भ्रष्टाचार प्रकरणी ठाकरे सरकारचे 20 मंत्री रडारवर, देशमुख, आव्हाड, सरनाईक, परब जेलमध्ये जाणार; किरीट सोमय्यांचा दावा
ठाकरे सरकारमधील 11 नव्हे तर 20 मंत्र्याचे भ्रष्टाचार लवकरच बाहेर येणार असल्याचा गौप्यस्फोट करतानाच अनिल देशमुख, जितेंद्र आव्हाड, प्रताप सरनाईक आणि अनिल परबही जेलमध्ये जातील. (Bjp Leader Kirit Somaiya Alleges Uddhav Thackeray And His 20 Ministers)
ठाणे: ठाकरे सरकारमधील 11 नव्हे तर 20 मंत्र्याचे भ्रष्टाचार लवकरच बाहेर येणार असल्याचा गौप्यस्फोट करतानाच अनिल देशमुख, जितेंद्र आव्हाड, प्रताप सरनाईक आणि अनिल परबही जेलमध्ये जातील. त्यावेळी सर्वांचीच झोप उडेल, असा दावा भाजप नेते किरीट सोमय्या यांनी केला आहे.
किरीट सोमय्या आज पाचपाखाडी येथील केबीपी कॉलेजमध्ये आले होते. यावेळी त्यांनी भाजप कार्यकर्त्यांशी संवाद साधला. यावेळी त्यांना महिला कार्यकर्त्यांनी ठाण्यातील फेरीवाल्यांबाबत प्रश्न विचारले. त्यावर मला हे प्रश्न विचारू नका. मोठे विषय मांडा. ठाकरे सरकारचा भ्रष्टाचार आणि अनधिकृत बांधकामे यावर प्रश्न विचारा, असं सोमय्या म्हणाले. ठाकरे सरकारमध्ये 11 भ्रष्टाचारी नेते आहेत. त्यांच्या भ्रष्टाचाराची माहिती मला कुठून येते हे मी तुम्हाला का सांगू? मला शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेसबाबतचीही माहिती मिलत असते. आता 11 ऐवजी 20 मंत्र्यांची नावे लवकरच पुढे येणार आहेत. मला अनेक ठिकाणाहून फोन येत असतात. उद्या कोण टार्गेट आहे असं विचारलं जात असतं. कोणाचा भ्रष्टाचार बाहेर येणार असं विचारण्यात येतं, असं त्यांनी सांगितलं.
एकाला वर्षावर तर दुसऱ्याला मातोश्रीत लपवलं
यावेळी त्यांनी अनिल देशमुख यांच्यावरही टीका केली. न्यायालयाने देखील त्यांनना हजर राहण्याचे आदेश दिले आहेत. पण ते हजर होत नाही. आघाडी सरकारमधील माजी मंत्री अनिल देशमुख कुठे आहेत? परमबीर सिंग कुठे आहे? एकाला वर्षावर लपवलंय तर दुसऱ्याला मातोश्रीत लपवलं आहे, असा आरोपही त्यांनी केला. अनिल देशमुख जेव्हा तुरुंगात जातील तेव्हा सर्वांची झोप उडेल. जितेंद्र आव्हाड, प्रताप सरनाईक आणि अनिल परबही तुरुंगात जातील असा दावा त्यांनी केला.
आव्हाडांचा वाझे होणार
जितेंद्र आव्हाड यांच्या प्रकरणाची चौकशी सुरू झाली आहे. म्हाडामध्ये वाझे प्रकरण सुरू झाले आहे, असंही ते म्हणाले.
उद्धव ठाकरे यांचे नाईकशी संबध
यावेळी त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवरही टीका केली. उद्धव ठाकरे आणि अन्वय नाईक यांचे संबंध होते. त्याबाबतचे सातबाराचे उतारे समोर ठेवले होते, असं त्यांनी सांगितलं. अनिल परब यांचा रिसॉर्ट बेकायदेशीर होता. तो तोडायचे आदेश ठाकरे सरकारने दिले आहेत. आम्ही कोणाच्या धमकीला घाबरत नाही. आम्ही आमचे काम करतच राहणार. प्रताप सरनाईक यांच्या विहंग गार्डन इमारतींच्या 5 मजले अनधिकृत आहेत. नगर विकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी ते पाडण्याचे आदेश दिले आहेत, असं त्यांनी सांगितलं.
ठाण्यातही मोठा भ्रष्टाचार
ठाण्यात मोठ्या प्रमाणावर भ्रष्टाचार आहे. पण प्रशासन लक्ष देत नाही. असे अनेक विषय आहेत. निवडणुका बघता अनेक समस्या आहे. आम्हाला महाराष्ट्रातील भ्रष्टाचार बाहेर काढायचा आहे. हे पालिका स्तरावरील विषय आहेत. ठाण्यात खड्ड्यांमध्येही भ्रष्टाचार होत आहे. असे अनेक नेते आहेत. त्यांचे भ्रष्टाचार आहेत. ही नावे बाहेर येतीलच, असं त्यांनी सांगितलं.
बुधवारी बारामतीला जाणार
मी कोल्हापूरला जाऊन आलो आहे. अंबाबाईचा आशीर्वाद घेतला आहे. आता मी बुधवारी बारामतील जात आहे, असं त्यांनी सांगितलं.
MahaFast News 100 | महाफास्ट न्यूज 100 | 7 AM | 3 October 2021 https://t.co/8AbKvhwqtw #News #Bulletin
— TV9 Marathi (@TV9Marathi) October 3, 2021
संबंधित बातम्या:
VIDEO: कर्नाटक सरकारचा रिपोर्ट खोटा, आघाडी सरकार गप्प का?; संजय राऊतांचा ठाकरे सरकारला संतप्त सवाल
रामदास कदमांची ऑडिओ क्लिप खरी की खोटी माहीत नाही, पण शिवसेनेत मोठी खदखद: देवेंद्र फडणवीस
(Bjp Leader Kirit Somaiya Alleges Uddhav Thackeray And His 20 Ministers)