VIDEO : पोलीस चौकीबाहेरच लष्करी जवानाला मारहाण; अंबरनाथमध्ये टोळक्याची दादागिरी

हुतात्मा चौक परिसरातून तक्रारदार लष्करी जवान त्यांच्या दुचाकीवरून घरी निघाले होते. त्यावेळी एक दुचाकीस्वार त्यांच्यासमोर मोबाईलवर बोलत गाडी चालवत होता. जवानाने त्याला बाजूला थांबून फोनवर बोलून घे, असे सांगितले. त्यावर संतापलेल्या दुचाकीस्वाराने जवानाला हुतात्मा चौकातील पोलीस चौकीसमोर थांबवले आणि शिवीगाळ केली.

VIDEO : पोलीस चौकीबाहेरच लष्करी जवानाला मारहाण; अंबरनाथमध्ये टोळक्याची दादागिरी
प्रातिनिधीक फोटो
Follow us
| Updated on: Dec 25, 2021 | 9:11 PM

अंबरनाथ : अंबरनाथमध्ये पोलीस चौकीबाहेरच एका लष्करी जवानाला मारहाण करण्यात आल्याची घटना घडली आहे. ही संपूर्ण घटना मोबाईल कॅमेरामध्ये चित्रित झाली आहे. अंबरनाथ पूर्वेकडील हुतात्मा चौकात आज संध्याकाळी पावणेसहाच्या सुमारास ही घटना घडली. टोळक्याच्या या दादागिरीने परिसरात प्रचंड दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे. लष्करी जवानाच्या बाबतीत जर पोलिस चौकीबाहेर असा प्रकार घडत असेल, तर सर्वसामान्य नागरिकांच्या सुरक्षेचे काय? असा सवाल उपस्थित केला जात आहे.

गाडी चालवत फोन बोलताना रोखल्याने जवानाला मारहाण

हुतात्मा चौक परिसरातून तक्रारदार लष्करी जवान त्यांच्या दुचाकीवरून घरी निघाले होते. त्यावेळी एक दुचाकीस्वार त्यांच्यासमोर मोबाईलवर बोलत गाडी चालवत होता. जवानाने त्याला बाजूला थांबून फोनवर बोलून घे, असे सांगितले. त्यावर संतापलेल्या दुचाकीस्वाराने जवानाला हुतात्मा चौकातील पोलीस चौकीसमोर थांबवले आणि शिवीगाळ केली. यावर या जवानाने पोलीस चौकीत जाऊन पोलिसांची मदत घेण्याचा प्रयत्न केला, मात्र या पोलीस चौकीला कुलूप होते. यानंतरही गुंड प्रवृत्तीचा दुचाकीस्वार शिवीगाळ करत असल्याने जवानाने आपण ‘आर्मीवाला’ असल्याचे सांगितले. मात्र त्याचाही गुंड प्रवृत्तीच्या दुचाकीस्वारावर काहीच परिणाम झाला नाही.

उलट त्याने थेट लष्कराच्या नावाने शिवीगाळ सुरू केली. यानंतर जवानाच्या कानशिलात लगावत मारण्यासाठी त्याने काठीही आणली. ही काठी पायावर मारत गुंड दुचाकीस्वाराने अक्षरशः तोडली. मात्र इतक्यावरही समाधान न झाल्याने त्याने साथीदाराला बाजूच्या गॅरेजमधून सायलेन्सरचा रॉड आणायला सांगितले आणि स्वतःदेखील रॉड आणायला गेला. यामुळे जवानाच्या जीवाला धोका निर्माण होऊ शकला असता. त्यामुळे जवान तिथून सरळ अंबरनाथ पश्चिम दिशेला गेले. मात्र दोन दुचाकीवरील तीन गुंड प्रवृत्तीच्या तरुणांनी त्यांचा पाठलाग सुरू केला.

पोलिसांचा हद्दीच्या कारणावरून निष्काळजीपणा

लष्करी जवान हे स्वतःला वाचवण्यासाठी दुचाकीवरुन मटका चौकापासून लक्ष्मीनारायण टॉकीजपर्यंत जात होते. त्यावेळी गाडीवर लाथांनी आणि काठीने मारत तिघे गुंड त्यांना थांबवण्याचा प्रयत्न करत होते. मात्र जवानाने गाडी थेट अंबरनाथ पश्चिम पोलीस ठाण्याबाहेर नेऊन थांबवली. तिथे बाहेरच असलेल्या पोलीस अधिकाऱ्यांना त्यांनी आपल्यासोबत घडलेला प्रसंग सांगताच पोलीस अधिकारी त्यांच्यासोबत घटनास्थळी आले. मात्र हुतात्मा चौक परिसर हा शिवाजीनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत येत असल्याने त्यांनी या जवानाला शिवाजीनगर पोलीस ठाण्यात जाण्याचा सल्ला दिला.

घटनेबाबत शिवाजीनगर पोलीस अनभिज्ञ

दरम्यान, या घटनेबाबत शिवाजीनगर पोलिसांना विचारले असता, त्यांनी याबाबत अद्याप आमच्याकडे कोणतीही तक्रार आलेली नसल्याचे सांगितले. या जवानाच्या जागी एखाद्या पोलिसाला नुसती शिवीगाळ जरी झाली असती तरी याच पोलिसांनी तत्परतेने सरकारी कामात अडथळा आणल्याचा गुन्हा दाखल केला असता. त्यामुळे आता पुढे आलेल्या मोबाईल व्हिडिओच्या आधारे तरी शिवाजीनगर पोलीस त्या गुंड प्रवृत्तीच्या दुचाकीस्वारांना पकडतील का? असा सवाल उपस्थित होत आहे. (A soldier was beaten outside a police post in ambernath)

इतर बातम्या

Dombivali Crime: चाकूच्या धाकाने बँक मॅनेजरला लूटले; डोंबिवलीतील धक्कादायक प्रकार

Jammu-Kashmir : काश्मिर खोऱ्यात सुरक्षा दलांची धडाकेबाज कारवाई; 36 तासांत तिसरे एन्काऊंटर

Suresh Dhas : 'आरोपींचा तेरे नाम झाला पाहिजे', सुरेश धस यांचा आक्रोश
Suresh Dhas : 'आरोपींचा तेरे नाम झाला पाहिजे', सुरेश धस यांचा आक्रोश.
सुरेश धस अजितदादांच्या भेटीला, राजकीय घडामोडींना वेग; भेटीत काय चर्चा?
सुरेश धस अजितदादांच्या भेटीला, राजकीय घडामोडींना वेग; भेटीत काय चर्चा?.
'माझ्यापेक्षा जास्त अभ्यास असणाऱ्यांना...', पंकजा मुंडेंचं खोचक उत्तर
'माझ्यापेक्षा जास्त अभ्यास असणाऱ्यांना...', पंकजा मुंडेंचं खोचक उत्तर.
एसटी महामंडळात फ्री स्टाइल हाणामारी, दोन कंडक्टर आले आमने-सामने....
एसटी महामंडळात फ्री स्टाइल हाणामारी, दोन कंडक्टर आले आमने-सामने.....
फडणवीस, दादा नव्हे, या नेत्यामुळे मनसेची महायुतीसोबतची युती फिस्कटली?
फडणवीस, दादा नव्हे, या नेत्यामुळे मनसेची महायुतीसोबतची युती फिस्कटली?.
दिल्ली विधानसभा निवडणुकीचं बिगुल वाजलं, कधी होणार मतदान अन् निकाल कधी?
दिल्ली विधानसभा निवडणुकीचं बिगुल वाजलं, कधी होणार मतदान अन् निकाल कधी?.
बांगलादेशी बनला रत्नागिरीकर... शिरगाव ग्रामपंचायतीला पोलिसांची नोटीस
बांगलादेशी बनला रत्नागिरीकर... शिरगाव ग्रामपंचायतीला पोलिसांची नोटीस.
महाराष्ट्राची चिंता वाढली;7 वर्षीय मुलासह 13 वर्षीय मुलीला HMPVची लागण
महाराष्ट्राची चिंता वाढली;7 वर्षीय मुलासह 13 वर्षीय मुलीला HMPVची लागण.
मुडेंनी राजीनामा दिला? राजीनाम्याच्या प्रश्नावर म्हणाले, 'योग्य वेळी'
मुडेंनी राजीनामा दिला? राजीनाम्याच्या प्रश्नावर म्हणाले, 'योग्य वेळी'.
HMPV Virus : तुम्हाला 'ही' लक्षणं दिसताच सावध व्हा अन् अशी घ्या काळजी
HMPV Virus : तुम्हाला 'ही' लक्षणं दिसताच सावध व्हा अन् अशी घ्या काळजी.