Kalyan Fraud : कल्याणमध्ये गुंतवणूकदारांचे कोट्यवधी रुपये घेऊन आणखी एक ज्वेलर्स फरार

या शोरुम चालकाकडून फसविले गेलेले 25 ग्राहक आतापर्यंत समोर आले आहेत. ज्यांच्याकडून शोरुम मालकाने एक कोटी 56 लाख घेतले होते. आणखीन मोठ्या प्रमाणात ग्राहक समोर येऊ शकतात. ज्यांची फसवणूक शोरुम मालकाने केली आहे. याप्रकरणी अधिक तपास महात्मा फुले पोलिस करीत आहेत.

Kalyan Fraud : कल्याणमध्ये गुंतवणूकदारांचे कोट्यवधी रुपये घेऊन आणखी एक ज्वेलर्स फरार
कल्याणमध्ये गुंतवणूकदारांचे कोट्यवधी रुपये घेऊन आणखी एक ज्वेलर्स फरार
Follow us
| Updated on: Feb 22, 2022 | 10:11 PM

कल्याण : विविध स्कीमचे आमिष दाखवून गुंतवणूकदारांचे पैसे घेऊन आणखी एक ज्वेलर्स (Jewelers) पसार झाल्याची घटना कल्याणमध्ये उघडकीस आली आहे. एस. कुमार या ज्वेलर्स शोरुमचा मालक ग्राहकांची कोट्यवधी रुपयांची फसवणूक (Fraud) करुन फरार झाला आहे. श्रीकुमार पिल्लई असे फरार झालेल्या ज्वेलर्स शोरुम मालकाचे नाव आहे. त्यामुळे पैसे गुंतविणारे ग्राहक हवालदिल झाले आहेत. याप्रकरणी कल्याणच्या महात्मा फुले पोलिसांनी गुन्हा दाखल करीत पुढील तपास सुरु केला आहे. देशभरात एस. कुमार ज्वेलर्सचे 13 शोरुम असल्याची माहिती समोर आली आहे. (Another jeweler absconding after taking crores of rupees from investors in Kalyan)

अनेक ज्वेलर्स विविध सोनेरी स्कीमच्या नावाखाली लोकांकडून त्यांच्या दुकानात पैसे गुंतवणूक करुन घेतात. मात्र पैसे जमा झाले की, फरार होतात. फसवणूक मात्र सामान्य नागरिकांची होते. हे पण खरे आहे की, फसवणुकीचे इतके प्रकार समोर येत असताना लोक विविध योजना भुलून जास्त पैसे मिळतील या नादात गुंतवणूक करतात. त्यामुळे अशा प्रकारच्या लबाडांना संधी मिळते. असाच एक लबाड ज्वेलर्स कल्याणमध्ये पसार झाला आहे.

आतापर्यंत 1 कोटी 56 लाखाची फसवणूक उघड

कल्याण पश्चिमेतील शिवाजी चौकात एस. कुमार गोल्ड अॅण्ड डायमंड नावाचे शोरुम आहे. काही वर्षापूर्वी या शोरुमचे उद्घाटन थाटामाटात करण्यात आले होते. अॅक्टर्स आणि नेते मंडळीनी या उद्घाटनाला हजेरी लावली होती. या शोरुमचा खूप गाजावाजा करण्यात आला. ज्वेलर्सच्या मार्फत जास्त फायदा करुन देण्याच्या नावाखाली विविध गोल्ड स्कीम सुरु करण्यात आल्या. त्यात नागरिकांनी पैसा गुंतविला आणि आता हे शोरुम बंद झाले आहे. शोरुम बंद करुन शोरुमचा मालक श्रीकुमार पिल्लई हा पसार झाला आहे. या शोरुम चालकाकडून फसविले गेलेले 25 ग्राहक आतापर्यंत समोर आले आहेत. ज्यांच्याकडून शोरुम मालकाने एक कोटी 56 लाख घेतले होते. आणखीन मोठ्या प्रमाणात ग्राहक समोर येऊ शकतात. ज्यांची फसवणूक शोरुम मालकाने केली आहे. याप्रकरणी अधिक तपास महात्मा फुले पोलिस करीत आहेत. (Another jeweler absconding after taking crores of rupees from investors in Kalyan)

इतर बातम्या

मुलुंड भागात गोळीबाराच्या घटनेनं खळबळ! अमर नगर परिसरातली घटना, पोलिस आणि आरोपीमध्ये झटापट

Buldhana Beating : चिखलीमध्ये भाजपच्या कार्यकर्त्यांकडून मनसे कार्यकर्त्याला जबर मारहाण, घटना सीसीटीव्हीमध्ये कैद, व्हिडीओ व्हायरल

कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'
कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'.
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?.
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले....
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात.
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.