Thane Crime : बोगस कॉल सेंटरद्वारे अमेरिकन नागरिकांची फसवणूक, गुन्हे शाखेकडून 6 जणांना अटक

सदर आरोपी बोगस कॉल सेंटरच्या माध्यमातून अमेरिकेतील नागरिकांना ते वापरत असलेल्या अमेझॉन, पेपल या ॲपबाबत ब्लास्टिंग मॅसेज पाठवून त्यांना या अॅपवरून 399 डॉलर्सचा व्यवहार झाला असल्याचे दाखवायचे. त्यांना बोगस कॉल सेंटरचा नंबर पाठवून संपर्क साधण्याबाबत कळवायचे.

Thane Crime : बोगस कॉल सेंटरद्वारे अमेरिकन नागरिकांची फसवणूक, गुन्हे शाखेकडून 6 जणांना अटक
पिस्तुलचा धाक दाखवून लोकांना नग्न करुन अनैसर्गिक कृत्यास भाग पाडणाऱ्या विकृत टोळीचा पर्दाफाश
Follow us
| Updated on: Feb 02, 2022 | 8:39 PM

ठाणे : ठाण्यातील कापूरबावडी येथील लेक सिटी मॉल(Lake City Mall)मध्ये बोगस कॉल सेंटर(Bogus Call Center) चालवणाऱ्या 6 जणांच्या टोळीला ठाणे गुन्हे शाखेच्या घटक 1 ने बेड्या ठोकल्या आहेत. गेल्या अनेक दिवसांपासून सदरचे बोगस कॉल सेंटर चालू असल्याची माहिती मिळताच ठाणे पोलिसांनी धाड टाकून या टोळीला अटक केली. अटक करण्यात आलेल्या आरोपींकडून ठाणे पोलिसांनी संगणकातील हार्ड डिस्क, रजिस्टर्स, राउटर्स, फसवणूक करण्यासाठी वापरण्यात येणारे स्क्रिप्ट, मोबाईल फोन, असा सुमारे 1 लाख 75 हजारांचा मुद्देमाल जप्त केला आहे. सदर आरोपी बोगस कॉल सेंटरच्या माध्यमातून अमेरिकेतील नागरिकांना ते वापरत असलेल्या अमेझॉन, पेपल या ॲपबाबत ब्लास्टिंग मॅसेज पाठवून त्यांना या अॅपवरून 399 डॉलर्सचा व्यवहार झाला असल्याचे दाखवायचे. त्यांना बोगस कॉल सेंटरचा नंबर पाठवून संपर्क साधण्याबाबत कळवायचे. (Anti-ransom squad and crime branch arrest 6 for defrauding US citizens through bogus call center)

अमेरिकेतील संबंधित नागरिकांनी त्यांना मिळालेल्या मेसेजनुसार व्यवहार केला नसल्यास तो व्यवहार रद्द करण्यासाठी आरोपी चालवत असलेल्या कॉल सेंटरशी संपर्क साधायचे. तेव्हा या कॉलसेंटरमधील टेलीकॉलर्स हे आयबीम सॉफ्टवेअरचा वापर करून ठरवलेल्या स्किप्टनुसार कॉल करणाच्या संबंधित नागरिकाला एनी डेस्क, अल्ट्रा व्हीवर, सुप्रोमो, अॅपल मिक्स हे ॲप डाउनलोड करण्यास सांगून त्यामाफर्त आर्थिक फसवणूक करत होते. या प्रकरणात आणखी आरोपी असण्याची शक्यता ठाणे पोलिसांनी वर्तवली असून याबाबत पुढील तपास खंडणी विरोधी पथकाकडून सुरू आहे.

मुरबाडमध्ये बोगस डॉक्टरांवर कारवाईचा बडगा

एका बोगस डॉक्टरने दिलेल्या चुकीच्या इंजेक्शनमुळे पाच आदिवासींचा मृत्यू झाल्यानंतर मुरबाडचा आरोग्य विभाग खडबडून जागा झाला असून बोगस डॉक्टरांवर कारवाईचा बडगा उगारला आहे. या कारवाईत दोन बोगस डॉक्टरांना अटक केले असून दवाखानाही सील करण्यात आला आहे. विठ्ठल बुरबुडा आणि प्रमोद धनगर अशी अटक करण्यात आलेल्या दोन बोगस डॉक्टरांची नावे आहेत. ग्रामीण भागातील भोळ्या लोकांचा गैरफायदा घेऊन हे भामटे आपले डॉक्टरकीचे दुकान चालवत होते. मात्र पाच जणांच्या मृत्यूनंतर सर्व बोगस डॉक्टर आरोग्य विभागाच्या रडारवर आले आहेत. या कारवाईमुळे बोगस डॉक्टरांचे धाबे दणाणले असून त्यांनी आपले दुकान बंद करुन पळ काढण्यास सुरुवात केली आहे. (Anti-ransom squad and crime branch arrest 6 for defrauding US citizens through bogus call center)

इतर बातम्या

Pune crime|भाडेतत्वार महिंद्रा XUV कार घेऊन पळाले ; पोलिसांनी आवळल्या मुसक्या

Malad Suicide : कर्जबाजारीपणामुळे मालाडमधील व्यावसायिकाची आत्महत्या, सुसाईड नोटमध्ये कर्जदारांची मागितली माफी

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.