Ketki Chitale : अभिनेत्री केतकी चितळे हिची ठाणे कारागृहातून अखेर सुटका

शरद पवार यांच्याविरुद्ध आक्षेपार्ह पोस्ट केल्याप्रकरणी अभिनेत्री केतकी चितळे हिच्यावर कळवा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. केतकीला न्यायालयीन कोठडीत ठेवण्यात आले होते. या गुन्ह्यात तिला ठाणे न्यायालयाने काल 20 हजार रुपयाच्या जातमुचलक्यावर जामीन मंजूर केला.

Ketki Chitale : अभिनेत्री केतकी चितळे हिची ठाणे कारागृहातून अखेर सुटका
अभिनेत्री केतकी चितळे हिची ठाणे कारागृहातून अखेर सुटका
Follow us
| Updated on: Jun 23, 2022 | 9:04 PM

ठाणे : राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर आक्षेपार्ह पोस्ट (Offensive Post) टाकल्याप्रकरणी सध्या कोठडीत असलेली अभिनेत्री केतकी चितळे (Ketki Chitale) हिची अखेर आज ठाणे कारागृहातून सुटका (Released) झाली आहे. न्यायालयातून बाहेर येताना केतकीच्या चेहऱ्यावर हास्य होते, कुठेही दुःख दिसत नव्हते. यावेळी केतकीचे वकील योगेश देशपांडे तिच्यासोबत होते. अजूनही न्याय मिळायचा बाकी आहे, असे केतकी चितळे व तिच्या वकिलांचे म्हणणे आहे. जय हिंद जय महाराष्ट्र, जेव्हा बोलायचे तेव्हा बोलेल. मी आत कारागृहात एफवायबीएच्या मुलांना शिकवत होते. खूप छान वाटत होते. त्यांना शिक्षकांची गरज आहे, अशी प्रतिकक्रिया केतकीने दिली.

शरद पवार यांच्याविरुद्ध आक्षेपार्ह पोस्ट केल्याप्रकरणी अभिनेत्री केतकी चितळे हिच्यावर कळवा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. केतकीला न्यायालयीन कोठडीत ठेवण्यात आले होते. या गुन्ह्यात तिला ठाणे न्यायालयाने काल 20 हजार रुपयाच्या जातमुचलक्यावर जामीन मंजूर केला. नवी मुंबई येथे दाखल अट्रोसिटीच्या गुन्ह्यात तिला यापूर्वीच जामीन मिळालेला आहे. त्यामुळे केतकीची कारागृहातून आज सुटका झाली आहे.

अॅट्रोसिटी गुन्ह्यासंदर्भात 25 हजाराच्या जात मुचलक्यावर जामीन मंजूर

कोरोना काळात केतकीवर रबाळे पोलीस ठाण्यात अॅट्रोसिटीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. या प्रकरणात आठ महिन्यांपूर्वी अटकपूर्व जामीन मिळावा म्हणून केतकीने न्यायालयात अर्ज दाखल केला होता. मात्र, हा अटकपूर्व जामीन न्यायालयाने फेटाळून लावला होता. त्याच प्रकरणात रबाळे पोलिसांनी केतकीला अटक केली होती. या गुन्ह्यात केतकीला न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली होती. दरम्यान, केतकीने रबाळे पोलीस ठाण्यात दाखल गुन्ह्यात जामीन मिळावा यासाठी वकिलामार्फत न्यायालयात अर्ज दाखल केला होता. या जामीन अर्जावर सुनावणी झाल्यानंतर 16 जून रोजी ठाणे सत्र न्यायालयाने केतकीला 25 हजाराच्या जातमुचलक्यावर व अटीशर्थींवर जामीन मंजूर केला होता. मात्र, केतकीवर कळवा पोलीस ठाण्यात शरद पवार यांच्यावर आशेपार्ह पोस्ट केल्याप्रकरणी गुन्हा दाखल असून त्या गुन्ह्यात देखील तिला न्यायालयीन कोठडी मिळालेली आहे. (Actress Ketki Chitale has finally been released from Thane Jail in connection with an offensive post on Sharad Pawar)

हे सुद्धा वाचा

बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद.
मंत्रिमंडळात 39 पैकी 20 नव्या चेहऱ्यांना संधी, बघा कोणाची लागली वर्णी?
मंत्रिमंडळात 39 पैकी 20 नव्या चेहऱ्यांना संधी, बघा कोणाची लागली वर्णी?.
प्रसिद्ध तबलावादक उस्ताद झाकीर हुसेन यांचं वयाच्या 73 व्या वर्षी निधन
प्रसिद्ध तबलावादक उस्ताद झाकीर हुसेन यांचं वयाच्या 73 व्या वर्षी निधन.
महायुतीचा अखेर मंत्रिमंडळ विस्तार, कोणत्या जिल्ह्यात किती मंत्री?
महायुतीचा अखेर मंत्रिमंडळ विस्तार, कोणत्या जिल्ह्यात किती मंत्री?.
अजित दादांनी आपल्याच मंत्र्यांचे टोचले कान, '... अन्यथा वेगळा निर्णय'
अजित दादांनी आपल्याच मंत्र्यांचे टोचले कान, '... अन्यथा वेगळा निर्णय'.
प्रचंड बहुमतानंतर बहुप्रतिक्षेत मंत्रिमंडळाचा विस्तार, कोणाची वर्णी?
प्रचंड बहुमतानंतर बहुप्रतिक्षेत मंत्रिमंडळाचा विस्तार, कोणाची वर्णी?.