Ambernath: अंबरनाथमध्ये इंटरनेटची वायर टाकताना कर्मचारी भाजला, प्रकृती गंभीर, खासगी रुग्णालयात उपचार सुरू

हा झटका इतका जोरदार होता, की सागर कोळी याच्या अंगावरचे कपडे अक्षरशः जळाले आणि तो गंभीररीत्या भाजला. यानंतर तिथेच बेशुद्ध पडलेल्या सागर याला त्याच्या सहकाऱ्यांनी तातडीने उल्हासनगरच्या क्रिटीकेअर हॉस्पिटलमध्ये दाखल केलं.

Ambernath: अंबरनाथमध्ये इंटरनेटची वायर टाकताना कर्मचारी भाजला, प्रकृती गंभीर, खासगी रुग्णालयात उपचार सुरू
जखमी सागर कोळी
Follow us
| Updated on: Jan 04, 2022 | 6:52 PM

अंबरनाथ : अंबरनाथमध्ये इंटरनेटची वायर टाकताना कर्मचारी गंभीररीत्या भाजल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. हायटेंशन वायरशी संपर्क आल्यानं विजेचा झटका बसून या कर्मचाऱ्याला गंभीर इजा झाली. या कर्मचाऱ्यावर सध्या उल्हासनगरच्या खासगी रुग्णालयात उपचार सुरू असून त्याची प्रकृती गंभीर आहे. सागर कोळी असे भाजलेल्या कर्मचाऱ्याचे नाव आहे.

इंटरनेटची वायर टाकताना वीजेचा धक्का बसला

अंबरनाथ पश्चिमेच्या मोहन सबर्बिया जवळील नवरे पार्क परिसरात आज सकाळच्या सुमारास इंटरनेट कनेक्शन टाकण्याचं काम सुरू होतं. यासाठी स्थानिक इंटरनेट सर्व्हिस देणाऱ्या कंपनीचे दोन कर्मचारी न्यू हिल व्ह्यू इमारतीत काम करत होते. यापैकी एक कर्मचारी इमारतीच्या खालून दोरी फेकत होता, तर दुसरा कर्मचारी इमारतीच्या टेरेसवर वायर हातात घेऊन उभा होता. यावेळी अचानक ही इंटरनेटची वायर बाजूलाच असलेल्या उच्च दाबाच्या विद्युत वाहिनीच्या संपर्कात आली. यामुळं मोठा स्पार्क होऊन टेरेसवर काम करत असलेल्या सागर कोळी या कर्मचाऱ्याला विजेचा जोरदार झटका बसला.

60 टक्के भाजला कर्मचारी

हा झटका इतका जोरदार होता, की सागर कोळी याच्या अंगावरचे कपडे अक्षरशः जळाले आणि तो गंभीररीत्या भाजला. यानंतर तिथेच बेशुद्ध पडलेल्या सागर याला त्याच्या सहकाऱ्यांनी तातडीने उल्हासनगरच्या क्रिटीकेअर हॉस्पिटलमध्ये दाखल केलं. ज्यावेळी त्याला हॉस्पिटलमध्ये आणण्यात आलं, त्यावेळी तो अक्षरशः मरणासन्न अवस्थेत होता. मात्र डॉक्टरांनी तातडीने उपचार करून त्याला शुद्धीत आणलं. सागर हा या घटनेत जवळपास 60 टक्के भाजला असून त्याला अंतर्गत इजा सुद्धा झाली आहे. त्याची प्रकृती सध्या अतिशय गंभीर असल्याची माहिती क्रिटीकेअर हॉस्पिटलचे डॉक्टर प्रकाश कौरानी यांनी दिली आहे.

ऑगस्टमध्येही घडली होती अशी घटना

या घटनेबाबत पोलिसांना विचारलं असता, अंबरनाथ पोलीस ठाण्यात याबाबत अद्याप कोणतीही नोंद करण्यात आलेली नाही. हा अपघात असून त्याची चौकशी करून पुढील कारवाई केली जाईल, अशी माहिती अंबरनाथ पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र कोते यांनी दिली. दरम्यान, अंबरनाथमध्ये ऑगस्ट महिन्यातही इंटरनेटचं काम करताना प्रतीक भोसले या 23 वर्षीय तरुणाचा चौथ्या मजल्यावरून पडून मृत्यू झाला होता. चिंचपाडा परिसरातील आरीया इमारतीत ही घटना घडली होती. ज्या इंटरनेट कंपनीत प्रतीक भोसले हा काम करत होता, त्याच कंपनीत सागर कोळी हा सुद्धा काम करत होता. एकाच इंटरनेट चालकाच्या कर्मचाऱ्यांचे असे वारंवार अपघात होत असल्यानं कर्मचाऱ्यांच्या सुरक्षिततेचा मुद्दा ऐरणीवर आला आहे. (An employee was burnt while laying internet wire in Ambernath)

इतर बातम्या

Hariyana: हरियाणात कौटुंबिक कलहातून सुपारी देऊन मुलाने केली वडिलांची हत्या, सोनीपत येथील धक्कादायक घटना

Suicide | ‘आपको हमारे जैसे हजारो मिलेंगे, पर…’ इन्स्टावर स्टोरी ठेवत तरुणानं का केली आत्महत्या?

मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?
मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?.
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?.
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.