CCTV Video: समोरुन सुपरफास्ट एक्स्प्रेस आली अन् त्यानं थेट उडी घेतली, जवानानं जे केलं त्याला ‘धाडस’ म्हणतात

कुमार गुरुनाथ पुजारी हा उल्हासनगरच्या प्रेमनगर टेकडी भागात राहणारा आहे. आज दुपारी अडीच वाजताच्या सुमारास कुमार पुजारी हा विठ्ठलवाडी रेल्वे स्थानकाच्या प्लॅटफॉर्म क्रमांक 1 वर येऊन उभा राहिला. यावेळी कल्याणहून कर्जतच्या दिशेने जाणारी एक्सप्रेस भरधाव वेगात येताना पाहून कुमार याने अचानक रेल्वे रुळात उडी मारली आणि एक्सप्रेस समोर उभा राहिला.

CCTV Video: समोरुन सुपरफास्ट एक्स्प्रेस आली अन् त्यानं थेट उडी घेतली, जवानानं जे केलं त्याला 'धाडस' म्हणतात
विठ्ठलवाडी रेल्वेस्थानकात एक्सप्रेससमोर उडी घेत तरुणाचा आत्महत्येचा प्रयत्नImage Credit source: Tv9
Follow us
| Updated on: Mar 23, 2022 | 9:08 PM

उल्हासनगर : कौटुंबिक वादातून एका तरुणाने विठ्ठलवाडी रेल्वे स्थानका (Vitthalwadi Railway Station)त एक्प्रेससमोर उडी घेऊन आत्महत्या (Suicide) करण्याचा प्रयत्न केला. तिथे उपस्थित रेल्वे पोलिसाने जीव धोक्यात घालून या तरुणाला रेल्वे रुळातून बाजूला केलं. आज दुपारी अडीच वाजता विठ्ठलवाडी स्टेशनच्या प्लॅटफॉर्म 1 वर घटना घडली आहे. ही संपूर्ण थरारक घटना सीसीटीव्ही (CCTV) कॅमेऱ्यात कैद झाली आहे. कुमार गुरुनाथ पुजारी (18) असे आत्महत्येचा प्रयत्न करणाऱ्या तरुणाचे नाव असून तो प्रेमनगर टेकडी, उल्हासनगर येथे राहणारा आहे. तर ऋषिकेश चंद्रकांत माने असं तरुणाला वाचवणाऱ्या जीआरपी जवानाचं नाव आहे. कौटुंबिक वादविवादातून तरुणाने आत्महत्येचा प्रयत्न केल्याची प्राथमिक माहिती मिळते. (Attempt to commit suicide by jumping in front of express at Vithalwadi railway station)

रेल्वे पोलिसांच्या प्रसंगावधनामुळे तरुण बचावला

कुमार गुरुनाथ पुजारी हा उल्हासनगरच्या प्रेमनगर टेकडी भागात राहणारा आहे. आज दुपारी अडीच वाजताच्या सुमारास कुमार पुजारी हा विठ्ठलवाडी रेल्वे स्थानकाच्या प्लॅटफॉर्म क्रमांक 1 वर येऊन उभा राहिला. यावेळी कल्याणहून कर्जतच्या दिशेने जाणारी एक्सप्रेस भरधाव वेगात येताना पाहून कुमार याने अचानक रेल्वे रुळात उडी मारली आणि एक्सप्रेस समोर उभा राहिला. ही बाब तिथल्या रेल्वे पोलिसांना दिसताच येताच रेल्वे पोलिसांनी तातडीने प्रसंगावधान दाखवत उडी घेतली आणि या तरुणाला रुळातून बाजूला केले. ऋषिकेश चंद्रकांत माने असे या तरुणाला वाचवणाऱ्या रेल्वे पोलिस जवानाचे नाव असून त्यांच्या धाडसाचे यानंतर कौतुक होत आहे. दरम्यान, कुमार पुजारी याने कौटुंबिक वादविवादातून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केल्याची प्राथमिक माहिती रेल्वे पोलिसांनी दिली आहे. याप्रकरणी कल्याण लोहमार्ग पोलीस पुढील तपास करत आहेत. (Attempt to commit suicide by jumping in front of express at Vithalwadi railway station)

इतर बातम्या

Video : नांदेडमध्ये माजी उपसरपंच आणि शालेय शिक्षण समिती अध्यक्षामध्ये फ्री स्टाईल हाणामारी

CCTV | आधी लांबून अंदाज घेतला, नंतर Activa उचलली, वसईतील धाडसी चोरी सीसीटीव्हीत कैद

'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद.