Bhiwandi : भिवंडीत जवळपास 900 इमारती धोकादायक! कारवाई किती इमारतींवर? माहितीच नाही!

गेल्या काही दिवसांत भिवंडीतील काही घरांची पडझड झाली. आजमी नगर इथं एक मजली घराचा काही भाग कोसळला होता. दोन दुर्घटनांमध्ये एकाचा जीव गेला होता

Bhiwandi : भिवंडीत जवळपास 900 इमारती धोकादायक! कारवाई किती इमारतींवर? माहितीच नाही!
धोकादायक इमारतींचा प्रश्न ऐरणीवरImage Credit source: TV9 Marathi
Follow us
| Updated on: May 11, 2022 | 9:49 AM

भिवंडी : भिवंडीतील (Bhiwandi News) जवळपास 900 इमारती धोकादायक अवस्थेत असल्याची आकडेवारी समोर आली. या पार्श्वभूमीवर इमारतींना नोटीस बजावण्याच आल्या आहेत. आगामी पावसाळ्याच्या पार्श्वभूमीर 894 इमारती धोकादायक (Dangerous building) आहेत, अशी माहिती समोर आलीय. भिवंडी महापालिकेकडून (Bhiwandi Municipal corporation) धोकादायक तसंच अतिधोकादायक इमारतींचं सध्या ऑडिट केलं जातंय. झाडाझडती केली जाते आहे. त्या दृष्टीनं आता धोकादायक इमारतींना पालिकेनं नोटीस पाठवली असून खबरदारी घेण्याच्या सूचनाही देण्यात आल्या आहेत. गेल्या वर्षीच्या तुलनेत भिवंडीमधील धोकादायक इमारतींचा प्रश्न कमी झालेला आहे. गेल्या वर्षी धोकादायक इमारतींचा आकडा बाराशेच्या पार गेला होता. आता ही संख्या 900च्या आत आली आहे. मात्र धोकादायक असलेल्या किती इमारती जमीनदोस्त केल्या, याची कोणतीही आकडेवारी पालिका प्रशासनाकडे नसल्याची धक्कादायक बाबही समोर आली आहे. यामुळे पालिकेच्या कारभारावर शंका घेतली जातेय.

भिवंडी जिलानी इमारत दुर्घटनेनं धोकादायक इमारतींचा प्रश्न ऐरणीवर आलेला होता. त्यानंतरही प्रशासन याबाबत गंभीर नाही, अशी बाब धक्कादायक आकडेवारीसून समोर आली आहे. धोकादायक इमारतींवर कारवाई का केली जात नाही, असा प्रश्न यानिमित्तानं उपस्थित केला जातो आहे.

धोका कसा टळणार?

गेल्या काही दिवसांत भिवंडीतील काही घरांची पडझड झाली. आजमी नगर इथं एक मजली घराचा काही भाग कोसळला होता. दोन दुर्घटनांमध्ये एकाचा जीव गेला होता. तर आजादनगर इथं एका घराचा भाग कोसळला होता. यातही एकाचा मृत्यू झालेला. आतापर्यंत दोघांचा जीव घरांची पडझड होऊन गेलाय. मात्र त्यानंतरही धोका कायम असल्याचं आकडेवारीतून समोर आलंय. याप्रकरणी कायमस्वरुपी उपाययोजन करण्याची मागणी स्थानिकांकडून जोर धरतेय.

कुठे किती धोकादायक इमारती?

भिवंडीच्या सी एक सेक्टरमध्ये सर्वाधिक इमारती धोकादायक असल्याचं समोर आलंय. भिवंडीच्या सी एक मध्ये 346, सी दोन ए मध्ये 332, सी दोन बी मध्ये 191 आणि सी थ्रीमध्ये एकूण 25 धोकादायक इमारती असल्याचं समोर आलंय.

पाहा व्हिडीओ : वर्षभरापूर्वी झालेल्या भिवंडी दुर्घेटनेत अनेकांचा बळी

सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.
सैफवर चाकूने 6 वार पण 12 व्या मजल्यावरच्या घरात चोराची एन्ट्री कशी?
सैफवर चाकूने 6 वार पण 12 व्या मजल्यावरच्या घरात चोराची एन्ट्री कशी?.
कराडला कोठडी अन् वकिलांमध्येच जुंपली, कोर्टाबाहेर एकच गदारोळ अन्...
कराडला कोठडी अन् वकिलांमध्येच जुंपली, कोर्टाबाहेर एकच गदारोळ अन्....
वाल्मिक कराडच्या समर्थकांच्या आलं अंगात, महिलांमध्ये घुमतंय कोण?
वाल्मिक कराडच्या समर्थकांच्या आलं अंगात, महिलांमध्ये घुमतंय कोण?.
पंतप्रधान मोदी मुंबईत अन् मंत्री धनंजय मुंडे परळीत... नेमकं कारण काय?
पंतप्रधान मोदी मुंबईत अन् मंत्री धनंजय मुंडे परळीत... नेमकं कारण काय?.
Saif Ali Khan | अभिनेता सैफ अली खानवर चाकू हल्ला, अपडेट्स काय ?
Saif Ali Khan | अभिनेता सैफ अली खानवर चाकू हल्ला, अपडेट्स काय ?.
'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?
'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?.
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्..
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्...
वाल्मिक कराडला कोठडी अन् समर्थकांचा कोर्टाबाहेर एकच गोंधळ
वाल्मिक कराडला कोठडी अन् समर्थकांचा कोर्टाबाहेर एकच गोंधळ.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट, कराडला 7 दिवस पोलीस कोठडी
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट, कराडला 7 दिवस पोलीस कोठडी.