CCTV Video : कल्याणमध्ये चुकून रेल्वे स्थानकावर उतरली महिला आणि… संपूर्ण घटना सीसीटीव्हीत कैद

सदर महिला दुरांतो एक्प्रेसमधून मुंबईत येत होती. मंगळवारी सकाळी दहाच्या सुमारास कल्याण रेल्वे स्टेशनवर प्लॅटफॉर्म नंबर 5 वर दुरांतो एक्स्प्रेस आली. या एक्स्प्रेसमधून एक वयस्कर महिला खाली उतरली. कल्याण स्टेशनला सीएसएमटी स्टेशन समजून महिला गाडीतून उतरली. मात्र त्यानंतर काही क्षणातच हे कल्याण स्टेशन असल्याचं तिच्या लक्षात आलं आणि तिने पुन्हा गाडीत चढण्याचा प्रयत्न केला.

CCTV Video : कल्याणमध्ये चुकून रेल्वे स्थानकावर उतरली महिला आणि... संपूर्ण घटना सीसीटीव्हीत कैद
कल्याणमध्ये चुकून रेल्वे स्थानकावर उतरली महिला आणि...Image Credit source: TV9
Follow us
| Updated on: May 13, 2022 | 12:08 AM

कल्याण : एक वयस्कर महिला (Lady) चुकून कल्याण रेल्वे स्थानकात उतरली आणि चूक लक्षात येताच पुन्हा चालत्या गाडीत चढण्याचा प्रयत्न केला. या प्रयत्नात महिला प्लॅटफॉर्मवर पडली. मात्र ती गाडीखाली जायच्या आधीच तिला रेल्वे पोलिसांनी तत्परतेनं बाजूला ओढलं आणि तिचा जीव वाचवला. ही संपूर्ण घटना सीसीटीव्ही (CCTV) कॅमेरात कैद झाली आहे. दुरांतो एक्स्प्रेस (Duranto Express)मध्ये चढताना ही घटना घडली. याच गाडीत महिलेसोबत तिचे पती सुद्धा होते. पोलिसांनी दाखवलेल्या तत्परतेनं पत्नीचे प्राण वाचल्यानं पतीने पोलिसांचे आभार मानले. महिलेच्या भूलचुकीमुळे मोठा अनर्थ होता होता टळला.

चुकून कल्याण स्टेशनवर उतरली होती महिला

सदर महिला दुरांतो एक्प्रेसमधून मुंबईत येत होती. मंगळवारी सकाळी दहाच्या सुमारास कल्याण रेल्वे स्टेशनवर प्लॅटफॉर्म नंबर 5 वर दुरांतो एक्स्प्रेस आली. या एक्स्प्रेसमधून एक वयस्कर महिला खाली उतरली. कल्याण स्टेशनला सीएसएमटी स्टेशन समजून महिला गाडीतून उतरली. मात्र त्यानंतर काही क्षणातच हे कल्याण स्टेशन असल्याचं तिच्या लक्षात आलं आणि तिने पुन्हा गाडीत चढण्याचा प्रयत्न केला. मात्र यावेळी गाडी सुटल्यानं तिचा तोल गेला आणि ती खाली कोसळली. यावेळी ती गाडीखाली जाणार, इतक्यात ड्युटीवरील महिला रेल्वे पोलीस कर्मचाऱ्यांनी या महिलेला बाजूला ओढलं. यानंतर चैन ओढत गाडी थांबवण्यात आली आणि पुन्हा या महिलेला गाडीत बसवून सीएसएमटीकडे रवाना करण्यात आलं.

महाराष्ट्राची चिंता वाढली;7 वर्षीय मुलासह 13 वर्षीय मुलीला HMPVची लागण
महाराष्ट्राची चिंता वाढली;7 वर्षीय मुलासह 13 वर्षीय मुलीला HMPVची लागण.
मुडेंनी राजीनामा दिला? राजीनाम्याच्या प्रश्नावर म्हणाले, 'योग्य वेळी'
मुडेंनी राजीनामा दिला? राजीनाम्याच्या प्रश्नावर म्हणाले, 'योग्य वेळी'.
HMPV Virus : तुम्हाला 'ही' लक्षणं दिसताच सावध व्हा अन् अशी घ्या काळजी
HMPV Virus : तुम्हाला 'ही' लक्षणं दिसताच सावध व्हा अन् अशी घ्या काळजी.
मुंडेंच्या भेटीनंतर दादा-फडणवीसांमध्ये बैठक, राजीनाम्याचा दबाव वाढला
मुंडेंच्या भेटीनंतर दादा-फडणवीसांमध्ये बैठक, राजीनाम्याचा दबाव वाढला.
आता माझ्या भावना मेल्यात, नाराज असलेले छगन भुजबळ नेमकं काय म्हणाले?
आता माझ्या भावना मेल्यात, नाराज असलेले छगन भुजबळ नेमकं काय म्हणाले?.
आधी पैसे देणाऱ्यांवरच कारवाई करा, बच्चू कडूंचा सरकारला घरचा आहेर
आधी पैसे देणाऱ्यांवरच कारवाई करा, बच्चू कडूंचा सरकारला घरचा आहेर.
राजीनाम्यावरुन दबाव? मुंडे दादांच्या भेटीला, चर्चेत नेमकं काय ठरलं?
राजीनाम्यावरुन दबाव? मुंडे दादांच्या भेटीला, चर्चेत नेमकं काय ठरलं?.
मुंडे यांनीच 3 कोटींची खंडणी मागितली, सुरेश धसांचा खळबळजनक आरोप अन्...
मुंडे यांनीच 3 कोटींची खंडणी मागितली, सुरेश धसांचा खळबळजनक आरोप अन्....
मुंडेंना अजितदादा पाठिशी घालताय? बीड प्रकरणासंदर्भात धसांचा मोठा दावा
मुंडेंना अजितदादा पाठिशी घालताय? बीड प्रकरणासंदर्भात धसांचा मोठा दावा.
राजीनाम्याची मागणी सुरू असताना धनंजय मुंडे तडकाफडकी दादांच्या भेटीला
राजीनाम्याची मागणी सुरू असताना धनंजय मुंडे तडकाफडकी दादांच्या भेटीला.