Badlapur Murder : बदलापुरात तरुणाची डोक्यात दगड घालून हत्या, पोलिसांनी दोन संशयितांना घेतलं ताब्यात

जुवेलीकडून चामटोलीकडे जाणाऱ्या पुलाच्या शेजारी रस्त्यावरुन जाणाऱ्या नागरिकांनी प्रसादचा मृतदेह पडलेला पाहिला. त्यानंतर नागरिकांनी बदलापूर पूर्व पोलिसांना घटनेची माहिती दिली. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत मृतदेह ताब्यात घेतला. डोक्यात दगड घालून क्रूरपणे प्रसादची हत्या करण्यात आली होती.

Badlapur Murder : बदलापुरात तरुणाची डोक्यात दगड घालून हत्या, पोलिसांनी दोन संशयितांना घेतलं ताब्यात
बदलापुरात तरुणाची डोक्यात दगड घालून हत्याImage Credit source: TV9
Follow us
| Updated on: Apr 25, 2022 | 6:41 PM

बदलापूर : अज्ञात कारणावरुन एका तरुणा (Youth)ची डोक्यात दगड घालून हत्या (Murder) करण्यात आल्याची धक्कादायक घटना बदलापुरमधील जुवेली परिसरात घडली आहे. प्रसाद जिंजूरके (28) असे या हत्या करण्यात आलेल्या तरुणाचे नाव आहे. या हत्येप्रकरणी बदलापूर पूर्व पोलिसांनी दोन संशयितांना ताब्यात घेतले आहे. प्रसाद हा जवळच्याच सापेगावमध्ये असलेल्या पोद्दार एव्हरग्रीन सोसायटीत परिवारासह वास्तव्याला होता. आज सकाळी जुवेलीकडून चामटोलीकडे जाणाऱ्या पुलाच्या बाजूला प्रसाद याचा मृतदेह आढळून आला. याप्रकरणी बदलापूर पूर्व पोलिस ठाण्यात हत्येची नोंद करण्यात आली असून पोलिस पुढील तपास करीत आहेत. (A youth was stoned to death for an unknown reason in Badlapur)

डोक्यात दगड घालून तरुणाची हत्या

जुवेलीकडून चामटोलीकडे जाणाऱ्या पुलाच्या शेजारी रस्त्यावरुन जाणाऱ्या नागरिकांनी प्रसादचा मृतदेह पडलेला पाहिला. त्यानंतर नागरिकांनी बदलापूर पूर्व पोलिसांना घटनेची माहिती दिली. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत मृतदेह ताब्यात घेतला. डोक्यात दगड घालून क्रूरपणे प्रसादची हत्या करण्यात आली होती. पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेत बदलापूर ग्राणीण रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठवला. प्रसादची हत्या कोणत्या कारणावरुन करण्यात आली हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. याप्रकरणी काही वेळातच दोन संशयित आरोपींना ताब्यात घेतले आहे. पोलिस त्यांची कसून चौकशी करत आहेत. चौकशी अंतीच हत्येचा नेमका उलगडा होईल, असे बदलापूर पूर्व पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्रीकांत सोंडे यांनी सांगितले. (A youth was stoned to death for an unknown reason in Badlapur)

इतर बातम्या

Mumbai Accused Arrest : विरार लोकलमध्ये टॉय गन दाखवून महिलेला लुटणाऱ्या ट्रान्सजेंडरला अटक, बोरीवली जीआरपीची कारवाई

Dombivali Crime : डोंबिवलीत गुरू शिष्याच्या नात्याला काळिमा, प्रेमसंबंधातून स्पोर्ट्स कोचकडून विद्यार्थिनीला अमानुष मारहाण

कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'
कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'.
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?.
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले....
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात.
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.