Kalyan: कल्याणमध्ये राष्ट्रवादी पदाधिकाऱ्याच्या कार्यालयावर हल्ला, घटना सीसीटीव्हीत कैद
काही महिन्यापूर्वी शमीम शेख यांच्या पुतण्यावर काही तरुणांनी प्राणघातक हल्ला केला होता. यातील काही आरोपींच्या विरोधात कारवाई केली होती. या गोष्टीचा राग मनात धरुन शेख यांच्या कार्यालयावर हल्ला झाला असल्याचे आहे.
कल्याण : राष्ट्रवादी पदाधिकाऱ्याच्या कार्यालयावर हल्ला झाल्याची घटना कल्याणमध्ये घडली आहे. शमीम शेख असे या पदाधिकाऱ्याचे नाव असून सीसीटीव्हीच्या सहाय्याने पोलीस हल्लेखोरांचा शोध घेत आहे. या घटनेमुळे एकच खळबळ उडाली आहे. कल्याण पूर्व भागातील सूचकनाका परिसरात राहणारे शमीम शेख हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे कल्याण ग्रामीण सचिव या पदावर कार्यरत आहेत. त्याच्या कार्यालयावर रात्री साडे अकराच्या सुमारास दोन ते तीन तरुणांनी हल्ला केला. या हल्ल्या दरम्यान त्यांच्या कार्यालयातील सीसीटीव्ही कॅमेरे तोडण्यात आले.
काही महिन्यांपूर्वी शेख यांच्या पुतण्यावरही झाला होता हल्ला
काही महिन्यापूर्वी शमीम शेख यांच्या पुतण्यावर काही तरुणांनी प्राणघातक हल्ला केला होता. यातील काही आरोपींच्या विरोधात कारवाई केली होती. या गोष्टीचा राग मनात धरुन शेख यांच्या कार्यालयावर हल्ला झाला असल्याचे आहे. शमीम शेख यांचा आरोप आहे की, पुतण्यावर ज्या लोकांनी हल्ला केला होता. त्यापैकी काही जणांनी माझ्या कार्यालयावर हल्ला केला आहे. मी लवकर घरी निघून गेलो होतो, त्यामुळे बचावलो. या प्रकरणात जे कोणी आरोपी आहेत, ते सीसीटीव्हीत कैद आहेत.
कोळसेवाडी पोलिसांनी या प्रकरणी ठोस कारवाई करावी. याप्रकरणी राष्ट्रवादीच्या काही पदाधिकाऱ्यांनी पोलिस अधिकाऱ्यांना भेटून ठोस कारवाईची मागणी केली आहे. याप्रकरणी काही तरुणांना विरोधात तक्रार दाखल करून कोळसेवाडी पोलिसांनी सीसीटीव्हीच्या सहाय्याने पुढील तपास सुरु केला आहे.
हिस्ट्री शीटरवर कारवाईची नागरिकांची मागणी
कल्याणच्या सूचकनाका परिसरात नेहमी अशा प्रकारच्या घटना घडत असता. पोलिसांनी याकडे गांभीर्याने लक्ष देण्याची गरज आहे. या परिसरात याआधीही अनेक जणांवर अशा प्रकारचे हल्ले झाले आहेत. खडेगोळवली, कैलासनगर या परिसरात पोलिसांनी गस्त वाढविणो आवश्यक आहे. हिस्ट्री शीटर गुन्हेगारांच्या विरोधात ठोस कारवाई झाली पाहिजे, अशी मागणी नागरिकांकडून केली जात आहे. (Attack on NCP office bearer’s office in Kalyan, incident captured on CCTV)
इतर बातम्या