Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Kalyan Crime : हरभरा चोरल्याच्या संशयातून मजुराला कुऱ्हाडीने मारहाण, मारहाणीची घटना सीसीटीव्हीत कैद

कल्याण पश्चिमेकडील उंबर्डे गावात एका कन्स्ट्रक्शन साईटवर काम करणारे दोन मजूर गंगा सिंग आणि त्याचा साथीदार हे हरभरा खात बसले होते. हे पाहून नवनाथ लोखंडे आणि रोहित लोखंडे हे दोघे त्यांच्याजवळ आले. या दोघांनी हरभरा खात असलेल्या मजुरांना मारहाण करण्यास सुरुवात केली.

Kalyan Crime : हरभरा चोरल्याच्या संशयातून मजुराला कुऱ्हाडीने मारहाण, मारहाणीची घटना सीसीटीव्हीत कैद
हरभरा चोरल्याच्या संशयातून मजुराला कुऱ्हाडीने मारहाण
Follow us
| Updated on: Feb 12, 2022 | 11:14 PM

कल्याण : हरभरा चोरी करून खाल्याच्या संशयावरून दोन जणांनी एका निष्पाप मजुरा (Worker)ला कुऱ्हाडीने मारहाण (Beatened) केल्याची घटना कल्याण पश्चिमेकडील उंबर्डे गावात उघडकीस आली आहे. या प्रकरणी खडकपाडा पोलिसात दोघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिस पुढील तपास करीत आहेत. नवनाथ लोखंडे आणि रोहित लोखंडे अशी मारहाण करणाऱ्या आरोपींची नावे आहेत. दरम्यान ही मारहाणीची घटना सीसीटीव्ही कॅमेरात कैद झाली आहे. गंगा सिंग असे कुऱ्हाडीने मारहाण करण्यात आलेल्या मजुराचे नाव आहे. या हल्ल्यात गंगाच्या हाताला दुखापत झाली आहे. क्षुल्लक कारणावरून मजुराला झालेल्या मारहाणीच्या घटनेवरून संताप व्यक्त करण्यात येत आहे. (A laborer was beaten with an ax on suspicion of stealing a gram in Kalyan)

शेतातील हरभरे चोरल्याच्या संशयातून हल्ला

कल्याण पश्चिमेकडील उंबर्डे गावात एका कन्स्ट्रक्शन साईटवर काम करणारे दोन मजूर गंगा सिंग आणि त्याचा साथीदार हे हरभरा खात बसले होते. हे पाहून नवनाथ लोखंडे आणि रोहित लोखंडे हे दोघे त्यांच्याजवळ आले. या दोघांनी हरभरा खात असलेल्या मजुरांना मारहाण करण्यास सुरुवात केली. गंगा सिंग याने तुम्ही आम्हाला का मारताय असं विचारलं असता त्यांनी तू आमच्या शेतातील हरभरा कसा चोरला ? तुझी इतकी हिम्मत कशी झाली ? असं सांगत मारहाण केली. गंगा वारंवार त्यांना मी तुमच्या शेतातून हरभरे चोरले नसल्याचे सांगत होता. मात्र मारहाण करणारे ऐकत नव्हते. इतक्यात मारहाण करणाऱ्या दोघांपैकी एकाने कुऱ्हाड उचलली व गंगावर हल्ला केला. याच दरम्यान गंगाचा साथीदार तेथून पळून गेला. मात्र या हल्ल्यात गंगाच्या हाताला दुखापत झाली आहे. या प्रकरणी खडकपाडा पोलीस ठाण्यात गंगा याने तक्रार नोंदवली असून या तक्रारी नुसार पोलिसांनी मारहाण करणाऱ्या नवनाथ लोखंडे व रोहित लोखंडे विरोधात गुन्हा नोंद करत तपास सुरू केला आहे.

साताऱ्यात दोन गटात तुफान हाणामारी

सातारा शहरालगत असणाऱ्या करंजे भागात शुक्रवारी रात्री दोन गटात तुफान हाणामारी झाली. या हाणामारीत काही जण जखमी झाल्याची माहिती मिळत आहे. या प्रकारामुळे परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. शुक्रवारी रात्री साडे दहाच्या सुमारास करंजे गावात मारहाणीची घटना घडली. दोन गटातील युवक समोर समोर आले होते. जवळपास 20 ते 25 युवकांमध्ये जोरदार हाणामारी सुरू होती. यावेळी दोन्ही बाजूने दगडफेक करण्यात आली. तसेच काहीजणांच्या हातात धारदार शस्त्र होते. मारहाणीचा हा प्रकार बराच वेळ सुरू होता. या घटनेचे मोबाईलमध्ये चित्रीकरण झाले असून याप्रकरणी रात्री उशिरापर्यंत शाहूपुरी पोलिस ठाण्यात तक्रार दाखल नव्हती. (A laborer was beaten with an ax on suspicion of stealing a gram in Kalyan)

इतर बातम्या

Molestation Case : प्रत्येक स्पर्श वाईट नसतो; विनयभंगाच्या गुन्ह्यात क्रीडा शिक्षकाची निर्दोष सुटका

Nashik Crime : नाशिकमधील देवळा जळीतकांड प्रकरण, पाचही आरोपींना 3 दिवस पोलीस कोठडी

वाल्मिक कराडने जेलरच्या ऑफिसमध्ये बसून सगळं प्लॅनिंग केलं - मीरा गीते
वाल्मिक कराडने जेलरच्या ऑफिसमध्ये बसून सगळं प्लॅनिंग केलं - मीरा गीते.
कराडला, घुलेला मारहाण होत असताना, बबन गीतेने शेअर केली पोस्ट
कराडला, घुलेला मारहाण होत असताना, बबन गीतेने शेअर केली पोस्ट.
मारहाण घटनेनंतर महादेव गीतेसह चौघांची हर्सुल कारागृहात रवानगी
मारहाण घटनेनंतर महादेव गीतेसह चौघांची हर्सुल कारागृहात रवानगी.
'...अन् देशमुख हत्याप्रकरणातील आरोपी एकमेकांना संपवतील' - मनोज जरांगे
'...अन् देशमुख हत्याप्रकरणातील आरोपी एकमेकांना संपवतील' - मनोज जरांगे.
मारामारी थापड थुपडीची झाली, पण..; धस नेमकं काय म्हणाले
मारामारी थापड थुपडीची झाली, पण..; धस नेमकं काय म्हणाले.
लाडकी बहीणबंद होणार?सरकारकडे पैसे नाहीत?सत्ताधारी-विरोधकांमध्ये जुंपली
लाडकी बहीणबंद होणार?सरकारकडे पैसे नाहीत?सत्ताधारी-विरोधकांमध्ये जुंपली.
घरात वडील आजारी अन् काढणीला आलेलं पीक; चिमुकला करतोय शेताची राखण
घरात वडील आजारी अन् काढणीला आलेलं पीक; चिमुकला करतोय शेताची राखण.
देशमुखांना अडकवण्यासाठी तयार केलेल्या महिलेची हत्या? दमानियांचा दावा
देशमुखांना अडकवण्यासाठी तयार केलेल्या महिलेची हत्या? दमानियांचा दावा.
कराडला बीड तुरूंगात मारहाण? नेमकं काय घडलं? अखेर प्रशासनाकडून सत्य उघड
कराडला बीड तुरूंगात मारहाण? नेमकं काय घडलं? अखेर प्रशासनाकडून सत्य उघड.
'मी मंत्री झालो हे पवारांना मान्यच नाही', जयकुमार गोरेंचा खरमरीत टोला
'मी मंत्री झालो हे पवारांना मान्यच नाही', जयकुमार गोरेंचा खरमरीत टोला.