कल्याण : मारामारी, चोरी सारखे डझनभर गुन्हे दाखल असलेल्या इब्राहिम इस्माईल माजिद उर्फ पापा हड्डी याला बाजारपेठ पोलिसांनी सापळा रचून अटक (Arrest) केली आहे. विविध गुन्ह्यांत पापा हड्डी गेले आठ महिने फरार (Wanted) होता. पोलिस त्याचा आठ महिन्यांपासून कसून शोध घेत होते. अखेर आज तो राहत्या घरी आल्याची गुप्त माहिती पोलिसांना मिळाली. त्यानंतर तात्काळ पोलिसांनी त्याच्या घरी दाखल होत मोठ्या शिताफीने त्याला अटक केली. पापा हड्डीच्या अटकेचा थरार तब्बल तासभर चालला. मात्र पोलिसांनी त्याचे सगळे मनसुबे उधळून लावत त्याला अखेर पकडले. हड्डी याच्या विरोधात विविध पोलिस ठाण्यात 12 गुन्हे दाखल आहेत. (A notorious criminal Papa Haddi was arrested by the Kalyan Bazarpeth police)
कुख्यात गुन्हेगार असलेला पापा हड्डी हा त्याच्या राहत्या घरी आला असल्याची माहिती बाजारपेठ पोलिसांना मिळाली होती. या माहितीच्या आधारे पोलिसांनी त्याच्या अटकेसाठी सापळा रचला. पोलिसांनी त्याच्या घेराव घातला. पोलिसांची चाहूल लागताच पापा हड्डी घराच्या टेरेसवर जाऊन लपला. टेरेसवरील कठड्याच्या पलीकडे तो लपून बसला. टेरेसच्या पत्र्यावर पोलिसांना दिसू नये यासाठी त्याने अंगावरील कपडे काढले केवळ अंडरवेअरवर होता. पोलिस आणि हड्डी यांच्यात लपाछपीचा खेळ सुरु होता. टेरेसवर हड्डीच्या पायाचे ठसे दिसले. त्यावरुन पोलिसांना खात्री पटली की तो इथेच लपून बसला आहे.
पोलिस टेरेसवरुन हटत नाही हे पाहून हड्डीने टेरेसवरुन उडी मारली. तो पळून जाण्याचा प्रयत्न करीत होता. त्यावेळी खाली दबा धरुन बसलेला पोलिस नेमका त्याच्या समोर आाला. त्याने पोलिसांना झटका देत तिथूनही पळ काढण्याचा प्रयत्न केला. इतकेच नाही त्याला पकडण्यासाठी त्याचा पाठलाग करणाऱ्या पोलिसांच्या अंगावर त्याने रस्त्यातील उभी असलेली बाईक ढकलण्याचा प्रयत्न केला. मात्र पोलिसांनी त्याचे सगळे मनसुबे उधळून लावत त्याला अखेर पकडले. (A notorious criminal Papa Haddi was arrested by the Kalyan Bazarpeth police)
इतर बातम्या
Roha Suicide : रोह्यात आरोपीची पोलिस स्टेशनमधील लॉकअपमध्ये गळफास घेऊन आत्महत्या