Mobile Theft : कामानिमित्त आला आणि मोबाईल लंपास करून गेला, डोंबिवलीतील चोरीची घटना सीसीटीव्हीत कैद

डोंबिवली पूर्वेतील जिओजित फायनान्स लिमिटेडमध्ये काम करणाऱ्या सविता माहे या आपल्या ऑफिसमध्ये काम करत होत्या. यावेळी काही कामानिमित्त त्या मोबाईल टेबलवरच ठेवून बाहेर गेल्या होत्या. याच दरम्यान एक अनोळखी व्यक्ती हा पेपर देण्याच्या बहाण्याने त्यांच्या कार्यालयात आला आणि त्यांचा मोबाईल लबाडीने चोरी करून निघून गेला.

Mobile Theft : कामानिमित्त आला आणि मोबाईल लंपास करून गेला, डोंबिवलीतील चोरीची घटना सीसीटीव्हीत कैद
नालासोपाऱ्यात रेल्वे स्थानकात महिलेचा विनयभंग करणाऱ्या आरोपीला अटक
Follow us
| Updated on: Mar 03, 2022 | 11:27 PM

डोंबिवली : डोंबिवली पूर्वेतील एका फायनान्स कंपनीत काम करणाऱ्या एका महिलेचा मोबाईल (Mobile) अनोळखी व्यक्तीने चोरल्या (Theft)ची घटना आज सकाळी घडली. सविता माहे (44) असे या महिलेचे नाव आहे. ही संपूर्ण घटना सीसीटीव्ही (CCTV)त कैद झाली आहे. पेपर देण्याच्या बहाण्याने कार्यालयात आलेल्या चोरट्याने टेबलावर ठेवलेला मोबाईल लांबवला. याप्रकरणी रामनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिस सीसीटीव्हीच्या आधारे आरोपींचा शोध घेत आहेत. सदर महिला कामानिमित्त कंपनीतून बाहेर गेल्या होत्या. याचवेळी आरोपीने संधी साधून मोबाईल घेऊन पोबारा केला. (A thief came to the office for work in Dombivali and stole a mobile phone)

पेपर देण्याच्या बहाण्याने आला होता चोरटा

डोंबिवली पूर्वेतील जिओजित फायनान्स लिमिटेडमध्ये काम करणाऱ्या सविता माहे या आपल्या ऑफिसमध्ये काम करत होत्या. यावेळी काही कामानिमित्त त्या मोबाईल टेबलवरच ठेवून बाहेर गेल्या होत्या. याच दरम्यान एक अनोळखी व्यक्ती हा पेपर देण्याच्या बहाण्याने त्यांच्या कार्यालयात आला आणि त्यांचा मोबाईल लबाडीने चोरी करून निघून गेला. थोड्या वेळाने सविता परत आल्यावर त्यांचा मोबाईल फोन चोरी झाल्याचे लक्षात आले. याबाबतची माहिती सविता यांनी शिवसेनेचे माजी शहर प्रमुख भाऊसाहेब चोधरी यांना दिली. लागलीच चौधरी हे त्या महिलेसह रामनगर पोलीस ठाण्यात दाखल झाले आणि गुन्हा दाखल केला. पोलिसांनी तात्काळ कार्यालयातील सीसीटीव्ही तपासले. त्याच सीसीटीव्हीच्या आधारे पोलीस अनोळखी चोरट्याचा शोध घेत आहेत.

उस्मानाबाद शहरात चोरट्यांची दहशत

उस्मानाबाद शहरात चोरट्यांची दहशत मोठ्या प्रमाणात पसरली असून गेल्या एका महिन्यापासून शहरातील अनेक भागात नागरिक, तरुण लाठ्या, काठ्या, तलवारी हातात घेऊन रात्रभर जागता पहारा देत आहेत. तरुणांचे अनेक गट रात्रभर पहारा देत आहेत. नागरिकांची रात्रीची गस्त थांबविण्याचे आदेश सर्व पोलीस निरीक्षक यांना देण्यात आल्याचे अतिरिक्त पोलीस अधीक्षक नवनीत कॉवत यांनी सांगितले. नागरिकांना संरक्षण व गस्त घालण्याचे कोणत्याही प्रकारचे प्रशिक्षण नसते. त्यामुळे त्यांनी असे प्रकार करू नये. विनाकारण नागरिक एकाच वेळी एकत्र आल्यास कायदा व सुव्यवस्थेची स्थिती निर्माण होऊ शकते. चोर आले असल्यास तक्रारी द्या जेणेकरून तपास करता येईल, नागरिकांनी अफवा पसरवू नये असे आवाहन कॉवत यांनी केले आहे. (A thief came to the office for work in Dombivali and stole a mobile phone)

इतर बातम्या

Vijay Mallya : न्यायालयीन आदेशाचा अवमान प्रकरण, विजय मल्ल्याविरोधातील सुनावणी लांबणीवर

Rajasthan Murder : धक्कादायक ! पतीची कमाई चांगली नाही म्हणून महिलेने केली गळा दाबून हत्या

'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?
'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?.
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्..
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्...
वाल्मिक कराडला कोठडी अन् समर्थकांचा कोर्टाबाहेर एकच गोंधळ
वाल्मिक कराडला कोठडी अन् समर्थकांचा कोर्टाबाहेर एकच गोंधळ.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट, कराडला 7 दिवस पोलीस कोठडी
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट, कराडला 7 दिवस पोलीस कोठडी.
कराडविरोधात पुरावा नाही, हत्येचा गुन्हा कसा? आरोपीच्या वकिलांचा दावा
कराडविरोधात पुरावा नाही, हत्येचा गुन्हा कसा? आरोपीच्या वकिलांचा दावा.
सुरेश धसांकडून पुन्हा मुन्नीचा उल्लेख, आता म्हणाले, राष्ट्रवादीच्या...
सुरेश धसांकडून पुन्हा मुन्नीचा उल्लेख, आता म्हणाले, राष्ट्रवादीच्या....
Beed Case : 'ती' वेळ मिळती-जुळती, कराडच्या गुन्ह्यांची कुंडली समोर
Beed Case : 'ती' वेळ मिळती-जुळती, कराडच्या गुन्ह्यांची कुंडली समोर.
'...अन्यथा इज्जतीचा पंचनामा होईल', धसांचा अजित पवारांना खोचक टोला
'...अन्यथा इज्जतीचा पंचनामा होईल', धसांचा अजित पवारांना खोचक टोला.
PM Modi VIDEO : 'सुरतच जेवण आणि काशीच मरण...', मोदी नेमकं काय म्हणाले?
PM Modi VIDEO : 'सुरतच जेवण आणि काशीच मरण...', मोदी नेमकं काय म्हणाले?.
Indian Navy : INS निलगिरी, वाघशीर अन् सूरत जहाजाची वैशिष्ट्ये काय?
Indian Navy : INS निलगिरी, वाघशीर अन् सूरत जहाजाची वैशिष्ट्ये काय?.