Thane Firing : ठाण्यात कौटुंबिक वादातून एका व्यक्तीकडून कुटुंबावर गोळीबार, सुदैवाने कोणतीही जीवितहानी नाही

राजेश शर्मा हे ठाण्यातील लोढा लकजिरीया येथे कुटुंबीयांसोबत राहतात. शर्मा कुटुंबात गेल्या अनेक दिवसापासून कौटुंबिक आणि मालमत्तेवरुन वाद सुरु आहेत. शुक्रवारी संध्याकाळी 6.30 वाजता दारुच्या नशेत राजेश शर्मा यांचा पुन्हा कुटुंबीयांसोबत वाद सुरु झाला. हा वाद इतका विकोपाला गेला की रागाच्या भरात शर्मा यांनी स्वतःजवळील पिस्तुल काढून अंदाधुंद गोळीबार केला.

Thane Firing : ठाण्यात कौटुंबिक वादातून एका व्यक्तीकडून कुटुंबावर गोळीबार, सुदैवाने कोणतीही जीवितहानी नाही
ठाण्यात कौटुंबिक वादातून एका व्यक्तीकडून कुटुंबावर गोळीबारImage Credit source: TV9
Follow us
| Updated on: Apr 16, 2022 | 12:12 AM

ठाणे : घरगुती आणि संपत्तीच्या वादातून एका व्यक्तीने कुटुंबातील सदस्यांवर गोळीबार (Firing) केल्याची धक्कादायक घटना ठाण्यातील माजीवडा परिसरात घडली आहे. राजेश शर्मा असे गोळीबार करणाऱ्या व्यक्तीचे नाव आहे. नेहमीप्रमाणे शर्मा कुटुंबीयांत संपत्तीवरुन कौटुंबिक वाद (Dispute) झाला. हा वाद विकोपाला जाऊन शर्मा यांनी रागाच्या भरात घरामध्ये 5 राऊंड फायर करत अंदाधुंद गोळीबार केला. सुदैवाने यात कोणतीही दुखापत किंवा जीवितहानी झाली नाही. याप्रकरणी कापूरबावडी पोलिसांना माहिती देण्यात आली. कापूरबावडी पोलिसांनी आरोपी राजेश शर्मा यांना ताब्यात घेतले आहे. शर्मा यांच्याविरोधात कापूरबावडी पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद करण्याची प्रक्रिया सुरु आहे. (A man was firing on family member during family and property dispute in thane)

शर्मा यांनी 5 राऊंड फायर केले

राजेश शर्मा हे ठाण्यातील लोढा लकजिरीया येथे कुटुंबीयांसोबत राहतात. शर्मा कुटुंबात गेल्या अनेक दिवसापासून कौटुंबिक आणि मालमत्तेवरुन वाद सुरु आहेत. शुक्रवारी संध्याकाळी 6.30 वाजता दारुच्या नशेत राजेश शर्मा यांचा पुन्हा कुटुंबीयांसोबत वाद सुरु झाला. हा वाद इतका विकोपाला गेला की रागाच्या भरात शर्मा यांनी स्वतःजवळील पिस्तुल काढून अंदाधुंद गोळीबार केला. शर्मा यांनी 5 राऊंड फायर केले. सुदैवाने या घटनेत कोणालाही दुखापत किंवा जीवितहानी झाली नाही. घटनेची माहिती मिळताच कापूरबावडी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत शर्मा यांना ताब्यात घेतले. याप्रकरणी गुन्हा नोंद करण्याची प्रक्रिया सुरु असल्याची माहिती सहाय्यक पोलिस आयुक्त निलेश सोनवणे यांनी दिली आहे. (A man was firing on family member during family and property dispute in thane)

इतर बातम्या

Nagpur Crime : नागपूरमध्ये भंगारमध्ये विकत घेतलेल्या कारमध्ये आढळला मृतदेह

Kashmir Murder : कश्मीरात दहशतवाद्यांचा हैदोस सुरूच; सरपंचाची गोळ्या झाडून केली हत्या

Non Stop LIVE Update
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.