VIDEO | मास्क न वापरणाऱ्यांविरोधात कारवाई तीव्र करणार, केडीएमसी आयुक्तांची माहिती
कोरोनाच्या पहिल्या आणि दुसऱ्या लाटेच्या दरम्यान आजपर्यंत मास्क न वापरणाऱ्यांच्या विरोधात केलेल्या कारवाईतून महापालिकेने दीड कोटीपेक्षा जास्त दंड वसूल केला आहे. आता हीच कारवाई उद्यापासून पोलिसांच्या मदतीने पुन्हा तीव्र केली जाणार आहे.
कल्याण : राज्यातील पहिला ओमिक्रॉन व्हेरिएंटचा रुग्ण कल्याण डोंबिवलीत आढळून आल्याने महापालिका प्रशासन उद्यापासून मास्क न वापरणाऱ्यांच्या विरोधात दंडात्मक कारवाई तीव्र करणार असल्याची माहिती आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी दिली आहे. कोरोनाच्या पहिल्या आणि दुसऱ्या लाटेच्या दरम्यान आजपर्यंत मास्क न वापरणाऱ्यांच्या विरोधात केलेल्या कारवाईतून महापालिकेने दीड कोटीपेक्षा जास्त दंड वसूल केला आहे. आता हीच कारवाई उद्यापासून पोलिसांच्या मदतीने पुन्हा तीव्र केली जाणार आहे.
महापालिका हद्दीत असलेल्या कल्याण कृषी उत्पन्न बाजार समितीत व्यापारी, विकेत्यांची पहाटेपासून गर्दी असते. ही गर्दी बाजार समितीच्या प्रशासनाने स्वत: नियंत्रणात आणली पाहिजे. त्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी एक दिवसाआड 50 टक्के गाळे सुरु ठेवले पाहिजेत. कोणाला कधी व किती जणांना प्रवेश द्यावा यावर नियंत्रण आणले पाहिजे असे आयुक्तांनी सांगितले. महापालिका हद्दीत सभारंभासाठी 5 टक्के क्षमता असेल तर खुल्या मैदानात एकूण क्षमतेच्या 25 टक्केच मुभा असेल असे आयुक्तांनी सांगितले.
जास्तीत जास्त लसीकरणावर भर
ओमिक्रॉनचा धोका ओळखून लसीकरण जास्तीत जास्त करण्यावर महापालिका प्रशासनाने भर दिला आहे. जानेवारीपासून महापालिका हद्दीत लसीकरण सुरु आहे. महापालिका हद्दीत 18 वर्षावरील नागरिकांची लोकसंख्या 13 लाख 59 हजार इतकी आहे. या लोकसंख्येचे लसीकरण करण्याचे लक्ष्य महापालिकेने डोळ्यासमोर ठेवले आहे. आतापर्यंत पहिला डोस 71 टक्के जणांनी घेतला आहे. तर दुसरा डोस 52 टक्के घेतला आहे. ज्यांनी पहिला आणि दुसरा डोस घेतला नसेल त्यांनी तातडीने घ्यावा असे आवाहन आयुक्तांनी केले आहे.
परदेशातून आलेल्या 295 जणांपैकी 109 जणांचा केडीएमसीकडून शोध सुरु
आतापर्यंत परदेशातून प्रवास करुन कल्याण डोंबिवलीत 295 जण आले आहेत. त्यापैकी 71 जण हे हायरिस्क देशातील आहेत. 295 जणांपैकी 109 जणांचे कॉन्टक्ट ट्रेसिंग सुरु आहे. त्यांचा शोध महापालिकेकडून घेतला जात आहे अशी माहिती महापालिकेचे आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी दिली आहे. आयुक्तांनी सांगितले की, 295 जणांपैकी ज्यांचे कॉन्टक्ट ट्रेसिंग झाले आहे. त्यापैकी 88 जणांची आरटीपीसीआर टेस्ट करण्यात आहे. 88 जणांपैकी 34 जणांची कोरोनाची आरटीपीसीआर टेस्ट निगेटीव्ह आली आहे. तर 48 जणांचा रिपोर्ट अद्याप प्राप्त आलेला नाही. 109 जणांचे कॉन्टक्ट ट्रेसिंग सुरु आहे. त्यांचा शोध सुरु आहे. त्यांचा पत्ता शोधला जात आहे. काही जणांच्या घराला कुलूप आहे. तर काहींचा फोन स्विच ऑफ येत आहे.
नायजेरियातून सहा जण आले
नायजेरीयातून सहा जण कल्याण डोंबिवलीत आले होते. त्यापैकी एकाच कुटुंबातील चार जण होते. त्यांची कोरोना टेस्ट पॉझिटिव्ह आली होती. याशिवाय त्यांच्या संपर्कात आलेल्या चार जणांची कोरोना टेस्ट ही पॉझिटिव्ह आली आहे. त्यापैकी दोन जण हे कल्याण डोंबिवलीतील असून अन्य दोन जण हे हैद्राबाद येथील आहे. कल्याण डोंबिवलीतील दोन जणांना विलगीकरण कक्षात ठेवण्यात आले असून हैद्रबादला दोन जणांच्या संदर्भात कळविण्यात आले आहे. या चारही जणांचे नमुने जिनोम सिक्वेसिंगकरीता एनआयव्हीला पाठविण्यात आले आहे. त्यांचा रिपोर्ट येत्या चार दिवसात येणे अपेक्षित आहे. नाजयेरियातून आलेले कुटुंब ज्या दुकानात गेले होते. त्या दुकानातील कर्मचाऱ्याची आरटीपीसीआर टेस्ट केली आहे. त्याचबरोबर ज्या गाडीने ते आले त्या चालकाचीही आरटीपीसीआर टेस्ट करण्यात आलेली आहे. याशिवाय नेपाळ आणि रशियातून आलेल्या दोन जणांना विलगीरण कक्षात ठेवले आहे. त्याची प्रकृती स्थिर आहे.
दक्षिण आफ्रिकेतून आलेल्या रुग्णाची माहिती उशिरा मिळाली
राज्यातील पहिला ओमिक्रॉन व्हेरिएंट ज्या व्यक्तीमध्ये आढळला तो व्यक्ती डोंबिवलीचा आहे. या व्यक्तिसंदर्भात माहिती उशिराने मिळाली. दक्षिण आफ्रिकेतून हा व्यक्ती डोंबिवलीला आला. याबाबत कोणीही माहिती दिली नाही. एअरपोर्टकडून देखील माहिती आली नाही. लॅबमधून माहिती आल्यानंतर 1 तासात या रुग्णाला संस्थागत विलिगीकरण कक्षामध्ये ठेवले असल्याची माहिती केडीएमसी आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी दिली. (Action will be intensified against those who do not use masks, Information of KDMC Commissioner)
इतर बातम्या
St worker strike : एसटीचा संप मिटता मिटेना, निलंबन आणि दगडफेकीने एसटी कर्मचारी हैराण