Dombivali Fraud : दुप्पट नफ्याचं आमिष दाखवत साडेचार लाखांचा गंडा, डोंबिवलीचा भामटा वर्षभराने गजाआड

पेदुरीने डोंबिवलीच्या एका इसमाला व्हॉट्सअॅपवर संपर्क साधत एका कंपनीत पैशांची गुंतवणूक करण्यास सांगितलं. गुंतवणूक केल्यास त्यांना दुप्पट नफा मिळवून देण्याचे आमिष त्यानं दाखवलं. या आमिषाला बळी पडत संबंधित व्यक्तीने त्याला सांगण्यात आलेल्या खात्यावर साडेचार लाख रुपये जमा केले. मात्र गुंतवणूक केल्यानंतर वर्षभराचा कालावधी उलटूनही पैसे परत न मिळाल्याने फिर्यादीला आपली फसवणूक झाल्याचं लक्षात आलं.

Dombivali Fraud : दुप्पट नफ्याचं आमिष दाखवत साडेचार लाखांचा गंडा, डोंबिवलीचा भामटा वर्षभराने गजाआड
दुप्पट नफ्याचं आमिष दाखवत साडेचार लाखांचा गंडाImage Credit source: TV9
Follow us
| Updated on: May 09, 2022 | 11:12 PM

डोंबिवली : व्हॉट्सऍपच्या माध्यमातून एका इसमाला दुप्पट नफ्याचं आमिष (Lure) दाखवून साडेचार लाखांचा गंडा (Fraud) घालणाऱ्या भामट्याला डोंबिवलीच्या विष्णुनगर पोलिसांनी बेड्या (Arrest) ठोकल्या आहेत. गुन्हा दाखल झाल्यानंतर वर्षभर फरार असलेल्या या भामट्याला सूरत येथून सापळा रचून अटक करण्यात आली आहे. अनिल पेदुरी असं या भामट्याचं नाव आहे. वर्षभर पेदुरी पोलिसांनी चकवा देत होता. पोलिसांनी मोबाईल लोकेशन ट्रेस करु नये म्हणून तो वारंवार आपला मोबाईल नंबर बदलत होता. मात्र पोलिसांनी त्याचा माग काढत अखेर त्याच्या मुसक्या आवळल्या. आरोपीने आणखी किती लोकांची फसवणूक केली याबाबत विष्णुनगर पोलिस चौकशी करत आहेत.

साडे चार लाखाला गंडा घालून फरार झाला होता

पेदुरीने डोंबिवलीच्या एका इसमाला व्हॉट्सअॅपवर संपर्क साधत एका कंपनीत पैशांची गुंतवणूक करण्यास सांगितलं. गुंतवणूक केल्यास त्यांना दुप्पट नफा मिळवून देण्याचे आमिष त्यानं दाखवलं. या आमिषाला बळी पडत संबंधित व्यक्तीने त्याला सांगण्यात आलेल्या खात्यावर साडेचार लाख रुपये जमा केले. मात्र गुंतवणूक केल्यानंतर वर्षभराचा कालावधी उलटूनही पैसे परत न मिळाल्याने फिर्यादीला आपली फसवणूक झाल्याचं लक्षात आलं. त्यांनी याप्रकरणी डोंबिवलीच्या विष्णुनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला. मात्र गुन्हा दाखल होताच अनिल पेदुरी हा भामटा गुजरातला पळून गेला. तो वारंवार नंबर आणि ठिकाणं बदलत वर्षभर पोलिसांना चकवा देत होता. मात्र अखेर पोलिसांनी त्याचा माग काढत सूरतमध्ये सापळा रचून त्याला बेड्या ठोकल्या. आरोपी अशाच पद्धतीने आणखी किती जणांची फसवणूक केली आहे? याचा शोध पोलीस घेत आहेत.

हे सुद्धा वाचा

Non Stop LIVE Update
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.