तानाजी सावंत यांना आरोग्य खात्याच्या ऐवजी कोणतं खातं मिळणार होतं? एकनाथ शिंदे यांनी जाहीर भाषणात सांगून टाकलं
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ठाणे येथील कार्यक्रमात डॉ. तानाजी सावंत यांना चिमटा काढत मंत्रीपदाबाबत मोठा गौप्यस्फोट केला आहे. याशिवाय नाव न घेता उद्धव ठाकरे यांनाही डिवचलं आहे.
ठाणे : आज ठाणे येथे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते सिव्हिल हॉस्पिटलच्या इमारतीचे भूमिपूजन करण्यात आले आहे. यावेळी आरोग्य मंत्री डॉ. तानाजी सावंत यांच्यासह माजी आरोग्य मंत्री दीपक सावंत हे देखील उपस्थित होते. याच दरम्यान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी भाषण करत असतांना सिव्हिल हॉस्पिटल आणि आनंद दिघे यांचं काय नातं होतं हे सांगत जुन्या आठवणींना उजाळा दिला आहे. याच दरम्यान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी डॉ. तानाजी सावंत यांना चिमटा काढत मोठा गौप्यस्फोट केला आहे. तानाजी सावंत यांची साखरेत डॉक्टरेट असली तरी तुमच्यामुळे लोकांची शुगर वाढली आहे.
त्याच बरोबर तुमच्या शैक्षणिक संस्था देखील आहे. त्यामुळे सुरुवातीला विचार केला होता तुम्हाला शिक्षणमंत्री करायचे होते, ज्याच्या जास्त संस्था आणि तो मंत्री राहिला का वाद होतो. त्यामुळए आरोग्य खातं दिलं असेही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हंटलं आहे.
अतिशय महत्त्वाचं हे खातं आहे. सर्व सामान्य माणसाला सेवा देणारे हे खाते आहे. आरोग्य विभाग काय आहे मला माहिती आहे. कारण मी आरोग्य विभागाचा मंत्री राहिलो आहे. येथे डॉ. दीपक सावंत आहे ते देखील यापूर्वी मंत्री राहिले आहे. ते देखील तळागाळात जाऊन काम करत होते.
मी सुद्धा वेगवेगळ्या भागात फिरलो आहे. ट्रकभरून साहित्य घेऊन जायचो तिथं वाटायचो. त्यांची गरज पूर्ण करायचो. एखाद्याचा जीव वाचला तर कुटुंब वाचायचे. आणि तेच पुण्य महत्वाचे आहे असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हंटलं आहे.
याच दरम्यान बाळासाहेब ठाकरे दवाखाना आपण राज्यभर करतो. मुंबईमध्ये आपण सुरू केले आहे. मुंबईत अडीचशे आणि राज्यभरामध्ये सातशे दवाखाने सुरू करणार आहे. त्यामुळे तिथे आरोग्य खात्यातील डॉक्टर आणि त्यांच्या स्टाफला नोकरी मिळणार आहे असे म्हणत मुख्यमंत्री एकणाथ शिंदे यांनी मंत्री सावंत यांचे कौतुक केले.
मात्र, दुसरीकडे आपला दवाखाना वरुन उद्धव ठाकरे यांना डिवचलं आहे. काहींचे पोट दुखात आहे. त्यांच्यावर मुंबईत मोफत उपचार करू असे म्हणत नाव न घेता उद्धव ठाकरे यांच्यावर हल्लाबोल केला आहे.
गतिमान सरकार, वेगवान सरकार, निर्णय घेणारे सरकार आहे. मी आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस गेले सात-आठ महिन्यांमध्ये जे निर्णय घेतले ते निर्णय सर्व सामान्य लोकांच्या आयुष्यामध्ये बदल घडवणारे निर्णय आहेत असा दावा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यावेळी केला आहे.