Ulhasnagar Beating : फुगा मारल्याचा जाब विचारणाऱ्या विद्यार्थ्याला मारहाण, उल्हासनगरच्या मध्यवर्ती पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

जयेश हा होळीच्या दिवशी कोचिंग क्लासेसहून घरी जात होता. याच वेळी काही मुलं रस्त्यावरून येणाऱ्या जाणाऱ्या नागरिकांच्या अंगावर पाण्याने भरलेले फुगे मारत होते. त्यांनी जयेशच्या अंगावरही फुगा मारला. जयेशने याचा जाब विचारला असता याचा राग आल्याने एका तरुणाने त्याला बेदम मारहाण केली.

Ulhasnagar Beating : फुगा मारल्याचा जाब विचारणाऱ्या विद्यार्थ्याला मारहाण, उल्हासनगरच्या मध्यवर्ती पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
उल्हासनगरमधील धक्कादायक प्रकार!Image Credit source: TV9 Marathi
Follow us
| Updated on: Mar 18, 2022 | 10:27 PM

उल्हासनगर : अंगावर पाण्याचा फुगा मारल्याचा जाब विचारणाऱ्या एका 16 वर्षीय विद्यार्थ्याला मारहाण (Beating) करण्यात आल्याची घटना उल्हासनगरमध्ये घडली आहे. जयेश गिझलानी असे या विद्यार्थ्याचे नाव आहे. या विद्यार्थ्यांला चावीने डोळ्याजवळ मारण्यात आले. यात विद्यार्थ्याच्या डोळ्याजवळ दुखापत (Injury) झाली आहे. सुदैवाने त्याचा डोळा यात थोडक्यात बचावला. याप्रकरणी मध्यवर्ती पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपी फरार असून पोलिस त्याचा शोध घेत आहेत. (A Student beaten in Ulhasnagar, case registered at Central Police Station)

मारहाणीत विद्यार्थ्याच्या डोळ्याला जखम

जयेश हा होळीच्या दिवशी कोचिंग क्लासेसहून घरी जात होता. याच वेळी काही मुलं रस्त्यावरून येणाऱ्या जाणाऱ्या नागरिकांच्या अंगावर पाण्याने भरलेले फुगे मारत होते. त्यांनी जयेशच्या अंगावरही फुगा मारला. जयेशने याचा जाब विचारला असता याचा राग आल्याने एका तरुणाने त्याला बेदम मारहाण केली. या मारहाणीत जयेशच्या डोळ्याखाली गंभीर जखम झाल्याने त्याला उपचारांसाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या घटनेनंतर मध्यवर्ती पोलीस ठाण्यात मारहाण करणाऱ्या तरुणाला आणून बसवलं होतं. मात्र तिथून पोलिसांना तुरी देत तो पसार झाला. सध्या पोलिसांनी अज्ञाताविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

नाशिकमध्ये रुग्णालयात घुसून डॉक्टरच्या मुलाला बेदम मारहाण

नाशिकमध्ये रुग्णालयात व्यवस्थापक म्हणून काम पाहणाऱ्या डॉक्टरच्या मुलाला बेदम मारहाण केल्याची घटना घडली आहे. ही संपूर्ण घटना सीसीटीव्ही कॅमेरात कैद झाली आहे. नाशिकच्या म्हसरूळ परिसरातील लिलावती हॉस्पिटलमधील काल दुपारी ही घटना घडली आहे. मारहाण केल्यानंतर आरोपी फरार आहे. याप्रकरणी म्हसरूळ पोलिस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे. उपचारासाठी आणेलेल्या मित्रावर उपचार करण्यास डॉक्टरांनी विलंब केल्याने तोडफोड आणि मारहाण करण्यात आली. (A Student beaten in Ulhasnagar, case registered at Central Police Station)

इतर बातम्या

Pune Crime| इंदापूर पोलिसांची कामगिरी ! 20 लाखांच्याअवैद्य गुटख्यासह लाखोंचा मुद्देमाल जप्त

Buldhana Fake Note : नकली नोटा प्रकरणात MIM च्या माजी जिल्हाध्यक्षाला अटक, आतापर्यंत सात आरोपींना अटक

सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.
सैफवर चाकूने 6 वार पण 12 व्या मजल्यावरच्या घरात चोराची एन्ट्री कशी?
सैफवर चाकूने 6 वार पण 12 व्या मजल्यावरच्या घरात चोराची एन्ट्री कशी?.
कराडला कोठडी अन् वकिलांमध्येच जुंपली, कोर्टाबाहेर एकच गदारोळ अन्...
कराडला कोठडी अन् वकिलांमध्येच जुंपली, कोर्टाबाहेर एकच गदारोळ अन्....
वाल्मिक कराडच्या समर्थकांच्या आलं अंगात, महिलांमध्ये घुमतंय कोण?
वाल्मिक कराडच्या समर्थकांच्या आलं अंगात, महिलांमध्ये घुमतंय कोण?.
पंतप्रधान मोदी मुंबईत अन् मंत्री धनंजय मुंडे परळीत... नेमकं कारण काय?
पंतप्रधान मोदी मुंबईत अन् मंत्री धनंजय मुंडे परळीत... नेमकं कारण काय?.