KDMC Election 2021 : कल्याण डोंबिवली महापालिका निवडणूक, प्रशासन सज्ज, 122 प्रभागात तयारी सुरु

कल्याण डोंबिवली पालिका प्रशासनाने 122 प्रभागाच्या निवडणुकीसाठी तयारी सुरु केली आहे. (Kalyan Dombivali Municipal Election)

KDMC Election 2021 : कल्याण डोंबिवली महापालिका निवडणूक, प्रशासन सज्ज, 122 प्रभागात तयारी सुरु
कल्याण डोंबिवली महानगरपालिका
Follow us
| Updated on: Jun 17, 2022 | 3:01 PM

ठाणे : कल्याण डोंबिवली महापालिका निवडणुकीची (Kalyan Dombivali Municipal Election) तारीख लवकरच जाहीर होण्याची शक्यता आहे. त्यामुळे निवडणुकीची तारीख आणखी ठरलेली नसली तरी राजकीय पक्षांसोबतच येथील प्रशासनसुद्धा निवडणुकीच्या तयारीला लागले आहे. तारीख जाहीर झालेली नसतानासुद्धा पालिका प्रशासनाने 122 प्रभागाच्या निवडणुकीसाठी तयारी सुरु केली आहे. प्रभाग रचना, आरक्षणाची सोडत यांचा ताळेबंद बांधण्याचे काम महापालिका करत आहे. ( administration started preparations for Kalyan Dombivali Municipal Election)

राज्यात कल्याण-डोंबिवली महानगरपालिका निवडणूक नेहमीच चर्चेत राहते. शेवटच्या व्यक्तीपर्यंत पक्ष पोहोचवण्यासाठी तसेच  महापालिका काबीज करण्यासाठी येथे प्रत्येक पक्ष कसोशीने प्रयत्न करतो. या निवडणुकीची तारीख अजून जाहीर झालेली नाही. मात्र, सध्या येथे निवडणुकीचे वारे तापू लागले आहे. केडीएमसीतील 18 गावं वगळण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला होता. या निर्णयावरील खटला सध्या न्यायालयात चालू आहे. त्यामुळे राजकीय पक्षांमध्ये काही प्रमाणात संभ्रम निर्माण होत आहे. मात्र, असे असले तरी पालिका प्रशासनानेही 122 प्रभागाच्या निवडणुकीसाठी काम सुरु केले.

कल्याण-डोंबिवलीत पक्षीय बलाबल काय सांगतं?

केडीएमसीत सध्या 122 प्रभाग आहेत. 11 नोव्हेंबर 2020 रोजी महापालिकेच्या सदस्य मंडळाचा कार्यकाळ संपला आहे. 12 नोव्हेंबरपासून प्रशासकीय राजवट सुरु आहे. प्रभाग रचना सोडत होणार होती. मात्र त्याआधी 18 गावांविषयी उच्च न्यायालयाचा निकाल आला. सध्या हे प्रकरण न्यायप्रविष्ट आहे.

केडीएमसीच्या 122 प्रभागांमध्ये सध्या कल्याण ग्रामीण भागातील 27 गावांचा समावेश आहे. मात्र, आता न्यायालयाच्या निर्णयावर केडीएमसीची प्रभाग रचना ठरणार आहे. दरम्यान, केडीएमसीत गेल्या पाच वर्षात 122 जागांपैकी 52 जागा शिवसेना, 42 जागा भाजप, 4 जागा काँग्रेस, 2 जागा राष्ट्रवादी, 1 जागा एमआयएम, 9 जागा मनसेकडे तर 10 अपक्ष होते.

गेल्या निवडणुकीत शिवसेना आणि भाजपची युती होती. मात्र, आता ही युती नाही. आगामी महापालिका निवडणुकीत शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेसची आघाडी होण्याची दाट शक्यता आहे. इतकेच नाही तर भाजप आणि मनसेची युती होऊ शकते.

शिवसेनेसोबत राष्ट्रवादी, काँग्रेस निवडणूक लढविणार असल्याने सेनेला हिंदूत्ववादी मतांचा फटका बसू शकतो. भाजप आणि मनसेची युती झाली तर भाजपला उत्तर भारतीय मतांचा फटका बसू शकतो. कारण मनसेला उत्तर भारतीयांची मते मिळणार नाहीत. येणाऱ्या काळात किती प्रभाग होतात. त्यानुसार निवडणूक होईल. मात्र कल्याण डोंबिवली शिवसेनेचा बालेकिल्ला राहिला आहे. यात भाजप आणि मनसे सत्ताबदल करू शकणार का? हे पाहणं महत्त्वाचं ठरेल.

इतर बातम्या :

Kolhapur Election 2021, Ward 1 Sugar Mill : कोल्हापूर महापालिका निवडणूक, वॉर्ड 1 शुगर मिल

कल्याण-डोंबिवली महापालिका निवडणूक : सध्याचं पक्षीय बलाबल काय सांगतं?

( administration started preparations for Kalyan Dombivali Municipal Election)

Non Stop LIVE Update
साकोलीत नाना पटोले यांचा कसाबसा निसटता विजय, पाहा काय घडले?
साकोलीत नाना पटोले यांचा कसाबसा निसटता विजय, पाहा काय घडले?.
वसईतून भाजपाच्या स्नेहा दुबे विजयी, काय म्हणाल्या...पाहा
वसईतून भाजपाच्या स्नेहा दुबे विजयी, काय म्हणाल्या...पाहा.
'या' दिग्गज नेत्यांचा दारूण पराभव, कोणाच्या जिव्हारी लागला निकाल?
'या' दिग्गज नेत्यांचा दारूण पराभव, कोणाच्या जिव्हारी लागला निकाल?.
..अन् मुसंडी, भाजप-महायुतीच्या यशाचं क्रेडिट फक्त फडणवीसांना कारण...
..अन् मुसंडी, भाजप-महायुतीच्या यशाचं क्रेडिट फक्त फडणवीसांना कारण....
माहिममध्ये अमित ठाकरे,सदा सरवणकर पराभूत; ठाकरे गटाच्या उमेदवाराची बाजी
माहिममध्ये अमित ठाकरे,सदा सरवणकर पराभूत; ठाकरे गटाच्या उमेदवाराची बाजी.
भावानं परळीचा गड राखला... धनंजय मुंडे म्हणाले, 'माझी बहीण पंकजा...'
भावानं परळीचा गड राखला... धनंजय मुंडे म्हणाले, 'माझी बहीण पंकजा...'.
महायुतीच्या विजयनानंतर एकनाथ शिंदे म्हणाले, ही तर लँडस्लाईड व्हिक्ट्री
महायुतीच्या विजयनानंतर एकनाथ शिंदे म्हणाले, ही तर लँडस्लाईड व्हिक्ट्री.
फडणवीस CM होणार? सलग तिसऱ्यांदा महाराष्ट्राच्या चाणाक्यावर मात अन्...
फडणवीस CM होणार? सलग तिसऱ्यांदा महाराष्ट्राच्या चाणाक्यावर मात अन्....
कणकवलीत भाजपचा जल्लोष, निलेश राणे म्हणाले, आता अल्लाहू अकबर नाही तर...
कणकवलीत भाजपचा जल्लोष, निलेश राणे म्हणाले, आता अल्लाहू अकबर नाही तर....
महाराष्ट्रात महायुतीची लाट नाही त्सुनामी, भाजपन स्वतःचा मोडला रेकॉर्ड
महाराष्ट्रात महायुतीची लाट नाही त्सुनामी, भाजपन स्वतःचा मोडला रेकॉर्ड.