BJP Jallosh : डोंबिवलीत भाजपच्या कार्यकर्त्यांचा जल्लोष, गुलालाची उधळण फटाक्‍यांची आतषबाजी, रॅलीत राम मंदिराची प्रतिकृती

चार राज्यात भाजपला सत्ता मिळाली आहे. महाराष्ट्राच्या राजकारणात गिरे तो भी टांग उपर.. कारण गोवामध्ये त्यांना नोटा एवढे सुद्धा मतदान झाले नाही. भारतीय जनता पक्षाला पराभूत करण्यासाठी त्यांनी उमेदवार उभे केले मात्र, त्या उमेदवारांना नोटा पेक्षा कमी मत मिळाली. त्यांची लायकी मतदारांनी दाखवून दिली आहे. अशी घणाघाती टीका भाजपा आमदार गणपत गायकवाड यांनी शिवसेनेवर केली आहे.

BJP Jallosh : डोंबिवलीत भाजपच्या कार्यकर्त्यांचा जल्लोष, गुलालाची उधळण फटाक्‍यांची आतषबाजी, रॅलीत राम मंदिराची प्रतिकृती
डोंबिवलीत भाजपच्या कार्यकर्त्यांचा जल्लोष
Follow us
| Updated on: Mar 10, 2022 | 7:47 PM

डोंबिवली : गोवा, उत्तर प्रदेशासह चार राज्यात भाजपने मिळवलेल्या यशानंतर राज्यभरात भाजपचे कार्यकर्ते (Bjp Workers) आनंदोत्सव साजरा करत आहेत. डोंबिवलीमध्ये देखील  भाजपचे आमदार रविंद्र चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली भाजपा पदाधिकारी कार्यकर्त्यांनी एकच जल्लोष (Celebrations) केला. यावेळी घरडा सर्कल ते गणपती मंदिरापर्यंत रॅली (Rally) काढण्यात आली होती. रॅलीमध्ये गुलालाची उधळण करत फटाक्यांची आतिषबाजी करण्यात येत होती. या रॅलीमध्ये राम मंदिराची प्रतिकृती असलेला रथ सहभागी झाला होता. यावेळी आमदार रवींद्र चव्हाण यांनी निवडणुकामध्ये भाजपाला घवघवीत यश मिळालं अयोध्येमध्ये श्रीरामाचा भव्य मंदिर बनवण्याच काम सुरू आहे आणि प्रत्येक डोंबिवलीकरांना हे काम लवकरात लवकर पूर्ण करावं असं वाटतं. योगीजी पुन्हा मुख्यमंत्री झाल्यामुळे आता राम मंदिराचा काम अधिक लवकर होईल याची आम्हाला पूर्ण खात्री आहे म्हणून हा जल्लोष केला जातोय. नरेंद्र मोदींसोबत देशामधील सर्व नागरिक आहेत हे पुन्हा एकदा सिद्ध झाल्याची प्रतिक्रिया रवींद्र चव्हाण यांनी दिली. (After the success of BJP in four states, BJP workers celebrated in Dombivali)

भाजपा आमदार गणपत गायकवाड यांचा शिवसेनेला टोला

चार राज्यात भाजपला सत्ता मिळाली आहे. महाराष्ट्राच्या राजकारणात गिरे तो भी टांग उपर.. कारण गोवामध्ये त्यांना नोटा एवढे सुद्धा मतदान झाले नाही. भारतीय जनता पक्षाला पराभूत करण्यासाठी त्यांनी उमेदवार उभे केले मात्र, त्या उमेदवारांना नोटा पेक्षा कमी मत मिळाली. त्यांची लायकी मतदारांनी दाखवून दिली आहे. अशी घणाघाती टीका भाजपा आमदार गणपत गायकवाड यांनी शिवसेनेवर केली आहे. एवढेच नाही तर ज्या मतदारसंघाची जबाबदारी गोव्यात भाजप आमदार गणपत गायकवाड यांना देण्यात आली होती. त्या मतदारसंघात सुद्धा भाजपचा उमेदवार निवडून आला आहे. भाजपा आमदार गणपत गायकवाड यांच्या उपस्थित कार्यकर्त्यांनी आज जल्लोष केला. त्यावेळी त्यांनी हे विधान केले. (After the success of BJP in four states, BJP workers celebrated in Dombivali)

इतर बातम्या

पोलिसाच्या डोक्यात घातला दगड, भांडणाऱ्यांना समज देतानाचा प्रकार, पोलीस असुरक्षित तर लोकांचं काय?

Video | बाटलीत डिझेल दिले नाही म्हणून पेट्रोलपंप कर्मचाऱ्याला मारहाण; पेव्हर ब्लॉक डोक्यात घातला

ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.
सैफवर चाकूने 6 वार पण 12 व्या मजल्यावरच्या घरात चोराची एन्ट्री कशी?
सैफवर चाकूने 6 वार पण 12 व्या मजल्यावरच्या घरात चोराची एन्ट्री कशी?.
कराडला कोठडी अन् वकिलांमध्येच जुंपली, कोर्टाबाहेर एकच गदारोळ अन्...
कराडला कोठडी अन् वकिलांमध्येच जुंपली, कोर्टाबाहेर एकच गदारोळ अन्....
वाल्मिक कराडच्या समर्थकांच्या आलं अंगात, महिलांमध्ये घुमतंय कोण?
वाल्मिक कराडच्या समर्थकांच्या आलं अंगात, महिलांमध्ये घुमतंय कोण?.
पंतप्रधान मोदी मुंबईत अन् मंत्री धनंजय मुंडे परळीत... नेमकं कारण काय?
पंतप्रधान मोदी मुंबईत अन् मंत्री धनंजय मुंडे परळीत... नेमकं कारण काय?.
Saif Ali Khan | अभिनेता सैफ अली खानवर चाकू हल्ला, अपडेट्स काय ?
Saif Ali Khan | अभिनेता सैफ अली खानवर चाकू हल्ला, अपडेट्स काय ?.
'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?
'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?.
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्..
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्...