कामावरून थकून आल्यावर आईला पाण्यासाठी दूर जावं लागायचं, चौदा वर्षांच्या मुलानी युक्ती लढवली, पंचक्रोशीत होत आहे कौतुक

त्याची ही जिद्द पाहून पंचक्रोशीतील नागरिकांनी त्याचे कौतुक केले आहे. श्रमाचा आनंद काय असतो ते प्रणय सालकरला समजले. यामुळे वडील रमेश सालकर आणि त्याची आई दर्शना सालकर त्याच्यावर जाम खूश आहेत.

कामावरून थकून आल्यावर आईला पाण्यासाठी दूर जावं लागायचं, चौदा वर्षांच्या मुलानी युक्ती लढवली, पंचक्रोशीत होत आहे कौतुक
Follow us
| Updated on: May 05, 2023 | 3:28 PM

प्रतिनिधी, पालघर : केळवे गावात धावांगे पाडा आहे. येथे सहाशे ते सातशे लोकवस्ती आहे. खाऱ्या जमिनीमुळे विहीर आणि बोरिंगला पाणी खारट येते. त्यामुळे या पाड्याला पाण्याची चणचण आहे. नळाला आठवड्यातून रविवार, मंगळवार आणि गुरुवारी पाणी येते. मात्र हे पाणी अपुरे पडत असल्याने नागरिकांचे हाल होतात. असेच हाल प्रणवच्या आईचे होत होते. हाल अपेष्टा न बघवल्याने प्रणवने विहीर खोदण्याचा चंग बांधला. त्याच्या जिद्दीने त्याने विहीर खोदून पूर्ण केली. त्याची ही जिद्द पाहून पंचक्रोशीतील नागरिकांनी त्याचे कौतुक केले आहे. श्रमाचा आनंद काय असतो ते प्रणय सालकरला समजले. यामुळे वडील रमेश सालकर आणि त्याची आई दर्शना सालकर त्याच्यावर जाम खूश आहेत.

PRANAY SALKAR 1 N

पंचक्रोशीतील नागरिकांकडून कौतुक

पालघर तालुक्यातील केळवे धावांगे पाडा येथील एका चौदा वर्षाच्या प्रणव सालकर या मुलाने चक्क घरासमोर खड्डा खोदून विहीर तयार केली आहे. आईला अर्धा किलोमीटर दूर जाऊन पाणी आणावे लागत असल्याने त्याने आईची काळजी घेण्यासाठी ही विहीर चार दिवसात मेहनतीने तयार केली आहे. या लहान वयात आई प्रती त्याची काळजी आणि त्याची ही जिद्द पाहून पंचक्रोशीतील नागरिकांकडून प्रणयचा कौतुक केले जात आहे.

हे सुद्धा वाचा

चार दिवसांत खोदली विहीर

प्रणव याची आई दर्शना व वडील रमेश हे बागायतीमध्ये मजूर म्हणून काम करतात. आई मजुरी करून थकून भागून आल्यानंतर अर्धा किलोमीटर पाण्याला जाते. तिला त्रास सहन करावा लागतो. हा त्रास बघवत नसल्याने प्रणवने विहीर खोदण्याचा निर्धार केला. घराच्या अंगणात त्याने खड्डा खोदायला सुरुवात केली. दररोज थोडा थोडा खड्डा खोदून त्याने ही विहीर चार दिवसांत पूर्ण केली. बारा ते पंधरा फूट खोल खड्डा केल्यानंतर त्याला गोड पाणी लागले आहे.

PRANAY SALKAR 2 N

विहिरीला लागले गोड पाणी

खड्डा खोदण्यासाठी प्रणवला अथक परिश्रम घ्यावे लागले. खोल खड्ड्यातून माती काढण्यासाठी त्याने स्वतःहून शिडी बनवली. त्याद्वारे तो माती खणून वर आणून टाकत होता. खड्डा खोदताना त्याला खडक लागले. मात्र वडिलांच्या सहकार्याने त्याने हे दगडही काढले. अखेर खड्ड्यात पाणी आल्याने त्याचा आनंद अनावर झाला. खड्ड्यातील पाणी सालकर कुटुंब वापरण्यासाठी घेतात. त्यामुळे काही अंशी पाणी आणण्याचा त्रास दूर झाल्याचे प्रणवच्या आईने म्हटले आहे.

खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.
लाथा-बुक्के अन् दगडानं मारहाण, भाजपच्या ज्येष्ठ नेत्यावर जीवघेणा हल्ला
लाथा-बुक्के अन् दगडानं मारहाण, भाजपच्या ज्येष्ठ नेत्यावर जीवघेणा हल्ला.
सबसे कातील गौतमी पाटील नव्या वर्षात चाहत्यांना देणार मोठं सरप्राईज
सबसे कातील गौतमी पाटील नव्या वर्षात चाहत्यांना देणार मोठं सरप्राईज.