कंपनीतील व्यवस्थापकाला मारहाण, कंत्राट रद्द केल्याचा राग अनावर; लोखंडी रॉडने प्राणघातक हल्ला
व्यवस्थापकानं कंत्राट रद्द केलं. दुसऱ्याला कंत्राट दिलं. याचा राग मनात होता. यातून हा हल्ला करण्यात आला.
डोंबिवली : डोंबिवलीमध्ये राहणारे सुरेंद्र मौर्या हे एमआयडीसी कंपनीत मॅनेजर म्हणून नोकरी करतात. ते 15 फेब्रुवारी रोजी कंपनीतील काम संपवून ते आपल्या मोटरसायकलवरून घरी जात होते. तेवढ्यात काही अज्ञातांनी त्यांच्यावर लोखंडी रॉडने मारहाण करत प्राणघातक हल्ला केला. मारहाणीची घटना सीसीटीव्हीत कैद झाली. या प्रकरणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. या प्रकरणी स्थनिक पोलिसांसह कल्याण गुन्हे शाखा घटक तीनने तपास सुरू केला. कल्याण गुन्हे शाखा घटक तीनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक किशोर शिरसाट यांच्या मार्गदर्शनाखाली दोन टीम बनवून तपास सुरू केला. यातील आरोपी सोनार पाडा येथे येणार असल्याची गुप्त माहिती पोलीस नाईक गुरुनाथ जरग यांना मिळाली.
हे चार आरोपी पोलिसांच्या ताब्यात
सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक मोहन कळमकर यांनी आपल्या पथकासह आरोपी पंकज पाटील, शैलेश राठोड, सुशांत जाधव आणि महेश कांबळे या चौघांना ताब्यात घेतले. यातील आरोपी पंकज पाटील यांचे एमआयडीसी कंपनीत मॅनेजर म्हणून कामाला असणारे सुरेंद्र मौर्या यांनी सदर कंपनीतले फर्निचरचे कंत्राट रद्द केले. इतर कंत्राटदाराला दिले असल्याने राग मनात धरून त्यांच्यावर प्राणघातक हल्ला घडवून आणला असल्याचे पोलीस तपासात उघड झाले आहे.
सीसीटीव्हीत काय?
मारहाणीची ही घटना सीसीटीव्हीत कैद झाली. दुचाकीस्वार व्यवस्थापक जात होता. तेवढ्यात दुसऱ्या दोन दुचाकींनी आलेल्या आरोपींनी त्याला अडवलं. गाडीवरून खाली पारत मारहाण केली. लोखंडी रॉडने मारहाण करण्यात आली. चौघांनी या व्यवस्थापकास मारहाण केली. एका बाजूला व्यवस्थापक आणि दुसऱ्या बाजूला गाडी पडली होती. मारहाण करून झाल्यानंतर आरोपी पसार झाले. ही घटना सीसीटीव्हीत कैद झाली. त्यामुळे आरोपींना अटक करणे पोलिसांना सोपे गेले.
नेमकं काय घडलं?
व्यवस्थापकानं कंत्राट रद्द केलं. दुसऱ्याला कंत्राट दिलं. याचा राग मनात होता. यातून हा हल्ला करण्यात आला. अशी माहिती पुढं आली आहे. लोखंडी रॉडने मारहाण करण्यात आल्याने व्यवस्थापकाला रुग्णालयात दाखल करण्यात आले.