Ulhasnagar Incident : उल्हासनगरात धोकादायक इमारतीची परांची कोसळली, अनेक गाड्यांचं नुकसान

उल्हासनगरच्या कॅम्प 3 मधील सपना गार्डन परिसरात शहेनशाह नावाची इमारत आहे. ही इमारत धोकादायक असल्याने पावसाळ्यापूर्वीच इमारतीतील रहिवाशांना नोटीस बजावून इमारत रिकामी करण्यात आली होती. त्यानंतर इमारतीची दुरुस्ती करण्यासाठी परांची बांधण्यात आली होती.

Ulhasnagar Incident : उल्हासनगरात धोकादायक इमारतीची परांची कोसळली, अनेक गाड्यांचं नुकसान
उल्हासनगरात धोकादायक इमारतीची परांची कोसळलीImage Credit source: TV9
Follow us
| Updated on: Jun 06, 2022 | 12:44 AM

उल्हासनगर : धोकादायक (Dangerous) इमारतीच्या दुरुस्तीसाठी बांधलेली परांची कोसळल्याची घटना उल्हासनगरमध्ये घडली आहे. सुदैवाने या घटनेत कुणालाही इजा (Injury) किंवा जीवितहानी झालेली नाही. मात्र ही परांची रस्त्यावर उभ्या असलेल्या गाड्यांवर कोसळल्याने गाड्यां (Vehicles)चं काही प्रमाणात नुकसान झालं आहे. उल्हासनगर कॅम्प 3 मध्ये इमारत दुरुस्तीचे काम सुरु असताना ही दुर्घटना घडली आहे. या घटनेची माहिती मिळताच उल्हासनगर महापालिकेच्या अग्निशमन दलाने घटनास्थळी धाव घेत ही परांची हटवायला सुरुवात केली. तसेच उल्हासनगरचे आमदार कुमार आयलानी यांनी सुद्धा घटनास्थळाला भेट देऊन परिस्थितीची पाहणी केली.

दोऱ्या कमकुवत झाल्याने घडली दुर्घटना

उल्हासनगरच्या कॅम्प 3 मधील सपना गार्डन परिसरात शहेनशाह नावाची इमारत आहे. ही इमारत धोकादायक असल्याने पावसाळ्यापूर्वीच इमारतीतील रहिवाशांना नोटीस बजावून इमारत रिकामी करण्यात आली होती. त्यानंतर इमारतीची दुरुस्ती करण्यासाठी परांची बांधण्यात आली होती. मात्र अनेक दिवसांपासून ही परांची तशीच असल्याने तिच्या दोऱ्या कमकुवत होऊन आज दुपारच्या सुमारास अचानक ही परांची रस्त्यावर कोसळली. सुदैवाने या वेळी रस्त्यावर कुणीही पादचारी नसल्याने कुणालाही इजा झालेली नाही. मात्र ही परांची रस्त्यावर लावलेल्या वाहनांवर कोसळल्याने या गाड्यांचं काही प्रमाणात नुकसान झालं आहे. (Accident while repairing a dangerous building in Ulhasnagar, damage to several vehicles)

हे सुद्धा वाचा

तुमच्य़ा राजकारणात आम्हा कलाकारांना का ओढता? प्राजक्ता माळी यांचा सवाल
तुमच्य़ा राजकारणात आम्हा कलाकारांना का ओढता? प्राजक्ता माळी यांचा सवाल.
'...यातून न्याय मिळाला नाहीत तर...,' काय म्हणाले संभाजीराजे छत्रपती
'...यातून न्याय मिळाला नाहीत तर...,' काय म्हणाले संभाजीराजे छत्रपती.
Beed Morcha: दोन तारखेच्या आधी अटक करा, अन्यथा... - बंजरंग सोनावणे
Beed Morcha: दोन तारखेच्या आधी अटक करा, अन्यथा... - बंजरंग सोनावणे.
'पंकूताई...वाट वाकडी करुन...,' काय म्हणाले सुरेश धस
'पंकूताई...वाट वाकडी करुन...,' काय म्हणाले सुरेश धस.
डॉ. मनमोहन सिंग यांना अखेरचा निरोप, शासकीय इतमामात अंत्यसंस्कार
डॉ. मनमोहन सिंग यांना अखेरचा निरोप, शासकीय इतमामात अंत्यसंस्कार.
Beed Morcha : सत्य महत्वाचं असते, सत्ता नाही...काय म्हणाले बच्चू कडू
Beed Morcha : सत्य महत्वाचं असते, सत्ता नाही...काय म्हणाले बच्चू कडू.
सरपंच देशमुख हत्या प्रकरणात न्यायासाठी मोर्चा सुरु, मुंग्यासारखी गर्दी
सरपंच देशमुख हत्या प्रकरणात न्यायासाठी मोर्चा सुरु, मुंग्यासारखी गर्दी.
18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?
18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?.
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती.
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल.