तीव्र वळणावर नियंत्रण सुटले, माथेरानच्या घाटात दुचाकीस्वारासोबत काय घडले?

कल्याणमध्ये राहणारा तरुण माथेरानला फिरण्यासाठी चालला होता. मात्र माथेरानला जात असतानाच घाटात त्याचे गाडीवरील नियंत्रण सुटले आणि हा प्रवास त्याचा अखेरचा ठरला.

तीव्र वळणावर नियंत्रण सुटले, माथेरानच्या घाटात दुचाकीस्वारासोबत काय घडले?
Image Credit source: TV9
Follow us
| Updated on: Mar 24, 2023 | 3:05 PM

नेरळ / निनाद करमरकर : गाडीवरील ताबा सुटल्याने एका तरुणाचा अपघात झाल्याची घटना माथेरानच्या घाटात घडली आहे. या अपघातात दुचाकी चालकाचा मृत्यू झाला, तर मागे बसलेली व्यक्ती किरकोळ जखमी झाली आहे. जुमापट्टी परिसरात तीव्र वळणावर स्कुटरवरील ताबा सुटल्यानं हा अपघात झाला. याप्रकरणी नेरळ पोलीस ठाण्यात अपघाती मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. सदर तरुण फिरण्यासाठी माथेरानला आला होता. मात्र माथेरानला पोहचण्याआधीच घाटात काळाने त्याच्यावर झडप घातली.

घाटात वाहनावरील नियंत्रण सुटले

कल्याण तालुक्यातील वरप इथं राहणारा 27 वर्षीय तरुण माथेरानला आला होता. जुमापट्टी परिसरात एका तीव्र वळणावर त्याचा स्कुटरवरील ताबा सुटला आणि त्याच्या स्कुटरने संरक्षक लोखंडी रेलिंगला जोरदार धडक दिली. या धडकेमुळे तरुण हा उडून लोखंडी रेलिंगला धडकला. यात त्याच्या डोक्याला गंभीर इजा झाली, तर त्याच्या मागे बसलेली व्यक्ती किरकोळ जखमी झाली.

पोलिसांनी रुग्णालयात नेले मात्र उशिर झाला होता

अपघाताची माहिती मिळताच नेरळ पोलीस तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी तरुणाला उपचारासाठी तात्काळ नेरळ प्राथमिक आरोग्य केंद्रात नेलं. मात्र डॉक्टरांनी त्याला तपासून मृत घोषित केलं. या अपघाताबाबत नेरळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस करत आहेत.

हे सुद्धा वाचा

बुलढाण्यात टिप्परची एसटीला धडक

अवैध रेती वाहतूक करणाऱ्या टिप्परने एसटी बसला धडक दिल्याची घटना बुलढाण्यात घडली. मेहकर-जानेफळ रस्त्यावर हा अपघात घडला. या धडकेत बसमधील 17 प्रवाशी जखमी झाले आहेत. धडक दिल्यानंतर टिप्पर चालक टिप्पर घेऊन घटनास्थळावरून फरार झाला. सर्व जखमींना मेहकरच्या रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.

श्रीरामाच्या घोषणा,जीवाला धोका रात्री 3.30 वाजता अंधारेंसोबत काय झालं?
श्रीरामाच्या घोषणा,जीवाला धोका रात्री 3.30 वाजता अंधारेंसोबत काय झालं?.
थर्टी फस्ट पार्टीसाठी किल्ल्यांवर जाताय? पण असं वागाल तर १ लाखांचा दंड
थर्टी फस्ट पार्टीसाठी किल्ल्यांवर जाताय? पण असं वागाल तर १ लाखांचा दंड.
भाजपच्या या 4 नेत्याचं सत्तेत कमबॅक, लालदिव्याची प्रतीक्षा अखेर संपली
भाजपच्या या 4 नेत्याचं सत्तेत कमबॅक, लालदिव्याची प्रतीक्षा अखेर संपली.
भरतशेठ... झाले थोडे लेट पण कॅबिनेटच आणलं थेट! मंत्रिपदाची माळ गळ्यात
भरतशेठ... झाले थोडे लेट पण कॅबिनेटच आणलं थेट! मंत्रिपदाची माळ गळ्यात.
'हा मैं नाराज, वहाँ नही रहेना..',भुजबळांचा भडका अन् हाती बंडाचा झेंडा?
'हा मैं नाराज, वहाँ नही रहेना..',भुजबळांचा भडका अन् हाती बंडाचा झेंडा?.
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.