कल्याण : खिडकीतून लोकांच्या बेडरुममध्ये डोकाऊन पाहणे रिक्षा चालकास महागात पडले आहे. कल्याणमधील उंबर्डे गावात झालेल्या हत्या प्रकरणी खडकपाडा पोलिसांनी सोपान पंजे नावाच्या युवकाला अटक केली आहे. सोपानने रिक्षा चालक अभिमान भंडारी याची धारदार शस्त्राने हत्या केली होती. अभिमान दररोज पहाटे सोपान याच्या वहिनीच्या बेडरुमच्या खिडकीतून डोकावून पाहत असे. त्याला वारंवार समजावले होते, तरी देखील तो ऐकत नसल्याने सोपान याने अभिमान याची हत्या केल्याची कबुली दिली आहे.
कल्याण पश्चिमेतील उंबर्डे गावातील रहिवासी अभिमान भंडारी हे नेहमीप्रमाणे पहाटे 4 च्या सुमारास गावातील सार्वजनिक शौचालयात शौच करण्यासाठी गेले होते. यावेळी शौचालयात आधीच दबा धरुन बसलेल्या अज्ञात व्यक्तींनी त्यांच्यावर हल्ला केला. भंडारी यांच्यावर धारदार शस्त्राने सपासप वार करुन हल्लेखोर तेथून पळून गेले होते. या घटनेमुळे गावात एकच खळबळ उडाली होती.
खडकपाडा पोलिसांनी हत्येचा गुन्हा दाखल करीत तपास सुरु केला. डीसीपी सचिन गुंजाळ, एसीपी उमेश माने पाटील, वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक पवार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी 24 तासांच्या आतच या प्रकरणाचा छडा लावला. या प्रकरणात पोलिसांनी सखोल तपास करीत अभियान याची हत्या करणाऱ्या तरुणाला ताब्यात घेतले. आरोपीच्या अटकेनंतर जी माहिती समोर आली ती अतिशय धक्कादायक आहे.
अभिमानच्या विकृतीमुळेच त्याचा अंत झाल्याचे समोर आले आहे. अभिमान याला एक वाईत सवय होती. रात्रीच्या वेळी शेजाऱ्यांच्या बेडरुमध्ये डोकावून पाहत असे. एका रात्री सोपान पंजे याने पाहिले तो त्याच्या वहिनीच्या घरातील खिडकीतून त्यांच्या बेडरुममध्ये डोकावून पाहत आहे. दोन तीन वेळा असा प्रकार घडला. सोपानचा भाऊ एका प्रकरणात जेलमध्ये आहे. वारंवार सांगून सुद्धा अभिमान हा ऐकण्यास तयार नव्हता. अखेर त्याने तोच प्रकार केला. यामुळे सोपानला राग अनावर झाला. त्याने अभिमान याची धारदार शस्त्राने हत्या केली. (Accused arrested for killing rickshaw driver in Kalyan)
इतर बातम्या
लग्न मंडपात जल्लोषात गोळीबार, पोटात गोळी लागून भाजप पदाधिकाऱ्याच्या भावाचा मृत्यू
महाविद्यालयीन तरुणावर अनैसर्गिक अत्याचार, व्हिडीओ शूट करुन धमकी, सांगलीत पोलिसावर गुन्हा