्मण निवास तदनंतर पश्चिमेकडे जानकी टॉवरच्या मागील कुंपण भितीने तन्वी सोसयटी समोर तदनंतर पश्चिमेकडे लेनने सदगुरू निवास |पर्यंत तदनंतर रस्त्याने दक्षिणेकडे संतोष अपार्टमेंट पर्यंत दिवा आगासन रस्त्यापर्यंत,

दक्षिण: दिवा आगासन रस्त्याने पश्चिमेकडे दिवा शिळ रस्त्यावरील चंद्रांगण सडेन्सिपर्यंत, आणि तद्ननंतर उत्तरेकडे ओम व्हिलापर्यत तदनंतर पश्चिमेकडे कुंपण भितीने शिवसमर्थ रेसिडेन्सीच्या कुंपण भितीपर्यंत तदनंतर पश्चिमेकडील लेनने न्यू होली स्प्रिड इंग्लिश स्कुल पर्यंत तदनंतर दक्षिणेकडे रस्त्याने देसाई खाडीपर्यंत

पश्चिम: देसाई खाडी आणि साबे गावाची हद्द यांच्या छेदनबिंदू पासून उत्तरेकडे देसाई खाडीने उल्हास नदीपर्यंत.

अशी आहे नवी प्रभाग रचना आणि आरक्षण सोडत

नवीन प्रभाग रचनेनुसार प्रभाग क्रमांक 43 मध्ये प्रभाग क्रमांक 43 ड हा रद्द करण्यात आला आहे. यामुळे येथे आता प्रभाग क्रमांक 43 अ, प्रभाग क्रमांक 43 ब आणि प्रभाग क्रमांक 43 क असे तीन प्रभाग असणार आहेत. यापैकी प्रभाग क्रमांक 43 अ आणि प्रभाग क्रमांक 43 ब हा सर्व साधारण महिला उमेद्वाराकरीता आरक्षित करण्यात आला आहे. तर प्रभाग क्रमांक 43 क सर्वसाधारण खुल्या गटासाठी राखीव ठेवण्यात आला आहे.

पक्षउमेदवारविजयी उमेदवार
शिवसेना
भाजप
काँग्रेस
राष्ट्रवादी
मनसे
इतर आणि अपक्ष
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद.
मंत्रिमंडळात 39 पैकी 20 नव्या चेहऱ्यांना संधी, बघा कोणाची लागली वर्णी?
मंत्रिमंडळात 39 पैकी 20 नव्या चेहऱ्यांना संधी, बघा कोणाची लागली वर्णी?.
प्रसिद्ध तबलावादक उस्ताद झाकीर हुसेन यांचं वयाच्या 73 व्या वर्षी निधन
प्रसिद्ध तबलावादक उस्ताद झाकीर हुसेन यांचं वयाच्या 73 व्या वर्षी निधन.
महायुतीचा अखेर मंत्रिमंडळ विस्तार, कोणत्या जिल्ह्यात किती मंत्री?
महायुतीचा अखेर मंत्रिमंडळ विस्तार, कोणत्या जिल्ह्यात किती मंत्री?.
अजित दादांनी आपल्याच मंत्र्यांचे टोचले कान, '... अन्यथा वेगळा निर्णय'
अजित दादांनी आपल्याच मंत्र्यांचे टोचले कान, '... अन्यथा वेगळा निर्णय'.
प्रचंड बहुमतानंतर बहुप्रतिक्षेत मंत्रिमंडळाचा विस्तार, कोणाची वर्णी?
प्रचंड बहुमतानंतर बहुप्रतिक्षेत मंत्रिमंडळाचा विस्तार, कोणाची वर्णी?.
33 आमदारांनी कॅबिनेट तर 6 आमदारांनी घेतली राज्यमंत्रिपदाची शपथ
33 आमदारांनी कॅबिनेट तर 6 आमदारांनी घेतली राज्यमंत्रिपदाची शपथ.