Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

अक्षय शिंदे एन्काऊंटर… पोलिसांची पहिली पत्रकार परिषद; कोणत्या गोष्टींचा खुलासा?

आता याप्रकरणी पहिल्यांदाच पोलिसांनी पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांनी नेमकं काय घडलं? याबद्दलचा खुलासा केला.

अक्षय शिंदे एन्काऊंटर... पोलिसांची पहिली पत्रकार परिषद; कोणत्या गोष्टींचा खुलासा?
Follow us
| Updated on: Sep 24, 2024 | 2:41 PM

Akshay Shinde Encounter Case Update : बदलापूर अत्याचार प्रकरणामधील आरोपी अक्षय शिंदेचा पोलिसांकडून एन्काऊंटर झाला. आरोपी अक्षय शिंदेने पोलिसांची रिव्हॉल्वर हातात घेऊन पोलिसांवर गोळीबार केला. यात दोन पोलीस जखमी झाले. पोलिसांनी स्व:संरक्षणासाठी केलेल्या गोळीबारात आरोपी अक्षयचा मृत्यू झाला. या प्रकरणी आता विविध आरोप-प्रत्यारोप सुरु आहेत. आता याप्रकरणी पहिल्यांदाच पोलिसांनी पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांनी नेमकं काय घडलं? याबद्दलचा खुलासा केला.

अक्षय शिंदे एन्काऊंटरप्रकरणी ठाणे पोलीस आयुक्तालयाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक शैलेश साळवी यांनी एक पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेत त्यांनी याप्रकरणातील अनेक गोष्टींबद्दल खुलासा केला. तसेच सध्या या प्रकरणाचा तपास ठाणे पोलिसांकडून केला जात आहे, असेही पोलिसांनी सांगितले

काल जी घटना घडली आहे, त्याबद्दल एक अपडेट देण्यासाठी मी तुमच्यासमोर आलो आहे. काल बदलापुरातील बाल लैंगिक अत्याचारातील अटक आरोपी अक्षय शिंदे याच्याविरुद्ध बदलापूर पोलीस स्टेशनमध्ये आणखी एक गुन्हा दाखल झाला होता. अक्षय शिंदेंच्या पत्नीने त्याच्या विरुद्ध तक्रार केली होती. याप्रकरणी एक विशेष तपास पथक तयार करण्यात आले होते, अशी माहिती पोलिसांनी पत्रकार परिषदेदरम्यान दिली.

या तपास पथकातील अधिकारी काल न्यायालयाचे ट्रान्सफर वॉरंट घेऊन कायदेशीररित्या आरोपीचा ताबा घेण्यासाठी तळोजा मध्यवर्ती कारागृहात गेले होते. तिथून त्याला घेऊन येत असताना या आरोपीने पोलिसांचे पिस्तुल हिसकावून घेण्याचा प्रयत्न करत असताना जी घटना घडली, त्याबद्दल मुंब्रा पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. नवीन कायद्यानुसार २६२, १३२, १०९, १२१ या कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यात आरोपीच्या मृत्यूनंतर अकस्मात मृत्यू प्रकरण दाखल करण्यात आलं आहे. या दोन्हीही प्रकरणाचा तपास ठाणे पोलीस आयुक्त करत आहेत, असेही ठाणे पोलीस यावेळी म्हणाले.

बड्या बापाच्या लेकाचे भरचौकात अश्लील चाळे, BMW त बसून स्त्रियांसमोरच..
बड्या बापाच्या लेकाचे भरचौकात अश्लील चाळे, BMW त बसून स्त्रियांसमोरच...
पंकजा मुडेंचं रडगाणं, वादग्रस्त वक्तव्यांचा सपाटा,वडेट्टीवारांचा टोला
पंकजा मुडेंचं रडगाणं, वादग्रस्त वक्तव्यांचा सपाटा,वडेट्टीवारांचा टोला.
'माझं बरं वाईट झाल्यास आई अन्...', संतोष देशमुखांच्या मुलीचा जबाब
'माझं बरं वाईट झाल्यास आई अन्...', संतोष देशमुखांच्या मुलीचा जबाब.
'आम्हाला एक खून माफ करा', रोहिणी खडसेंच राष्ट्रपतींना पत्र, उडाली खळबळ
'आम्हाला एक खून माफ करा', रोहिणी खडसेंच राष्ट्रपतींना पत्र, उडाली खळबळ.
'जलयुक्त शिवार-२' ला मान्यता, मुख्यमंत्र्यांची बळीराजासाठी मोठी घोषणा
'जलयुक्त शिवार-२' ला मान्यता, मुख्यमंत्र्यांची बळीराजासाठी मोठी घोषणा.
महाराजांवरून गरळ ओकणाऱ्यांवर राजे भडकले,म्हणाले, '..त्याची नसबंदी करा'
महाराजांवरून गरळ ओकणाऱ्यांवर राजे भडकले,म्हणाले, '..त्याची नसबंदी करा'.
मुंडेंचा राजीनामा तरी विरोधकांकडून घेराव, विधानसभेत माहितीच दिलीच नाही
मुंडेंचा राजीनामा तरी विरोधकांकडून घेराव, विधानसभेत माहितीच दिलीच नाही.
'खोक्या' मालामाल? कारनामे बघाच, सतीश भोसलेच्या नव्या व्हिडीओनं खळबळ
'खोक्या' मालामाल? कारनामे बघाच, सतीश भोसलेच्या नव्या व्हिडीओनं खळबळ.
आरोपी नवनाथ दौंडचा मारहाणीचा आणखी एक व्हिडिओ व्हायरल
आरोपी नवनाथ दौंडचा मारहाणीचा आणखी एक व्हिडिओ व्हायरल.
'.. पण जयंत पाटलांकडून ही अपेक्षा नाही', मुख्यमंत्र्यांनी लगावला टोला
'.. पण जयंत पाटलांकडून ही अपेक्षा नाही', मुख्यमंत्र्यांनी लगावला टोला.