Kalyan Boy Drown : सुट्टीत पोहण्याचा आनंद जीवावर बेतला; कल्याणमध्ये 16 वर्षीय मुलाचा स्विमिंग पूलमध्ये बुडून मृत्यू

कल्याण पश्चिमेकडील खडकपाडा परिसरातील एका उच्चभ्रु सोसायटीत ही दुर्दैवी घटना घडली. माधव संकल्प कॉम्प्लेक्स असे या सोसायटीचे नाव आहे. या सोसायटीतील क्लब हाऊसमधील स्विमिंग पूलमध्ये 16 वर्षांचा आयुष पोहण्यास गेला होता. रविवारच्या सुट्टीमुळे तो पोहण्यासाठी पाण्यात उतरला होता. यावेळी पाण्याचा अंदाज न आल्याने त्याच्या नाकातोंडात पाणी गेले. त्यात गुदमरून तो पाण्यात बुडाला.

Kalyan Boy Drown : सुट्टीत पोहण्याचा आनंद जीवावर बेतला; कल्याणमध्ये 16 वर्षीय मुलाचा स्विमिंग पूलमध्ये बुडून मृत्यू
डोंबिवलीत खदाणीत बुडून एकाच कुटुंबातील पाच जणांचा मृत्यूImage Credit source: TV9
Follow us
| Updated on: Apr 18, 2022 | 1:56 AM

कल्याण : उन्हाळी सुट्टीचा आनंद लुटण्यासाठी मुले जर घराबाहेर जात असतील तर पालकांनी त्यांच्याकडे विशेष लक्ष देण्याची गरज आहे. कल्याणमध्ये अशाच एका दुर्दैवी घटनेत एका 16 वर्षीय मुलाचा पोहण्याचा आनंद जीवावर बेतला आहे. हा मुलगा आपल्याच सोसायटीत असलेल्या स्विमिंग पूलमध्ये पोहण्यासाठी पाण्यात उतरला होता. त्याला स्विमिंग पुलातील पाण्याचा अंदाज आला नाही आणि पोहणे (Swimming) न जमल्याने त्या मुलाचा दुर्दैवी मृत्यू (Death) झाला. या घटनेचे वृत्त कल्याण शहरात पसरताच संपूर्ण परिसरात मुलाच्या मृत्यूबद्दल हळहळ व्यक्त होत आहे. आयुष अमित घोष (16) असे स्विमिंग पुलाच्या पाण्यात बुडून मृत्यू झालेल्या मुलाचे नाव आहे. (16-year-old boy drowns in swimming pool in Kalyan)

उच्चभ्रू सोसायटीतील क्लब हाऊसमध्ये घडली दुर्दैवी घटना

कल्याण पश्चिमेकडील खडकपाडा परिसरातील एका उच्चभ्रु सोसायटीत ही दुर्दैवी घटना घडली. माधव संकल्प कॉम्प्लेक्स असे या सोसायटीचे नाव आहे. या सोसायटीतील क्लब हाऊसमधील स्विमिंग पूलमध्ये 16 वर्षांचा आयुष पोहण्यास गेला होता. रविवारच्या सुट्टीमुळे तो पोहण्यासाठी पाण्यात उतरला होता. यावेळी पाण्याचा अंदाज न आल्याने त्याच्या नाकातोंडात पाणी गेले. त्यात गुदमरून तो पाण्यात बुडाला. त्याला दुसरे कोणी वाचवायला जाण्याआधीच त्याला मृत्यूने गाठले होते. रविवारी सायंकाळी साडेचार ते पाच वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. या घटनेची खडकपाडा पोलीस ठाण्यात नोंद झाली असून पोलीस अधिक तपास करीत आहेत.

आयुष मोठ्या लोकांच्या स्विमिंग पुलात पोहण्यास गेला!

माधव संकल्प सोसायटीत लहान मुलांसाठी आणि मोठ्यांसाठी असे दोन स्वतंत्र स्विमिंग पूल आहेत. यातील मोठ्यांसाठी असलेल्या पूलमध्ये आयुष पोहायला गेला होता. आयुष हा स्विमींग पूलमध्ये एकटाच पोहत होता. त्यामुळे त्याला लगेच कोणी पाहिले नाही. त्यात पाण्याचा अंदाज न आल्याने त्याचा पाण्यात बुडवून मृत्यू झाला. आयुष हा बारावीत शिकत होता. तो त्याच्या आई-वडिलांचा एकुलता एक मुलगा होता, तर त्याला एक बहीण आहे. त्याचे वडील कामा निमित्त पुण्याला गेले होते. त्याचदरम्यान पोहण्याचा आनंद लुटण्यासाठी तो स्विमिंग पुलाच्या पाण्यात उतरला होता. यावेळी त्याचा बुडून दुर्दैवी मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तातडीने घटनास्थळ गाठले आणि आयुषचा मृतदेह पाण्याबाहेर काढण्यात आला. सध्या या घटनेप्रकरणी खडकपाडा पोलीस अधिक तपास करीत आहेत. (16-year-old boy drowns in swimming pool in Kalyan)

इतर बातम्या

Bhayander Shivsena Dispute: मीरा भाईंदरमध्ये शिवसेना शहर प्रमुखाला महिला शिवसैनिकांकडून मारहाण

Mangesh Kudalkar : शिवसेना आमदार मंगेश कुडाळकर यांच्या पत्नीची आत्महत्या, कारण अस्पष्ट; पोलीस तपास सुरु

बीडचा पालकमंत्री कोण होणार? अजित पवारांनी सांगितली थेट तारीख
बीडचा पालकमंत्री कोण होणार? अजित पवारांनी सांगितली थेट तारीख.
कराडवर मकोका अन् पुन्हा मुंडेंच्या राजीनाम्याची मागणी, दमानिया म्हणाले
कराडवर मकोका अन् पुन्हा मुंडेंच्या राजीनाम्याची मागणी, दमानिया म्हणाले.
कराडवर मकोका, सरपंच देशमुखांच्या हत्येचा कट रचला? McocaAct म्हणजे काय?
कराडवर मकोका, सरपंच देशमुखांच्या हत्येचा कट रचला? McocaAct म्हणजे काय?.
वाल्मिक कराडला मकोका अन् सुरेश धस म्हणाले...'त्यांना शिक्षा होणार'
वाल्मिक कराडला मकोका अन् सुरेश धस म्हणाले...'त्यांना शिक्षा होणार'.
वाल्मिक कराडवर मकोका अन् परळी बदं, समर्थक उतरले रस्त्यावर अन्...
वाल्मिक कराडवर मकोका अन् परळी बदं, समर्थक उतरले रस्त्यावर अन्....
Walmik Karad BIG Breaking : मोठी बातमी, वाल्मिक कराडवर अखेर मकोका
Walmik Karad BIG Breaking : मोठी बातमी, वाल्मिक कराडवर अखेर मकोका.
मविआ राहिली की संपली?; शरद पवारांचं उत्तर अन् शाहंबद्दलही गौप्यस्फोट
मविआ राहिली की संपली?; शरद पवारांचं उत्तर अन् शाहंबद्दलही गौप्यस्फोट.
'मी आता विधानसभा लढणार नाही', शिवसेनेच्या माजी मंत्र्यांची मोठी घोषणा
'मी आता विधानसभा लढणार नाही', शिवसेनेच्या माजी मंत्र्यांची मोठी घोषणा.
बीड हत्या प्रकरणाचा तपास करणारे 'हे' अधिकारी बदलले, नवे अधिकारी कोण?
बीड हत्या प्रकरणाचा तपास करणारे 'हे' अधिकारी बदलले, नवे अधिकारी कोण?.
वाल्मिक कराड समर्थक परळीत आक्रमक, टॉवरवर चढून आंदोलन; एकाला भोवळ अन्..
वाल्मिक कराड समर्थक परळीत आक्रमक, टॉवरवर चढून आंदोलन; एकाला भोवळ अन्...