Ulhasnagar Municipal School : उल्हासनगरात महापालिका शाळांची दुरावस्था, मनसे विद्यार्थी सेनेचा आंदोलनाचा इशारा

उल्हासनगर महापालिकेच्या प्रभाग समिती 1 अंतर्गत बिर्ला गेट परिसरातील तानाजी नगरमध्ये उल्हासनगर महापालिकेची शाळा क्रमांक 23 आणि 26 या दोन शाळा आहेत. या शाळांकडे महापालिकेचं लक्षच नसल्यानं शाळांची अवस्था बिकट झाली आहे.

Ulhasnagar Municipal School : उल्हासनगरात महापालिका शाळांची दुरावस्था, मनसे विद्यार्थी सेनेचा आंदोलनाचा इशारा
उल्हासनगरात महापालिका शाळांची दुरावस्थाImage Credit source: TV9
Follow us
| Updated on: Aug 07, 2022 | 5:51 PM

उल्हासनगर : उल्हासनगरमध्ये महापालिके (Ulhasnagar Municipality)च्या दोन शाळांची सध्या अतिशय बिकट अवस्था झाली आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना अक्षरशः जीव मुठीत घेऊन शिक्षण घेण्याची वेळ आली आहे. शाळेतील सिलिंग कोसळत असून पत्रेही फुटले आहेत. शाळेची इमारत अखेरची घटका मोजत आहे. मात्र महापालिका प्रशासन शाळा (School) दुरुस्त करण्याचे नावच घेताना दिसत नाही. सध्या मान्सून जोरदार बरसत आहे. त्यात शाळेची इमारत जीर्ण होत आली असून यामुळे दुर्घटना (Incident) घडण्याची शक्यता आहे. काही दुर्घटना घडल्यास महापालिका शाळेत शिकत असणाऱ्या विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आहे. त्यामुळं मनसेनं याविरोधात आंदोलनाचा इशारा दिला.

विद्यार्थ्यांना जीव मुठीत घेऊन शिक्षण घ्यावं लागतंय

उल्हासनगर महापालिकेच्या प्रभाग समिती 1 अंतर्गत बिर्ला गेट परिसरातील तानाजी नगरमध्ये उल्हासनगर महापालिकेची शाळा क्रमांक 23 आणि 26 या दोन शाळा आहेत. या शाळांकडे महापालिकेचं लक्षच नसल्यानं शाळांची अवस्था बिकट झाली आहे. शाळेच्या आवारात महापालिकेचं भंगार साहित्य पडलं आहे. वर्गांमध्ये पत्रे फुटलेले असल्याने सिलिंग कोसळलेल्या अवस्थेतच आहेत. पिण्यासाठी पाण्याची व्यवस्था नाही. अशा परिस्थितीत विद्यार्थ्यांना जीव मुठीत घेऊन शिक्षण घ्यावं लागतंय. शाळेतील या समस्या महापालिकेनं लवकरात लवकर सोडवल्या नाहीत, तर मनसे स्टाईलने आंदोलनाचा इशारा मनसेचे शहर संघटक मैनुद्दीन शेख आणि मनसे विद्यार्थी सेनेचे शहर उपाध्यक्ष कल्पेश माने यांनी दिला आहे. त्यामुळं महापालिका या शाळांकडे लक्ष देते का? हे आता पाहावं लागणार आहे. (Bad condition of municipal schools in Ulhasnagar, MNS Vidyarthi Sena warns of agitation)

हे सुद्धा वाचा

Suresh Dhas : 'आरोपींचा तेरे नाम झाला पाहिजे', सुरेश धस यांचा आक्रोश
Suresh Dhas : 'आरोपींचा तेरे नाम झाला पाहिजे', सुरेश धस यांचा आक्रोश.
सुरेश धस अजितदादांच्या भेटीला, राजकीय घडामोडींना वेग; भेटीत काय चर्चा?
सुरेश धस अजितदादांच्या भेटीला, राजकीय घडामोडींना वेग; भेटीत काय चर्चा?.
'माझ्यापेक्षा जास्त अभ्यास असणाऱ्यांना...', पंकजा मुंडेंचं खोचक उत्तर
'माझ्यापेक्षा जास्त अभ्यास असणाऱ्यांना...', पंकजा मुंडेंचं खोचक उत्तर.
एसटी महामंडळात फ्री स्टाइल हाणामारी, दोन कंडक्टर आले आमने-सामने....
एसटी महामंडळात फ्री स्टाइल हाणामारी, दोन कंडक्टर आले आमने-सामने.....
फडणवीस, दादा नव्हे, या नेत्यामुळे मनसेची महायुतीसोबतची युती फिस्कटली?
फडणवीस, दादा नव्हे, या नेत्यामुळे मनसेची महायुतीसोबतची युती फिस्कटली?.
दिल्ली विधानसभा निवडणुकीचं बिगुल वाजलं, कधी होणार मतदान अन् निकाल कधी?
दिल्ली विधानसभा निवडणुकीचं बिगुल वाजलं, कधी होणार मतदान अन् निकाल कधी?.
बांगलादेशी बनला रत्नागिरीकर... शिरगाव ग्रामपंचायतीला पोलिसांची नोटीस
बांगलादेशी बनला रत्नागिरीकर... शिरगाव ग्रामपंचायतीला पोलिसांची नोटीस.
महाराष्ट्राची चिंता वाढली;7 वर्षीय मुलासह 13 वर्षीय मुलीला HMPVची लागण
महाराष्ट्राची चिंता वाढली;7 वर्षीय मुलासह 13 वर्षीय मुलीला HMPVची लागण.
मुडेंनी राजीनामा दिला? राजीनाम्याच्या प्रश्नावर म्हणाले, 'योग्य वेळी'
मुडेंनी राजीनामा दिला? राजीनाम्याच्या प्रश्नावर म्हणाले, 'योग्य वेळी'.
HMPV Virus : तुम्हाला 'ही' लक्षणं दिसताच सावध व्हा अन् अशी घ्या काळजी
HMPV Virus : तुम्हाला 'ही' लक्षणं दिसताच सावध व्हा अन् अशी घ्या काळजी.