इंटरनेट पूर्णपणे बंद… कालच्या आंदोलनानंतर आज बदलापूरमधील स्थिती काय?

After Protest Badlapur Todays Condition : काल झालेल्या आंदोलनानंतर आज बदलापुरात काय स्थिती आहे? बदलापूर अत्याचार प्रकरणात कालपासून आतापर्यंत काय- काय झालं? बदलापूरकरांच्या भावना नेमक्या काय आहेत? त्यांच्या मागण्या काय आहेत? वाचा सविस्तर...

इंटरनेट पूर्णपणे बंद... कालच्या आंदोलनानंतर आज बदलापूरमधील स्थिती काय?
बदलापूरमध्ये चिमकल्यांवर अत्याचारImage Credit source: tv9
Follow us
| Updated on: Aug 21, 2024 | 8:35 AM

ठाणे जिल्ह्यातील बदलापूरमधील चिमुकल्या दोन मुलींवर अत्याचार झाला. बदलापूरमधील नामांकित शाळेतील स्वच्छतागृहातील कर्मचाऱ्याने या दोन चिमुकल्या मुलींवर अत्याचार केला. ही घटना उघडकीस आल्यानंतर बदलापूरकर रस्त्यावर उतरले. रेल्वे ट्रॅकवर उतरत बदलापूरकरांनी ठिय्या आंदोलन केलं रास्ता रोको केला. त्यानंतर आता आज बदलापूरमध्ये आज तणावपूर्ण वातावरण आहे. बदलापूरमधील इंटरनेट पूर्णपणे बंद आहे. कालच्या आंदोलनानंतर आज बदलापूरमधील रेल्वे सेवा सुरळीतपणे सुरु आहे. पण काल झालेल्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर पोलिसांचा बंदोबस्त वाढवण्यात आला आहे. तर बदलापूरमध्ये कलम 163 लागू करण्यात आलं आहे. तर शहरातील दुकानं देखील बंद आहेत.

रेल्वे सेवा सुरळीत

बदलापूरमधील आदर्श विद्या मंदिर या शाळेत दोन मुलींवर झालेल्या अत्याचारांनंतर नागरिकांनी 11 तास रेल रोको आंदोलन केलं. काल संध्याकाळी सहा वाजता रेल्वे ट्रॅकवरून न हटणाऱ्या आंदोलकांवर लाठीचार्ज केला. मग जमावानेदेखील दगडफेक केली. त्यानंतर परिस्थिती पोलिसांच्या नियंत्रणात आली. मग संध्याकाळी सात वाजेच्या सुमारास रेल्वे सेवा सुरु झाली. आज परिस्थिती पूर्ववत होत आहे. सकाळपासून रेल्वे सेवा सुरळीत झाली आहे.

उज्वल निकम खटला चालवणार

बदलापूर लैंगिक अत्याचार खटला चालवण्यासाठी ज्येष्ठ विधिज्ञ उज्वल निकम यांची नियुक्ती करण्यात आली आहे.13 तारखेला बदलापूरमधील एकाच शाळेत दोन लहान मुलींवर लैंगिक अत्याचार झाल्याची घटना समोर आल्या. त्यानंतर बदलापूरमध्ये रेलरोको आणि तोडफोड करत स्थानिकांकडून आंदोलन करण्यात आलं होतं. नागरिकांचं आंदोलन पाहता दीपक केसरकर गिरीश महाजन यांनी काल ही केस फास्टट्रॅकवर चालवणार आहे. उज्वल निकम या केसवर काम करणार असल्याचं काल सांगितलं होतं.

बदलापूर रेल रोको आंदोलन प्रकरणात तीनशेहून अधिक जणांवर गुन्हे दाखल करण्यात आला आहे. तर 25 पेक्षा अधिक आंदोलक पोलिसांनी ताब्यात घेतले आहेत. काल रात्री उशिरा कल्याण लोहमार्ग पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल झाला आहे. पोलिसांच्या ताब्यात असलेल्या आरोपींना दुपारी कल्याण लोहमार्ग न्यायालयात नेणार असल्याची माहिती आहे. बदलापूर रेल्वे स्टेशनवर आंदोलकांकडून पोलिसांवर दगडफेक करण्यात आली. झालेल्या दगडफेकीत चार ते पाच पोलीस किरकोळ जखमी झालेत.

मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?
मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?.
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?.
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.