उल्हासनगरात इस्टेट एजंट्सकडून वृद्धेच्या हत्येचा प्रयत्न, एक आरोपी अटकेत दुसरा फरार
इस्टेट एजंट गणेश सोहंदा आणि रवी तलरेजा हे दोन इस्टेट एजंट फ्लॅट विकून देण्याच्या बहाण्याने मधु गोलानी यांच्या घरी आले. यानंतर त्यांनी फ्लॅट बघण्याच्या बहाण्याने मधु गोलानी यांना आतल्या खोलीत नेत मारहाण केली.
उल्हासनगर : घराच्या टोकनचे पैसे परत न केल्याने दोन इस्टेट एजंट्सने एका वृद्ध महिलेवर जीवघेणा हल्ला केल्याची धक्कादायक घटना उल्हासनगरमध्ये घडली आहे. या हल्ल्यात महिला गंभीर जखमी झाली असून तिच्यावर सध्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत. मधु गोलानी असं या हल्ल्यात जखमी झालेल्या 70 वर्षीय वृद्ध महिलेचं नाव आहे. याप्रकरणी पोलिसांनी एका आरोपीला अटक केली असून एक आरोपी फरार आहे. (Attempt to kill old man by estate agents in Ulhasnagar, one accused arrested, another absconding)
नेमकं काय आहे प्रकरण?
मधु गोलानी यांचा उल्हासनगरच्या कॅम्प 4 परिसरातील अलंकार अपार्टमेंटमध्ये सहाव्या मजल्यावर फ्लॅट आहे. हा फ्लॅट त्यांच्या शेजारी राहणारे मधु राणे हे विकत घेणार होते. त्यांनी मधू गोलानी यांना 20 हजार टॅक्स आणि 21 हजार टोकन सुद्धा दिलं होतं. मात्र नंतर हा व्यवहार रखडल्यानं मधू राणे हे मधू गोलानी यांच्याकडे पैसे परत मागत होते. मात्र त्या टोकन म्हणून घेतलेले 21 हजार रुपये परत करण्यास तयार नसल्यानं त्यांच्यात वादही झाले होते.
अशातच इस्टेट एजंट गणेश सोहंदा आणि रवी तलरेजा हे दोन इस्टेट एजंट फ्लॅट विकून देण्याच्या बहाण्याने मधु गोलानी यांच्या घरी आले. यानंतर त्यांनी फ्लॅट बघण्याच्या बहाण्याने मधु गोलानी यांना आतल्या खोलीत नेत मारहाण केली. यानंतर शेअर सर्टिफिकेटची मागणी करत गणेश यानं वृद्ध महिला मधु गोलानी यांना पकडून ठेवलं, तर रवी याने त्यांच्या हाताच्या आणि गळ्याच्या नसा कापत त्यांच्या हत्येचा प्रयत्न केला. त्यानंतर गणेश याने उशीने तोंड दाबून त्यांना मारण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर त्यांच्या तावडीतून सुटका करून घेत मधु या बाल्कनीत गेल्या आणि लोकांचं लक्ष वेधण्यासाठी झाडांच्या कुंड्या खाली फेकल्या. त्यानंतर इमारतीतले लोक मदतीसाठी धावून आल्यानं हे दोन हल्लेखोर पळून गेले.
गंभीर जखमी महिलेवर आयसीयूत उपचार सुरु
दरम्यान, या हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या मधु गोलानी यांच्यावर उल्हासनगरच्या क्रिटिकेअर हॉस्पिटलमध्ये आयसीयूत उपचार सुरू आहेत. हा हल्ला मधु राणे यांनीच घडवून आणल्याचा आरोप जखमी वृद्ध महिला मधु गोलानी यांनी केला आहे. या हल्ल्याप्रकरणी विठ्ठलवाडी पोलिसांनी हत्येच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल करत गणेश सोहंदा याला बेड्या ठोकल्या आहेत. तर रवी तलरेजा हा फरार असून त्याचा शोध सध्या सुरू आहे. याप्रकरणी पोलिसांची प्रतिक्रिया जाणून घेण्याचा प्रयत्न केला असता, पोलिसांनी सध्या या प्रकरणावर काहीही बोलायला नकार दिला आहे. (Attempt to kill old man by estate agents in Ulhasnagar, one accused arrested, another absconding)
Google Meet लवकरच आणत येत आहे नवीन फीचर, मायक्रोफोन आणि कॅमेरा बंद करु शकणार सहभागी होस्टhttps://t.co/4dwL6aDYyS#GoogleMeet |#NewFeature |#Microphone |#Camera
— TV9 Marathi (@TV9Marathi) October 23, 2021
इतर बातम्या
जिच्यावर जिवापाड प्रेम केलं, तिचा अपघात, कोमात असताना विवाह, ब्रिटनमधली अनोखी प्रेमकहाणी
बदलती शेती : मोती लागवडीतून शेतकरी समृध्द, कशी आहे लागवड पध्दत