कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत अंबरनाथमध्ये 265 जणांचा मृत्यू, पण फक्त 65 मृतकांची नोंद, खळबळजनक खुलासा

अंबरनाथ शहरात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत झालेले प्रत्यक्ष मृत्यू आणि आयसीएमआरच्या पोर्टलवर नोंद असलेला शहरातील मृत्यूंचा आकडा यात मोठी तफावत आढळली आहे (Ambernath Corona Death on ICMR website).

कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत अंबरनाथमध्ये 265 जणांचा मृत्यू, पण फक्त 65 मृतकांची नोंद, खळबळजनक खुलासा
प्रातिनिधिक फोटो
Follow us
| Updated on: Jun 15, 2021 | 3:20 PM

अंबरनाथ (ठाणे) : अंबरनाथ शहरात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत झालेले प्रत्यक्ष मृत्यू आणि आयसीएमआरच्या पोर्टलवर नोंद असलेला शहरातील मृत्यूंचा आकडा यात मोठी तफावत आढळली आहे. शहरातील खासगी रुग्णालयांनी आयसीएमआरच्या पोर्टलवर मृत्यूंची नोंदच केलेली नसल्याची धक्कादायक बाब पालिकेच्या सर्वेक्षणात समोर आली आहे. या सगळ्या प्रकरणाबाबत अंबरनाथ पालिकेनं आज पत्रकार परिषद घेत खुलासा केला. यानंतर अंबरनाथ शहरात मोठी खळबळ उडाली. या वाढीव मृत्यूंच्या आकड्यामुळे अंबरनाथ शहरातील मृतांची संख्या वाढणार असून यापुढे तरी सर्व हॉस्पिटल्सनी याबाबत खबरदारी घ्यावी, असं आवाहन करण्यात आलं आहे (Ambernath Corona Death on ICMR website).

दुसऱ्या लाटेत 206 रुग्णांचा मृत्यू, पण फक्त 65 मृत्यूची नोंद

कोरोनाची दुसरी लाट ही पहिल्या लाटेपेक्षा अधिक घातक ठरली. कारण या दुसऱ्या लाटेत अंबरनाथ शहरात तब्बल 206 रुग्णांचा मृत्यू झाला. अंबरनाथ शहरातील स्मशानात 206 कोरोना मृतांवर अंत्यसंस्कार करण्यात आल्याची नोंद आहे. पण आयसीएमआरच्या पोर्टलवर मात्र शहरात फक्त 65 मृत्यू झाल्याची नोंद आहे. त्यामुळे इतकी मोठी तफावत कशी निर्माण झाली? याचा शोध घेण्यासाठी अंबरनाथ पालिका प्रशासनाने शहरातील सर्व खासगी कोव्हिड हॉस्पिटल्सकडून मृतांची यादी मागवली. यावेळी १४१ मृतांची नोंद खासगी हॉस्पिटल्सनी आयसीएमआरच्या पोर्टलवर केलेलीच नसल्याचं उघड झालं.

खासगी हॉस्पिटल्सकडून आकडेवारीत लपवाछपवी?

वास्तविक पाहता आपल्या हॉस्पिटलमध्ये एखाद्या रुग्णाचा मृत्यू झाल्यावर त्याची आयसीएमआरच्या पोर्टलवर नोंद करण्याची जबाबदारी ही खासगी हॉस्पिटल्सवरच सोपवण्यात आली होती. मात्र तरीही शहरातील जवळपास सर्वच हॉस्पिटल्सनी आकडेवारीत लपवाछपवी केल्याचं समोर आलं. या हॉस्पिटल्सची यादीच अंबरनाथ पालिकेनं जाहीर केली आहे (Ambernath Corona Death on ICMR website).

कोणत्या हॉस्पिटल्सने किती मृत्यू कमी नोंदवले?

साई सिटी हॉस्पिटल – 47 संजीवनी हॉस्पिटल – 23 डॉ. झुबेर शाह हॉस्पिटल – 25 कोव्हीड सेंटर – 13 गौतम हॉस्पिटल – 4 जिया हॉस्पिटल – 3 श्री सेवा हॉस्पिटल – 5 जीवनज्योत हॉस्पिटल – 2 हॉस्पिटलमध्ये मृतावस्थेत आणलेले – 3 अजूनही ट्रेस होत नसलेले – 16

महालिकेकडून नेमकी कारवाई काय?

हा धक्कादायक प्रकार समोर आल्यानंतर आता या सर्व हॉस्पिटल्सना कोव्हिड हॉस्पिटलचा दर्जा रद्द करण्याच्या नोटीसा बजावण्यात आल्याची माहिती अंबरनाथ पालिकेचे मुख्याधिकारी डॉ. प्रशांत रसाळ यांनी दिली आहे.

हॉस्पिटल्सची बाजू काय?

दरम्यान, या सगळ्याबाबत आम्ही हॉस्पिटल्सची बाजूही जाणून घेतली. यावेळी आम्हाला आयसीएमआरच्या पोर्टलवर नोंद करायची आहे, ही बाब उशिरा समजली, तसंच आम्ही पालिकेला मात्र सगळ्या मृत्यूंची माहिती दिली असल्याचं साई सिटी हॉस्पिटलचे डॉ. मनोज सिंग यांनी सांगितलं.

अनेक रुग्ण हे आरटीपीसीआर टेस्ट न करता फक्त एचआरसिटी करून येतात. काही रुग्ण फक्त अँटिजेन करून येतात, मात्र त्यांची प्रकृती गंभीर असल्यानं फॉर्मलिटी न पाळता त्यांच्यावर आम्हाला आधी उपचार करावे लागतात. मात्र त्यांच्याकडे आयसीएमआरची नोंदणी आणि नंबर नसल्यानं त्यांच्या मृत्यूची नोंद करताना अडचणी येतात, असंही डॉक्टरांनी स्पष्ट केलं.

हेही वाचा : Video | जिम सुरु झाल्याचा अत्यानंद, महिलेने साडी नेसून ‘झिंगाट’च्या तालावर केले वर्कआऊट! पाहा व्हिडीओ

नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?.
श्रीरामाच्या घोषणा,जीवाला धोका रात्री 3.30 वाजता अंधारेंसोबत काय झालं?
श्रीरामाच्या घोषणा,जीवाला धोका रात्री 3.30 वाजता अंधारेंसोबत काय झालं?.
थर्टी फस्ट पार्टीसाठी किल्ल्यांवर जाताय? पण असं वागाल तर १ लाखांचा दंड
थर्टी फस्ट पार्टीसाठी किल्ल्यांवर जाताय? पण असं वागाल तर १ लाखांचा दंड.
भाजपच्या या 4 नेत्याचं सत्तेत कमबॅक, लालदिव्याची प्रतीक्षा अखेर संपली
भाजपच्या या 4 नेत्याचं सत्तेत कमबॅक, लालदिव्याची प्रतीक्षा अखेर संपली.
भरतशेठ... झाले थोडे लेट पण कॅबिनेटच आणलं थेट! मंत्रिपदाची माळ गळ्यात
भरतशेठ... झाले थोडे लेट पण कॅबिनेटच आणलं थेट! मंत्रिपदाची माळ गळ्यात.
'हा मैं नाराज, वहाँ नही रहेना..',भुजबळांचा भडका अन् हाती बंडाचा झेंडा?
'हा मैं नाराज, वहाँ नही रहेना..',भुजबळांचा भडका अन् हाती बंडाचा झेंडा?.
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.