Mira-Bhyander Accident : दोघे मित्र बाईकवरुन घरी चालले होते, इतक्यात ओव्हरटेक करण्याच्या नादात भरधाव कार धडकली अन्…

प्रॉपर्टी डिलर असलेला तरुण बाईकवरुन मित्रासोबत घरी चालला होते. मात्र घरी पोहचण्यापूर्वीच रस्त्यात जे घडलं त्यानंतर तो थेट रुग्णालयातच पोहचला. मग घरी कधीच परतू शकला नाही.

Mira-Bhyander Accident : दोघे मित्र बाईकवरुन घरी चालले होते, इतक्यात ओव्हरटेक करण्याच्या नादात भरधाव कार धडकली अन्...
भरधाव कारची बाईकला धडक
Follow us
| Updated on: Aug 12, 2023 | 11:33 AM

मीरा-भाईंदर / 12 ऑगस्ट 2023 : मीरा-रोडमध्ये हिट अँड रनची घटना उघडकीस आली आहे. भरधाव कारने दुचाकीला धडक दिल्याने दुचाकीवरील एकाचा गंभीर जखमी होऊन मृत्यू झाला. तर दुसरा किरकोळ जखमी झाला. तरंग प्रमोद सिंग असे मयत बाईकस्वाराचे नाव आहे. तर मुकेश अनिल सोनी असे जखमी तरुणाचे नाव आहे. याप्रकरणी कारचालकाविरोधात भारतीय दंड संहितेच्या कलम 307 (हत्येचा प्रयत्न) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी आरोपी कार चालकाला अटक केली आहे. ड्वेन अँथनी डिसोझा असे अटक आरोपी चालकाचे नाव आहे. वाहतुकीचे नियम न पाळणाऱ्यांवर कडक कारवाई करण्याची मागणी होत आहे. तसेच वाहनचालकांच्या मुजोरीविरोधातही संताप व्यक्त करण्यात येत आहे.

कारने बाईकला धडक देत निघून गेली

पोलिसांनी माहितीनुसार, प्रॉपर्टी डिलर असलेला तरंग सिंग आणि मुकेश सोनी दोघे मित्र बाईकवरुन काशिमीराहून भाईंदर पश्चिमेकडे घरी चालले होते. यावेळी मीरा रोड येथील एस.के. स्टोन सिग्नलजवळ ओव्हरटेक करत असताना मागून येणाऱ्या भरधाव इंडिका कारने त्यांच्या दुचाकीला धडक दिली. धडकेमुळे बाईकस्वाराचे गाडीवरील नियंत्रण सुटले आणि दोघे खाली रस्त्यावर पडले. दुचाकीला धक्का देत कार चालक तेथून निघून गेला.

तरुणांनी कारवर दगड मारला म्हणून कारचालकाने धडक दिली

या घटनेमुळे संतापलेल्या बाईकस्वारांनी रस्त्यावरचा दगड उचलला. मोबाईलमध्ये कारच्या नंबरप्लेटचा फोटो काढला. यानंतर दोघांनी कारचा पाठलाग केला. उत्तन रोडवरील राय गावापर्यंत पाठलाग करुन कारवर दगडफेक केली. यानंतर दोघेही घरी परतत असताना कारने चालकाने त्यांचा पाठलाग करुन मुद्दाम त्यांना जोरदार धडक दिली. यात तरंग गंभीर जखमी झाला. त्याला उपचारासाठी मुंबईतील जे जे रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. तर मुकेश किरकोळ जखमी झाला.

हे सुद्धा वाचा

भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?.
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार.
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना.
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत.