मध्य रेल्वेवरती आज मेगा ब्लॉक, असं असेल आज लोकलचं वेळापत्रक
विशेष म्हणजे जलद लोकलचं काम सुरु असल्याने धीम्या लोकल उशिराने धावतील असं रेल्वेकडून जाहीर केलं आहे. त्यामुळे उद्या त्या मार्गाने प्रवास करणाऱ्या प्रवाशांचा प्रवास संतगतीने होईल.
मुंबई – विविध रेल्वेच्या (railway) तांत्रिक कामांसाठी रेल्वेकडून रविवारी (sunday) सुट्टीच्या दिवशी मेगाब्लॉक (megablock) घेण्यात आला आहे. हा मेगाब्लॉक ठाणे ते कल्याण (thane to kalyan) दरम्यान दोन्ही जलद मार्गावर आठ तासांचा असेल असं रेल्वेकडून जाहीर करण्यात आलं आहे. सकाळी 9 वाजल्यापासून सायंकाळी 5 वाजेपर्यंत हा मेगाब्लॉक असेल. त्यामुळे अनेक प्रवाशांना धीम्या गतीच्या लोकलने प्रवास करावा लागणार आहे. विशेष म्हणजे जलद लोकलचं काम सुरु असल्याने धीम्या लोकल उशिराने धावतील असं रेल्वेकडून जाहीर केलं आहे. त्यामुळे उद्या त्या मार्गाने प्रवास करणाऱ्या प्रवाशांचा प्रवास संतगतीने होईल.
15 मिनिटं उशिराने लोकल
जलद मार्गावर उद्या काम होणार असल्याने सर्व जलद गाड्या धीम्या मार्गावरून चालवण्यात येणार आहेत. त्यामुळे ठाणे ते कल्याण या स्थानकांदरम्यान दोनचं मार्ग असल्याने लोकल 15 मिनिटे उशिराने धावण्याची शक्यता आहे. त्यामुळे सकाळी 9 ते सायंकाळी 5 दरम्यान प्रवास करणा-या प्रवाशांचे हाल होण्याची शक्यता आहे.
कुर्ला ते वाशी दोन्ही मार्गावर मेगाब्लॉक
तांत्रिक कामाच्या दुरूस्तीसाठी उद्या कुर्ला ते वाशी दोन्ही मार्गावर ब्लॉक घेण्यात आला असून सकाळी 11 ते दुपारी 4 वाजेपर्यंत हा मेगाब्लॉक असणार आहे. मेगाब्लॉक सीएसटी ते वाशी आणि पनवेल ते बेलापूर असा असणार आहे. त्यामुळे त्या मार्गावरील लोकल सुध्दा बंद करण्यात आल्या आहेत.
पश्चिम रेल्वेवरती सुध्दा मेगाब्लॉक
पश्चिम रेल्वेवरती सुध्दा सांताक्रुझ ते गोरेगाव दरम्यानही अप आणि डाऊन धीम्या मार्गावर रेल्वेच्या तांत्रिक कामासाठी सकाळी 10 ते दुपारी 3 वाजेपर्यंत मेगाब्लॉक घेण्यात आला आहे. त्यामुळे सांताक्रुझ ते गोरेगाव दरम्यानची विविध कामे करण्यात येणार आहेत. धीम्या मार्गावरील काही लोकल जलद मार्गांवर वळवण्यात येणार आहेत.