Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मनसे सोडून जाणाऱ्यांना बघून घेऊ, आमदार राजू पाटील यांचा गयारामांना सज्जड दम

कल्याण-डोंबिवली महापालिका (kdmc) निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कल्याण-डोंबिवलीत सर्वच राजकीय पक्षात इनकमिंग आऊट गोईंग सुरू झालं आहे. मनसेतही (mns) इतर पक्षातील पदाधिकारी आणि कार्यकर्ते प्रवेश करत आहेत.

मनसे सोडून जाणाऱ्यांना बघून घेऊ, आमदार राजू पाटील यांचा गयारामांना सज्जड दम
मनसे सोडून जाणाऱ्यांना बघून घेऊ, आमदार राजू पाटील यांचा गयारामांना सज्जड दम
Follow us
| Updated on: Feb 21, 2022 | 11:22 AM

कल्याण: कल्याण-डोंबिवली महापालिका (kdmc) निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कल्याण-डोंबिवलीत सर्वच राजकीय पक्षात इनकमिंग आऊट गोईंग सुरू झालं आहे. मनसेतही (mns) इतर पक्षातील पदाधिकारी आणि कार्यकर्ते प्रवेश करत आहेत. तर काही लोक इतर पक्षाच्या वाटेवर असल्याचं सांगितलं जात आहे. या पार्श्वभूमीवर मनसेचे आमदार राजू पाटील यांनी कार्यकर्त्यांना सज्जड दम भरला आहे. मनसे सोडून जाणाऱ्यांना बघून घेऊ. मनसे काय आहे हे दाखवून देऊ, असा इशाराच राजू पाटील यांनी दिला आहे. राजू पाटील (raju patil) यांनी मनसेच्या मेळाव्यातच हा दम भरला आहे. दरम्यान, मनसेत काल तीन जणांनी प्रवेश केला. हा प्रवेश तर झांकी आहे. निवडणूक अजून बाकी आहे, असा सूचक इशाराही त्यांनी अन्य राजकीय पक्षांना दिला आहे.

कल्याण डोंबिवली निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर सर्व राजकीय पक्ष कामाला लागले आहेत. मनसे आमदार राजू पाटील यांच्या उपस्थितीत डोंबिवलीत एक मोठा कार्यकर्ता मेळावा पार पडला. या मेळाव्यात मोठ्या प्रमाणात मनसे कार्यकर्ते पदाधिकारी उपस्थित होते. मनसे पदाधिकारी मनोज घरत, प्रकाश भोईर, इरफान शेख, हर्षद पाटील, राहूल कामत, मंदा पाटील यांच्या उपस्थित हा मेळावा पार पडला. या मेळाव्या दरम्यान जवळपास 300 जणांनी मनसेत प्रवेश केला. यावेळी राजू पाटील यांनी कार्यकर्त्यांना निवडणुकीच्या कामाला लागा, असे आदेश दिले आहेत.

भ्रमात राहू नका

एक भव्य कार्यक्रम लवकर होणार आहे. त्या कार्यक्रमात मनसेची ताकद काय हे माहीत पडेल. कोणी भ्रमात राहू नये. फक्त अफवा पसरविली जात आहे. हा चालला, तो चालला, कोणी जात नाही. कोणी जाणार नाही. कोणी गेला तर त्याला बघून घेईन, असा सज्जड दम त्यांनी कार्यकर्त्यांना दिला आहे.

निवडणूक झाकी है…

कोरोनामुळे 2 वर्षापासून कार्यकर्ता प्रवेश रखडला होता. आता ही सुरुवात झाली आहे. येणाऱ्या निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर प्रत्येक प्रभागात मी फिरणार आहे. मोठ्या प्रमाणात लोक मनसेत येणार आहेत. कल्याण डोंबिवलीत मनसेची ताकद आहे. 2009 साली 28 नगरसेवक निवडून आले होते. मोदी लाटेच्या वेळी 10 नगरसेवक निवडून आले होते. हा पक्ष प्रवेश झाकी आहे. अजून निवडणूक बाकी आहे, असा सूचक इशाराबी त्यांनी दिला आहे.

संबंधित बातम्या:

चंद्रशेखर राव यांच्या भेटीने काहीच फरक पडणार नाही, आघाडीचा प्रयोग आधीही फसला: फडणवीस

कॉन्स्टेबल नवऱ्याची कॉन्स्टेबल बायको, नायब तहसीलदारावर जीव जडला, नाल्यात मृतदेह आढळला

Maharashtra News Live Update : सरकार सूडाचं राजकारण करतंय, फडणवीसांचा औरंगाबादेत आरोप

दादा-पवार 15 दिवसात चारदा भेटले, काका पुतण्याच मनोमिलन होणार?घडतंय काय
दादा-पवार 15 दिवसात चारदा भेटले, काका पुतण्याच मनोमिलन होणार?घडतंय काय.
साहेब तुम्ही एक पाऊल पुढे टाका अन्... ठाकरे सेनेच्या त्या बॅनरची चर्चा
साहेब तुम्ही एक पाऊल पुढे टाका अन्... ठाकरे सेनेच्या त्या बॅनरची चर्चा.
मनसेच्या संदीप देशपांडेंचं शेलारांसह आदित्य ठाकरेंना पत्र, कारण काय?
मनसेच्या संदीप देशपांडेंचं शेलारांसह आदित्य ठाकरेंना पत्र, कारण काय?.
राज यांचा जन्म सेनेच्या गर्भातून, ठाकरेंच्या युतीवर सामनानं काय म्हटल?
राज यांचा जन्म सेनेच्या गर्भातून, ठाकरेंच्या युतीवर सामनानं काय म्हटल?.
VIDEO :दौऱ्यात व्यस्त, भर उन्हात रस्त्यावर गाडी थांबवून बाप-लेकीची भेट
VIDEO :दौऱ्यात व्यस्त, भर उन्हात रस्त्यावर गाडी थांबवून बाप-लेकीची भेट.
ठाकरे बंधूच्या युतीवर दमानियाम्हणाल्या, 'दोन हरलेली माणसं एकत्र....'
ठाकरे बंधूच्या युतीवर दमानियाम्हणाल्या, 'दोन हरलेली माणसं एकत्र....'.
काहींच्या पोटातून मळमळ बाहेर पडतेय; संजय राऊतांचा शिंदेंसेनेला टोला
काहींच्या पोटातून मळमळ बाहेर पडतेय; संजय राऊतांचा शिंदेंसेनेला टोला.
भाजप आमदाराला पोलिसाने फोनवर घातल्या शिव्या, ऑडिओ व्हायरल अन्...
भाजप आमदाराला पोलिसाने फोनवर घातल्या शिव्या, ऑडिओ व्हायरल अन्....
ठाकरे बंधूंची युती? दोन्ही पक्षात मनोमिलनाचं वारं
ठाकरे बंधूंची युती? दोन्ही पक्षात मनोमिलनाचं वारं.
ख्रिश्चन धर्मगुरू पोप फ्रान्सिस यांचं दीर्घआजारपणाने निधन
ख्रिश्चन धर्मगुरू पोप फ्रान्सिस यांचं दीर्घआजारपणाने निधन.