Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Kalyan Crime : कल्याणमध्ये दीड वर्षीय चिमुकलीच्या मृत्यू प्रकरणी डॉक्टर आणि सहकाऱ्याविरोधात गुन्हा दाखल

काही महिन्यांपूर्वी डॉ. एस.के. आलम याच्या क्लिनिकमध्ये दीड वर्षाच्या चिमुकलीचा उपचारा दरम्यान मृत्यू झाला होता. या प्रकरणी मुलीच्या कुटुंबीयांनी पोलीस स्टेशनमध्ये तक्रार केली होती. मात्र ठोस कारवाई न झाल्याने आई वडिलांनी या प्रकरणात कल्याण न्यायालायत धाव घेतली.

Kalyan Crime : कल्याणमध्ये दीड वर्षीय चिमुकलीच्या मृत्यू प्रकरणी डॉक्टर आणि सहकाऱ्याविरोधात गुन्हा दाखल
कल्याणमध्ये दीड वर्षीय चिमुकलीच्या मृत्यू प्रकरणी डॉक्टर आणि सहकाऱ्याविरोधात गुन्हा दाखल
Follow us
| Updated on: Dec 09, 2021 | 6:29 PM

कल्याण : कल्याणमध्ये काही महिन्यांपूर्वी उपचारादरम्यान झालेल्या दीड वर्षीय मुलीच्या मृत्यू प्रकरणी कल्याण न्यायालयाने संबंधित डॉक्टर आणि त्याच्या सहकाऱ्यावर गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिलेत. कल्याण न्यायालयाने दोषींवर कलम 304 प्रमाणे गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले. त्यानंतर कल्याण कोळशेवाडी पोलीस ठाण्यात डॉ. एस.के. आलम व ताज अन्सारी यांच्या विरोधात गुन्हा दाखल करत तपास सुरु केला. कल्याण पूर्वेतील सूचक नाका परिसरात हे दोघे क्लिनिक चालवत होते. आता पोलीस काय कारवाई करतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

काही महिन्यांपूर्वी डॉ. एस.के. आलम याच्या क्लिनिकमध्ये दीड वर्षाच्या चिमुकलीचा उपचारा दरम्यान मृत्यू झाला होता. या प्रकरणी मुलीच्या कुटुंबीयांनी पोलीस स्टेशनमध्ये तक्रार केली होती. मात्र ठोस कारवाई न झाल्याने आई वडिलांनी या प्रकरणात कल्याण न्यायालायत धाव घेतली. अखेर कल्याण न्यायालयाने संबंधित डॉक्टर आणि त्याच्या कंपाऊंडरवर गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले.

डॉक्टरांनी मुलीला चुकीचे औषध दिल्याचा कुटुंबीयांचा आरोप

कल्याण पूर्वेतील नवी गोविंदवाडी कचोरे येथे सहानी कुटुंब राहते. सहा महिन्यांपूर्वी पप्पू सहानी यांची दीड वर्षांची मुलगी नेहा ही अचानक आजारी पडली. पप्पू आणि त्यांची पत्नी मुन्नी हे दोघे मुलीला घेऊन सूचकनाका परिसरात असलेल्या एका क्लिनिकमध्ये गेले. तेथील डॉक्टरांनी मुलीला काही औषधं दिली. एक दिवसानंतर मुलीचा मृत्यू झाला. सहानी कुटुंबीयांचा आरोप होता की, चुकीचे औषध दिल्याने मुलीचा मृत्यू झाला आहे. याप्रकरणी कुटुंबीयांनी कोळशेवाडी पोलीस ठाण्यात तक्रार दिली. मात्र त्यावेळी पोलिसांनी या प्रकरणात गांभीर्य दाखविले नाही. न्यायासाठी आई वडील वणवण फिरत होते.

कल्याण भाजपच्या महिला अध्यक्ष रेखा राजन चौधरी यांच्याशी या कुटुंबीयांनी संपर्क साधला. पोलीस ऐकत नाही म्हणून रेखा चौधरी आणि राजन चौधरी यांनी सहानी कुटुंबीयांना एक वकील नेमून दिला. या वकिलाच्या सहाय्याने कल्याण कोर्टात हे प्रकरण दाखल करण्यात आले. अखेर कल्याण कोर्टाने 156/3 अंतर्गत संबंधित क्लिनिक चालकांविरोधात गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले. या प्रकरणात कल्याणच्या कोळशेवाडी पोलीस ठाण्यात ताज अन्सारी आणि एस.के. आलम विरोधात भादवी 304 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ताज अन्सारी याने मुलीला औषध दिल्याचा आरोप सहानी कुटुंबीयांनी केला आहे.

पोलीस आणि पालिका प्रशासनाच्या कारवाईकडे पोलिसांचे लक्ष

ताज अन्सारी हा एस.ए. आलम याच्या लेटरपॅडचा वापर करून क्लिनिकमध्ये लोकांना उपचार देतो. या प्रकरणात कल्याण कोळशेवाडी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक बशीर शेख यांचे म्हणणे आहे की प्रकरणाचा तपास सुरु आहे. कायदेशीर कारवाई केली जाईल. यामध्ये एकीकडे पोलिसांचा तपास सुरु आहे तर दुसरीकडे कल्याण डोंबिवली महानगर पालिकेच्या आरोग्य विभागानेही याकडे लक्ष देणे गरजेचे आहे. या दोघांमध्ये डॉक्टर कोण? त्यांच्याकडे डिग्री कोणती? डिग्री आहे तर ती खरी आहे का? आता पोलीस आणि पालिका प्रशासन यावर काय कारवाई करते? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. (A case has been registered against a doctor and a colleague in connection with the death of child in Kalyan)

इतर बातम्या

बेंचवर बसण्याच्या वादातून कॉलेजच्या विद्यार्थ्याला बेदम मारहाण, व्हिडिओ सोशल मीडियात व्हायरल

औरंगाबादः कुणी मारलं एवढ्या निर्घृणपणे? शेतकऱ्याला दगडाने ठेचलं, मृतदेह सापडेपर्यंत कुत्र्याने तोडले लचके, तपास सुरू

पाळीव प्राण्यापासून सर्वच अस्वस्थ, शेलारांची मनसे नेत्यान उडवली टिंगल
पाळीव प्राण्यापासून सर्वच अस्वस्थ, शेलारांची मनसे नेत्यान उडवली टिंगल.
दादा-पवार 15 दिवसात चारदा भेटले, काका पुतण्याच मनोमिलन होणार?घडतंय काय
दादा-पवार 15 दिवसात चारदा भेटले, काका पुतण्याच मनोमिलन होणार?घडतंय काय.
साहेब तुम्ही एक पाऊल पुढे टाका अन्... ठाकरे सेनेच्या त्या बॅनरची चर्चा
साहेब तुम्ही एक पाऊल पुढे टाका अन्... ठाकरे सेनेच्या त्या बॅनरची चर्चा.
मनसेच्या संदीप देशपांडेंचं शेलारांसह आदित्य ठाकरेंना पत्र, कारण काय?
मनसेच्या संदीप देशपांडेंचं शेलारांसह आदित्य ठाकरेंना पत्र, कारण काय?.
राज यांचा जन्म सेनेच्या गर्भातून, ठाकरेंच्या युतीवर सामनानं काय म्हटल?
राज यांचा जन्म सेनेच्या गर्भातून, ठाकरेंच्या युतीवर सामनानं काय म्हटल?.
VIDEO :दौऱ्यात व्यस्त, भर उन्हात रस्त्यावर गाडी थांबवून बाप-लेकीची भेट
VIDEO :दौऱ्यात व्यस्त, भर उन्हात रस्त्यावर गाडी थांबवून बाप-लेकीची भेट.
ठाकरे बंधूच्या युतीवर दमानियाम्हणाल्या, 'दोन हरलेली माणसं एकत्र....'
ठाकरे बंधूच्या युतीवर दमानियाम्हणाल्या, 'दोन हरलेली माणसं एकत्र....'.
काहींच्या पोटातून मळमळ बाहेर पडतेय; संजय राऊतांचा शिंदेंसेनेला टोला
काहींच्या पोटातून मळमळ बाहेर पडतेय; संजय राऊतांचा शिंदेंसेनेला टोला.
भाजप आमदाराला पोलिसाने फोनवर घातल्या शिव्या, ऑडिओ व्हायरल अन्...
भाजप आमदाराला पोलिसाने फोनवर घातल्या शिव्या, ऑडिओ व्हायरल अन्....
ठाकरे बंधूंची युती? दोन्ही पक्षात मनोमिलनाचं वारं
ठाकरे बंधूंची युती? दोन्ही पक्षात मनोमिलनाचं वारं.