Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Ambernath Shiv Temple : महाशिवरात्रीला अंबरनाथचं शिवमंदिर खुलं ठेवा, भाजपनं राज्यपालांची भेट घेत केली मागणी

अंबरनाथ शहरात तब्बल 962 वर्ष जुनं शिलाहारकालीन प्राचीन शिवमंदिर आहे. या शिवमंदिरात दरवर्षी महाशिवरात्रीला मोठी यात्रा भरते. या यात्रेला अंबरनाथमध्ये 8 ते 10 लाख भाविक येतात. मात्र गेल्या 2 वर्षांपासून कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे महाशिवरात्रीची यात्रा बंद करण्यात आली होती. तर मंदिर सुद्धा जवळपास दीड वर्ष बंद ठेवण्यात आलं होतं.

Ambernath Shiv Temple : महाशिवरात्रीला अंबरनाथचं शिवमंदिर खुलं ठेवा, भाजपनं राज्यपालांची भेट घेत केली मागणी
अंबरनाथचं शिवमंदिर महाशिवरात्रीला बंद
Follow us
| Updated on: Feb 20, 2022 | 5:47 PM

अंबरनाथ : अंबरनाथमधील प्राचीन शिवमंदिर (Shiv Temple) यंदाच्या महाशिवरात्री (Maha Shivratri)ला दर्शनासाठी खुलं ठेवावं, अशी मागणी भाजपनं राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांची भेट घेऊन केली आहे. भाजप शहराध्यक्ष अभिजित गुलाबराव करंजुले यांच्यासह भाजप शिष्टमंडळानं राज्यपालांची भेट घेत ही मागणी केली. राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांची शिष्टमंडळासह भेट घेत त्यांनी याबाबतचं निवेदन दिलं असून या प्रकरणी लक्ष घालण्याची मागणी केली आहे. यावेळी झालेल्या चर्चेत अभिजित करंजुले यांनी प्राचीन शिवमंदिराचा इतिहास आणि त्याची ख्याती राज्यपालांना सांगितली. तसंच महाशिवरात्रीला प्राचीन शिवमंदिरात भाविकांना दर्शन उपलब्ध करून देण्यासाठी निर्णय घेणं गरजेचं असून शासनाचे नियम हे भाविकांच्या श्रद्धेच्या आड येणार नाहीत, याची काळजी घेण्याची मागणी त्यांनी केली. (BJP demands to open Ambernath’s Shiva temple open on Mahashivaratri)

कोरोनामुळे दीड वर्ष बंद आहे शिवमंदिर

अंबरनाथ शहरात तब्बल 962 वर्ष जुनं शिलाहारकालीन प्राचीन शिवमंदिर आहे. या शिवमंदिरात दरवर्षी महाशिवरात्रीला मोठी यात्रा भरते. या यात्रेला अंबरनाथमध्ये 8 ते 10 लाख भाविक येतात. मात्र गेल्या 2 वर्षांपासून कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे महाशिवरात्रीची यात्रा बंद करण्यात आली होती. तर मंदिर सुद्धा जवळपास दीड वर्ष बंद ठेवण्यात आलं होतं. मात्र यावर्षी कोरोनाचा कहर कमी झाल्याने शिवमंदिर भाविकांना दर्शनासाठी खुलं ठेवावं, अशी मागणी भाजपचे अंबरनाथ शहर अध्यक्ष अभिजित करंजुले यांनी राज्यपालांकडे केली आहे. राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनीही यावर सकारात्मक प्रतिसाद दिल्याचं भाजप शहराध्यक्ष अभिजित करंजुले यांनी सांगितलं.

अहमदनगरमध्ये सिद्धिविनायक मंदिरात आज संकष्टी चतुर्थीनिमित्त भाविकांची गर्दी

अष्टविनायकातील एक स्थान असलेल्या अहमदनगरच्या ‘सिद्धटेक’च्या सिद्धिविनायक मंदिरात आज संकष्टी चतुर्थीनिमित्त भाविकांची मांदियाळी पाहायला मिळाली. दिवसभरात सुमारे दीड लाख गणेश भक्तांनी दर्शन घेतलंय. प्रत्येक महिन्यात येणारी संकष्टी चतुर्थी आज रविवारी सुट्टीच्या दिवशी आल्याने नेहमीच्या तुलनेत आज दर्शनासाठी जास्त गर्दी पाहायला मिळाली. (BJP demands to open Ambernath’s Shiva temple open on Mahashivaratri)

इतर बातम्या

Ravindra Chavan : विकासकामांवरुन आमदार रविंद्र चव्हाण यांची खासदार श्रीकांत शिंदेंवर टीका

Kalyan Crime : कल्याणमध्ये दोन तरुणांनी हातात तलवारी नाचविल्याचा व्हिडिओ व्हायरल

सुरक्षा यंत्रणांना चकवा देण्यासाठी अतिरेक्यांनी वापरले कोड नेम
सुरक्षा यंत्रणांना चकवा देण्यासाठी अतिरेक्यांनी वापरले कोड नेम.
टिट फॉर टॅट उत्तर द्यायला हवं; पहलगाम हल्ल्यावर जलील थेट बोलले
टिट फॉर टॅट उत्तर द्यायला हवं; पहलगाम हल्ल्यावर जलील थेट बोलले.
गिरीश महाजन श्रीनगरला रवाना; 4 पार्थिव मुंबईत, 2 पार्थिव पुण्यात येणार
गिरीश महाजन श्रीनगरला रवाना; 4 पार्थिव मुंबईत, 2 पार्थिव पुण्यात येणार.
सैन्याच्या वेशात आले आतंकवादी; खरे सैन्य आल्यावर जे झालं ते..
सैन्याच्या वेशात आले आतंकवादी; खरे सैन्य आल्यावर जे झालं ते...
निष्पाप भारतीयांचा जीव घेणाऱ्या चार नराधमांचा फोटो आला समोर
निष्पाप भारतीयांचा जीव घेणाऱ्या चार नराधमांचा फोटो आला समोर.
सुरक्षा यंत्रणेकडून नराधम दहशतवाद्यांचे स्केच जारी
सुरक्षा यंत्रणेकडून नराधम दहशतवाद्यांचे स्केच जारी.
गृहमंत्री अमित शाह बैसरन खोऱ्यात पोहोचले
गृहमंत्री अमित शाह बैसरन खोऱ्यात पोहोचले.
पहलगाममधील मृत कौस्तुभ गनबोटेच्या काकींना अश्रु अनावर
पहलगाममधील मृत कौस्तुभ गनबोटेच्या काकींना अश्रु अनावर.
भारतीय जवानांकडून 2 दहशतवाद्यांचा खात्मा; मोठा शस्त्रसाठा जप्त
भारतीय जवानांकडून 2 दहशतवाद्यांचा खात्मा; मोठा शस्त्रसाठा जप्त.
हल्ल्यानंतर काय आहे पहलगामची परिस्थिती?
हल्ल्यानंतर काय आहे पहलगामची परिस्थिती?.