Thane Death Sentence : अल्पवयीन मुलीवर अत्याचार, हत्या प्रकरणी पोक्सो न्यायालयाकडून आरोपीला मृत्युदंडाची शिक्षा
ठाणे विशेष पोक्सो न्यायालयात विशेष सरकारी वकील संजय मोरे यांनी न्यायालयात सांगितले. मृतक चिमुरडी भिवंडीच्या सुभाष नगर किरीवली गाव, परिसरात राहत होती. तर आरोपी भरतकुमार धनिराम कोरी हा देखील याच परिसरात राहत होता. घटनेच्या वेळी मृतक 7 वर्षाची होती.
ठाणे : अल्पवयीन चिमुरडीचे अपहरण करून तिच्यावर लैंगिक अत्याचार (Abusing) करून दगडाने निर्घृण हत्या (Death) केल्याप्रकरणी आरोपीला फाशीची शिक्षा सुनावण्यात आली आहे. भरतकुमार धनिराम कोरी (33) असे आरोपीचे नाव असून ठाणे विशेष पोक्सो न्यायालयाच्या न्यायमूर्ती के.डी. शिरभाते यांनी फाशीची शिक्षा आणि 10 हजाराचा दंड ठोठावली. सदरची घटना 22 डिसेंबर, 2019 रोजी किरीवली, भिवंडी येथे घडली होती. या खटल्यात विशेष सरकारी वकील संजय मोरे यांनी युक्तीवाद करून न्यायालयात तब्बल 25 साक्षीदार तपासले. न्यायालयासमोर सादर सक्षीदार आणि पुरावे, परिस्थितीजन्य पुरावे ग्राह्य धरून आरोपी भरत कुमार कोरी याला मृत्युदंडाची शिक्षा ठोठावण्यात आली.
दोन वर्षापूर्वी घडली होती अत्याचार आणि हत्येची घटना
ठाणे विशेष पोक्सो न्यायालयात विशेष सरकारी वकील संजय मोरे यांनी न्यायालयात सांगितले. मृतक चिमुरडी भिवंडीच्या सुभाष नगर किरीवली गाव, परिसरात राहत होती. तर आरोपी भरतकुमार धनिराम कोरी हा देखील याच परिसरात राहत होता. घटनेच्या वेळी मृतक 7 वर्षाची होती. 22 डिसेंबर, 2019 रोजी चिमुरडीवर आरोपीने आईस्क्रीम देण्याच्या बहाण्याने बोलावून तिच्यावर अत्याचार करून तिच्या डोक्यात दगड मारून तिची हत्या केली होती. सदर चिमुरडीचा मृतदेह 22 डिसेंबर,2019 रोजी भोईवाडा पोलिसांना सापडला. भोईवाडा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक कल्याणराव करपे यांच्या मार्गदर्शनाखाली तपास सुरू केला. तत्पुर्वी पोलीस ठाण्यात अज्ञात आरोपीच्या विरोधात भादंवि 302, 364, 376 आणि पोक्सो कलम 4,8,9,10,12 नुसार गुन्हा दाखल करून आरोपीस अटक केली.
सरकारी वकीलांनी 25 साक्षीदार तपासले
सदर प्रकरण ठाणे विशेष पोक्सो न्यायालयात सुनावणी सुरू होती. सदर खटल्यात सरकारच्या वतीने विशेष सरकारी वकील संजय मोरे युक्तीवाद करीत होते. भोईवाडा पोलिसांना मृतदेह सापडला त्याच्या आदल्या रात्री अत्याचार आणि हत्येची घटना घडल्याचे वकील मोरे यांनी सांगितले. आरोपी भरतकुमार धनिराम कोरी याने मुलीला आईस्क्रीमचे आमिष दाखवून प्रथम अत्याचार केला आणि नंतर दगड डोक्यात घालून हत्या करून पोबारा केला होता. या खटल्यात सरकारी वकील संजय मोरे यांनी तब्बल 25 साक्षीदार न्यायालयासमोर उभे केले आणि तपासले. विशेष पोक्सो न्यायालयाच्या न्यायमूर्ती के डी शिरभाते यांनी दिलेल्या निकालात आरोपीवर लावलेले सर्व कलम पुराव्यासह सिद्ध करण्यात सरकारी वकील आणि तपास अधिकारी वरिष्ठ पोलीस निरीक्षक कल्याणराव करपे पोलीस शिपाई डी.ए. तोटेवाड, पोलीस हवालदार व्ही.व्ही.शेवाळे यांना यश मिळाले.
इतर बातम्या
Ankush Shinde : पिंपरी-चिंचवडचे नवनियुक्त पोलीस आयुक्त अंकुश शिंदे यांनी पदभार स्वीकारला