अंबरनाथमध्ये सर्वात मोठी लसीकरण मोहीम, 30 हजार कामगारांना दिली जाणार मोफत लस

अंबरनाथ शहराला लागून असलेल्या आनंदनगर एमआयडीसीमध्ये शहरातील सर्वात मोठी लसीकरण मोहीम सुरू झाली आहे.

अंबरनाथमध्ये सर्वात मोठी लसीकरण मोहीम, 30 हजार कामगारांना दिली जाणार मोफत लस
AMBERNATH VACCINATION
Follow us
| Updated on: Aug 03, 2021 | 8:15 PM

ठाणे : अंबरनाथ शहराला लागून असलेल्या आनंदनगर एमआयडीसीमध्ये शहरातील सर्वात मोठी लसीकरण मोहीम सुरू झाली आहे. येथे एमआयडीसीतील कंपन्यांच्या वतीने तब्बल 30 हजार कामगारांना स्वखर्चानं लस दिली जाणार आहे. (About 30 thousand workers will be vaccinated on behalf of industrial companies Ambernath Anand Nagar MIDC)

30 हजार कामगारांना आम संघटनेच्या माध्यमातून लस

अंबरनाथच्या आनंदनगर एमआयडीसीमध्ये जवळपास 2 हजारापेक्षाही जास्त कंपन्या आहेत. संपूर्ण एमआयडीसीमध्ये मिळून 50 हजारांपेक्षा जास्त कामगार काम करतात. या कामगारांना लस देण्यासाठी कंपन्यांची संघटना असलेल्या अ‌ॅडिशनल अंबरनाथ मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशन म्हणजेच आमा संघटनेनं पुढाकार घेतलाय. एमआयडीसीतील मोठ्या आणि बहुराष्ट्रीय कंपन्यांनी त्यांच्या कर्मचाऱ्यांचं लसीकरण यापूर्वी कंपनीतच करून घेतलं आहे. त्यामुळे उर्वरित स्मॉल स्केल इंडस्ट्रीजमध्ये काम करणाऱ्या जवळपास 30 हजार कामगारांना आता आम संघटनेच्या माध्यमातून लस दिली जाणार आहे.

दिवसाला किमान 2 हजार कामगारांचे लसीकरण

विशेष म्हणजे या लसीकरणाचा संपूर्ण खर्च कंपन्या उचलणार आहेत. अंबरनाथ एमआयडीसीतील आमा संघटनेच्या कार्यालयात आजपासून या लसीकरणाला सुरुवात झाली असून दिवसाला किमान 2 हजार याप्रमाणे लसीकरण केलं जाणार आहे. या लसीकरण मोहिमेत कोव्हिशील्ड ही लस जिया हॉस्पिटल या अंबरनाथच्या खासगी रुग्णालयामार्फत दिली जात आहे. यासाठी प्रत्येक लसीमागे 780 रुपये शुल्क आहे. हे संपूर्ण शुल्क कंपन्या भरणार आहेत.

महिनाभरात सर्व कामगारांचं लसीकरण पूर्ण करण्याचं उद्दिष्ट

आज या मोहिमेच्या पहिल्याच दिवशी लसीसाठी कामगारांच्या रांगा लागल्या होत्या. पुढील महिनाभरात या सर्व कामगारांचं लसीकरण पूर्ण करण्याचं आपलं उद्दिष्ट असल्याचं यावेळी आमा संघटनेचे अध्यक्ष उमेश तायडे यांनी सांगितलं.

इतर बातम्या :

मोठी बातमी : ऑडिओ क्लिपमधील आवाज संजय राठोड यांचाच, पुणे पोलिसांच्या दुजोऱ्याने माजी मंत्र्यांच्या अडचणी वाढल्या

अश्लील चित्रपट निर्मिती प्रकरणी गहना वशिष्ठला झटका, कोर्टाकडून दिलासा नाहीच, नेमकं काय-काय घडलं?

‘खावाले काळ, नी भूईले भार म्हणजे ठाकरे सरकार’, नंदुरबार दौऱ्यात आमदार आशिष शेलार यांचा घणाघात

(About 30 thousand workers will be vaccinated on behalf of industrial companies Ambernath Anand Nagar MIDC)

'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद.