Bullet Train : मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेनच्या मार्गातील 1394 झाडे मुळासकट उपटणार, पालिकेकडे मागितली परवानगी

शीळ, पडणे, डावले, देसाई, म्हातार्डी, बेतवडे या भागातील अनेक झाडांची कत्तल होणार असल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे. स्टेशनची उभारणी करीत असताना ही झाडे तोडावी लागणार आहेत. पर्यावरणप्रेमींनी इतक्या झाडांची कत्तल होणार असल्याने नाराजी व्यक्त केली आहे.

Bullet Train : मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेनच्या मार्गातील 1394 झाडे मुळासकट उपटणार, पालिकेकडे मागितली परवानगी
मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेनच्या मार्गातील 1394 झाडे मुळासकट उपटणारImage Credit source: twitter
Follow us
| Updated on: Jun 02, 2022 | 8:46 AM

मुंबई – मोदींचं सरकार (Modi Government) सत्तेत येऊन नुकतेच आठ वर्षे पुर्ण झालं आहे. भारतात पंतप्रधानांचे अनेक ड्रीम पोजेक्ट आहेत. त्यापैकी एक म्हणजे मुंबई -अहमदाबाद हायस्पीड बुलेट ट्रेन (Bullet Train). त्या कामासाठी ठाण्यातील 1 हजार 394 झाडं मुळापासून तोडण्यात येणार आहेत. त्यापैकी 177 झाडांची पुर्णपणे कत्तल होणार आहे. झाडांची तोडणी करण्यासाठी नॅशनल हायस्पीड रेल कॉर्पोरेशनने (National High Speed Rail Corporation Limited) ठाणे पालिकेकडे परवानगी मागितली आहे. भिवंती तालुक्यातील एका गावात मुळासकट काढणाऱ्या झाडांचं पुनर्रोपण करण्याचं आश्वसन त्यांना रेल कार्पोरेशन कंपनीने दिलं आहे. खूप मोठी वृक्षतोड होणार असल्याने पर्यावरणप्रेमींमध्ये संताप व्यक्त होत आहे.

महाराष्ट्र फक्त दोन स्थानके

मुंबई-अहमदाबाद हायस्पीड बुलेट ट्रेन हा खूप मोठा प्रोजेक्ट आहे. हा रस्ता जवळपास 508 किलोमीटरचा आहे. तसेच या मार्गावर बारा स्थानके उभारण्यात येणार आहेत. महाराष्ट्र फक्त दोन स्थानके आहेत. त्यापैकी बोईसर, विरार आणि ठाणे ही स्थानके आहेत. ठाण्यातील ज्या ठिकाणी स्टेशन तयार करायचे आहे. तेथे झाडांची कत्तल करण्यात येणार आहे. महापालिकेच्या संबंधित विभागाते त्यासाठी अर्ज करण्यात आला आहे. त्यासाठी लागणारी मोठी रक्कम म्हणजे सतरा लाख रूपये भरण्याची रेल कॉर्पोरेशनने तयारी देखील दाखवली आहे.

या गावात होणार झाडांची कत्तल

शीळ, पडणे, डावले, देसाई, म्हातार्डी, बेतवडे या भागातील अनेक झाडांची कत्तल होणार असल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे. स्टेशनची उभारणी करीत असताना ही झाडे तोडावी लागणार आहेत. पर्यावरणप्रेमींनी इतक्या झाडांची कत्तल होणार असल्याने नाराजी व्यक्त केली आहे.

हे सुद्धा वाचा

ही झाडे तोडणार

ठाण्यातील 1 हजार 394 झाडं मुळापासून तोडल्यानंतर त्याचं पुनर्रोपण तांत्रिकदृष्ट्या शक्य नसल्याचं ठाणे पालिकेकडून सांगण्यात आलं आहे. त्यामुळे आंब्याची 62, सुबाबळ 109 तर ताडाची सहा झाड तोडण्यात येणार आहेत.

विशेष म्हणजे 26 हजार झाडं लावण्याचा हायस्पीड रेल्वे कॉर्पोरेशनचा विचार असून त्यासाठी 6 कोटी रूपये मोजण्याची तयारी देखील त्यांनी दर्शविली आहे.

कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'
कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'.
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?.
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले....
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात.
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.