Ganja Smuggling : गांजा तस्करी प्रकरणी पुन्हा शिरपूर पोलिसांच्या रडावर, तीन जणांना अटक
या छाप्यात त्यांना सुमारे सहा किलो गांजा आढळून आला. मानपाडा पोलिसांनी हा गांजा ताब्यात घेत घरात आढळलेला मोबाईल फोन, रोख रक्कम, गाडी असा एकूण 1 लाख 87 हजारांचा मुद्देमाल जप्त केला. या प्रकरणी मयुर जडाकर व अखिलेश धुळप या दोघांना अटक केली.
डोंबिवली : धुळ्यातील शिरपूरमधून डोंबिवलीत गांजाची तस्करी केली जात असल्याचे पुन्हा एकदा उघड झाले आहे. काही दिवसांपूर्वी डोंबिवलीच्या मानपाडा पोलिसांनी गांजा (Ganja) तस्करी प्रकरणात तीन जणांना बेड्या (Arrest) ठोकल्या होत्या. पुन्हा शिरपूरमधून एका गांजा तस्कराला अटक केली आहे. यासोबतच डोंबिवलीतील दोन जणांना अटक केली आहे. शिरपूर आता पोलिसांच्या रडावर आले आहे. मोठ्या प्रमाणात गांजाची तस्करी केली जात आहे. तरुण तरुणींना हा गांजा पुरविला जात आहे. हा गांजा शहरातील विद्यार्थी व उच्चशिक्षित लोकांना विकला जात असल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला असून त्या दिशेने पोलिसांनी तपास सुरू केला आहे. (Accused arrested for smuggling ganja from Dhule to Dombivali)
गांजा तस्करी करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश
काही दिवसांपूर्वी डोंबिवलीच्या मानपाडा पोलिसांनी गांजा तस्करी करणाऱ्या एका टोळीचा पर्दाफाश केलं होतं. यानंतर डोंबिवलीचे एसीपी जे. डी. मोरे आणि वरिष्ठ पोलीस निरीक्षक शेखर बागडे यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास सुरू होता. गांजा तस्करी करणाऱ्या आरोपींवर त्यांची करडी नजर होती. मानपाडा पोलिस ठाण्याचे पोलिस अधिकारी सुनिल तारमळे यांना डोंबिवलीतील देसले पाडा येथील एका घरात विक्रीसाठी गांजाचा साठा करून ठेवल्याची माहिती मिळाली होती. या माहितीच्या आधारे सुनील तारमळे यांच्या पथकाने देसले पाडा येथील एका इमारतीतील घरात छापा टाकला.
पोलिसांकडून 1 लाख 87 हजारांचा मुद्देमाल जप्त
या छाप्यात त्यांना सुमारे सहा किलो गांजा आढळून आला. मानपाडा पोलिसांनी हा गांजा ताब्यात घेत घरात आढळलेला मोबाईल फोन, रोख रक्कम, गाडी असा एकूण 1 लाख 87 हजारांचा मुद्देमाल जप्त केला. या प्रकरणी मयुर जडाकर व अखिलेश धुळप या दोघांना अटक केली. या दोघांकडे चौकशी केली असता सदरचा गांजा त्यांनी शिरपूर येथून विकत आणला असल्याचे माहिती दिली. पोलिसांनी शिरपूर घाटात सुनील लोक भजन पावरा यांना शिरपूर येथून अटक केली. धुळे जिल्ह्यातील शिरपूर लाकड्या हनुमान गाव येथे एका जंगलात गांजाची शेती केली जाते. तेथून हा गांजा चोरट्या मार्गाने शहरात आणून विक्री केला जात असल्याचे पोलिस तपासात उघड झाले आहे. त्यामुळे आता शिरपूर पोलिसांच्या रडारवर आले आहे. (Accused arrested for smuggling ganja from Dhule to Dombivali)
इतर बातम्या
Solapur Accident | चालकाचा ताबा सुटला, दोन ट्रॉलीसह ट्रॅक्टर उलटून करमाळ्यात अपघात
Pune : बिबवेवाडीतल्या टोळीच्या पुणे पोलिसांनी आवळल्या मुसक्या, MCOCA कायद्यानुसार गुन्हा दाखल