Kalyan Crime : अखेर ‘त्या’ शिवसेनेच्या माजी नगरसेवकांवर गुन्हा दाखल, जमिनीच्या प्रकरणात शेतकरी कुटुंबाला केली होती मारहाण

जबरदस्तीने जमिन घेण्यासाठी रमेश म्हात्रे दबाव आणत आहेत आणि त्यासाठी मारहाण केली असल्याचा आरोप शेतकरी एकनाथ मोकाशी यांनी केला होता. या हल्ल्यात त्यांचासोबत त्यांचा मुलगा देखील जखमी झाला होता. या प्रकरणी पोलीस ठाण्यात तक्रार करून सुद्धा पोलिसांनी गुन्हा दाखल केला नव्हता.

Kalyan Crime : अखेर 'त्या' शिवसेनेच्या माजी नगरसेवकांवर गुन्हा दाखल, जमिनीच्या प्रकरणात शेतकरी कुटुंबाला केली होती मारहाण
अखेर 'त्या' शिवसेनेच्या माजी नगरसेवकांवर गुन्हा दाखल
Follow us
| Updated on: Feb 08, 2022 | 11:28 PM

कल्याण : जमीन लाटण्यासाठी शेतकरी कुटुंबियांवरील हल्ला प्रकरणी अखेर 36 तासानंतर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. शिवसेनेचे माजी नगरसेवक रमेश म्हात्रें(Ramesh Mhatre)सह 15 जणांविरोधात डायघर पोलीस ठाण्या(Daighar Police Station)त गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुन्हा दाखल करण्यासाठी मनसे आमदार राजू पाटील हे पीडित कुटुंबासोबत 6 तास पोलीस ठाण्यात ठिय्या मांडून बसले होते. पीडित कुटुंबियांनी मनसे आमदार राजू पाटील यांचे आभार मानत पोलिसांनी योग्य ती कारवाई करावी अशी मागणी केली आहे. कल्याण ग्रामीण विधानसभा क्षेत्रात येणाऱ्या दहिसर मोकाशी पाडा या गावात दोन दिवसापूर्वी एका शेतकरी कुटुंबावर हल्ला करण्यात आला होता. केडीएमसीचे माजी शिवसेना नगरसेवक रमेश म्हात्रे आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी हल्ला केल्याचा आरोप शेतकरी कुटुंबियांनी केला होता. (A case has been registered against a former Shiv Sena corporator in Daighar police for assaulting a farmer’s family)

अखेर चार दिवसानंतर शिवसेनेच्या माजी नगरसेवकाविरोधात गुन्हा दाखल

जबरदस्तीने जमिन घेण्यासाठी रमेश म्हात्रे दबाव आणत आहेत आणि त्यासाठी मारहाण केली असल्याचा आरोप शेतकरी एकनाथ मोकाशी यांनी केला होता. या हल्ल्यात त्यांचासोबत त्यांचा मुलगा देखील जखमी झाला होता. या प्रकरणी पोलीस ठाण्यात तक्रार करून सुद्धा पोलिसांनी गुन्हा दाखल केला नव्हता. याप्रकरणी शेतकरी कुटुंबाला न्याय मिळावा म्हणून मनसे आमदार राजू पाटील यांनी पोलीस ठाण्यात धाव घेतली. शेतकरी कुटुंबीयांसोबत जवळपास 6 तास पोलीस ठाण्यात ठिय्या दिला. पोलिसांनी तपास करून गुन्हा दाखल करण्यात येईल असे सांगितले. यावेळी मनसे आमदार यांनी पोलीस गुन्हा दाखल करत नाही तर पीडित कुटुंब न्यायालयात धाव घेणार असे सांगितले होते. अखेर 4 दिवसानंतर का होईना डायघर पोलिसांनी शिवसेना माजी नगरसेवक रमेश म्हात्रे, सचिन पाटील, वैभव पाटील यांच्यासह 15 जणांविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

राजू पाटील यांनी पोलिसांचे मानले आभार

हा गुन्हा दाखल झाल्यानंतर मनसे आमदार राजू पाटील यांनी शेतकरी एकनाथ मोकाशींलह पोलीस ठाण्यात भेट दिली. कुटुंबियांनी मनसे आमदार राजू पाटील यांचे आभार मानले आहेत आणि पोलिसांनी योग्य ती कारवाई करावी अशी मागणी केली आहे. गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलिसांना धन्यवाद देत पोलिसांनी पीडित कुटुंबाला न्याय मिळवून द्यावा अशी मागणी मनसे आमदार पाटील यांनी केली आहे. मात्र शिवसेनेच्या माजी नगरसेवकावर गुन्हा दाखल झाल्यानंतर राजकारण चर्चेला उधाण आले आहे. (A case has been registered against a former Shiv Sena corporator in Daighar police for assaulting a farmer’s family)

इतर बातम्या

Ahmedabad Bombblast : अहमदाबाद साखळी बॉम्बस्फोट प्रकरणाचा 13 वर्षांनंतर निकाल; 49 दोषी, 28 जणांची निर्दोष सुटका

Aditya Pancholi : आदित्य पांचोलीकडून चित्रपट निर्मात्याला मारहाण, जुहू पोलिसात परस्परांविरोधात तक्रार दाखल

मस्साजोगमधील सरपंच हत्या प्रकरण : 'त्या' दोघांच्या भेटीचं CCTV व्हायरल
मस्साजोगमधील सरपंच हत्या प्रकरण : 'त्या' दोघांच्या भेटीचं CCTV व्हायरल.
अजित पवार नॉट रिचेबल, भास्कर जाधवांनी कारण देत केला मोठा गौप्यस्फोट
अजित पवार नॉट रिचेबल, भास्कर जाधवांनी कारण देत केला मोठा गौप्यस्फोट.
छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण
छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण.
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य.
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?.
श्रीरामाच्या घोषणा,जीवाला धोका रात्री 3.30 वाजता अंधारेंसोबत काय झालं?
श्रीरामाच्या घोषणा,जीवाला धोका रात्री 3.30 वाजता अंधारेंसोबत काय झालं?.
थर्टी फस्ट पार्टीसाठी किल्ल्यांवर जाताय? पण असं वागाल तर १ लाखांचा दंड
थर्टी फस्ट पार्टीसाठी किल्ल्यांवर जाताय? पण असं वागाल तर १ लाखांचा दंड.
भाजपच्या या 4 नेत्याचं सत्तेत कमबॅक, लालदिव्याची प्रतीक्षा अखेर संपली
भाजपच्या या 4 नेत्याचं सत्तेत कमबॅक, लालदिव्याची प्रतीक्षा अखेर संपली.
भरतशेठ... झाले थोडे लेट पण कॅबिनेटच आणलं थेट! मंत्रिपदाची माळ गळ्यात
भरतशेठ... झाले थोडे लेट पण कॅबिनेटच आणलं थेट! मंत्रिपदाची माळ गळ्यात.
'हा मैं नाराज, वहाँ नही रहेना..',भुजबळांचा भडका अन् हाती बंडाचा झेंडा?
'हा मैं नाराज, वहाँ नही रहेना..',भुजबळांचा भडका अन् हाती बंडाचा झेंडा?.