चोरट्याने तर कमालच केली, सोनं असा लुटायचा, कळायचंहीसुद्धा नाही…
मोटारसायकलवरून येऊन महिलांच्या गळ्यातील सोनसाखळी चोरून हैदोस घालणारा जो सराईत चोरट्याला ताब्यात घेतले आहे. आता त्याच्याकडून आणखी कोण कोणत्या गुन्ह्यांची उकल होते. त्याचाही तपास पोलीस करत आहेत
वसई : गेल्या काही दिवसांपासून ठाणे, मुंबईसह पालघर जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात चोऱ्यांचे प्रमाण वाढले आहे. घरफोडी, सोन्याचे दागिने लंपास करणे, महिलांच्या गळ्यातील सोनसाखळी पळवणे असे प्रकार गेल्या काही दिवसांपासून प्रचंड वाढले आहेत. असाच एक प्रकार वसई पोलिसांच्या हद्दीत घडत असताना त्या सोन्याचे दागिने पळवणाऱ्या चोरट्याला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. चोरट्याला पोलिसांनी ताब्यात घेतल्यानंतर त्याचा अनेक गुन्ह्यात सहभाग असल्याचे निष्पण्ण झाले आहेत.
पोलिसांनी सांगितले की, मोटारसायकलवरून येऊन महिलांच्या गळ्यातील सोनसाखळी चोरून हैदोस घालणारा जो सराईत चोरट्याला ताब्यात घेतले आहे.
तो चोरटा इराणी चोर असल्याचे पोलिसांनी सांगितले आहे. त्यामुळे आता वसई पोलिसांनी त्याचा आणखी कोणत्या कोणत्या गुन्ह्यात त्याचा सहभाग आहे त्याचा तपास सुरु केला आहे. सीसीटीव्हीच्या माध्यमातून वसई गुन्हे कक्ष शाखा 2 च्या पथकाने आरोपीच्या मुसक्या आवळण्यात त्याला यश आले आहे.
अटक केलेल्या आरोपीने माणिकपूर, वालीव, आचोळा, नालासोपारा पोलीस ठाण्यातील 7 गुन्ह्यांची कबुली दिली असून, त्याच्याकडून गुन्ह्यात वापरलेली एक मोटारसायकल, चोरीस गेलेले 87 ग्रॅम सोन्याचे दागिने असा 3 लाख 31 हजार 500 रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे. वसई पोलिसांनी अटक केलेला आरोपी हा सराईत असून त्याच्यावर संघटित गुन्हेगारी (MCOCA) च्या 2 गुन्ह्यांसह , जबरी दुखापत, जबरी चोरी असे 21 गुन्हे विविध पोलीस ठाण्यात दाखल असल्याचेही पोलिसांनी सांगितले.
अब्बास अमजद ईराणी (वय 24) असे सराईत सोनसाखळी चोराचे नाव असून हा कल्याणच्या पाटील नगर येथील फातिमा मंजिलमध्ये राहणारा असल्याचेही पोलिसांनी सांगितले. या प्रकरणी त्याच्यासोबत आणखी कोणी साथीदार आहेत का त्याचाही शोध पोलीस घेत आहेत.