उद्धव ठाकरे फक्त स्टंटमन; बुलेट ट्रेनचं काम कोणीही थांबवू शकत नाही: किरीट सोमय्या
उच्च न्यायालय आणि सर्वोच्च न्यायालयाने राज्य सरकारला अनेकदा चपराक लगावली आहे. | Kirit Somaiya
ठाणे: मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) हे केवळ स्टंटमन आहेत. ते बुलेट ट्रेनंच काम रोखू शकत नाहीत, असे वक्तव्य भाजप नेते किरीट सोमय्या (Kirit Somaiya) यांनी केले.काम बंद, हप्ता चालू, ही शिवसेनेची कार्यपद्धती आहे. 13 महिनांच्या काळात उद्धव ठाकरे यांनी फक्त प्रकल्प बंद करण्याचे काम केले आहे, अशी टीका किरीट सोमय्या यांनी केली. (No one stop Bullet train project says BJP leader Kirit Somaiya)
किरीट सोमय्या यांनी गुरुवारी प्रताप सरनाईक यांच्या विहंग गार्डनमध्ये करण्यात आलेल्या अनधिकृत बांधकामाची तक्रार करण्यासाठी ठाणे महानगरपालिका आयुक्तांची भेट घेतली. यानंतर किरीट सोमय्या यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना शिवसेनेवर सडकून टीका केली. उद्धव ठाकरे यांनी सत्तेत आल्यापासून फक्त प्रकल्प बंद करण्याचे काम केले आहे.
उच्च न्यायालय आणि सर्वोच्च न्यायालयाने राज्य सरकारला अनेकदा चपराक लगावली आहे. त्यामुळे मेट्रो किंवा बुलेट ट्रेनचे काम कोणीही थांबवू शकत नाही. उद्धव ठाकरे हे केवळ स्टंटमन आहेत, अशी बोचरी टीका सोमय्या यांनी केली. किरीट सोमय्या यांच्या या टीकेला आता शिवसेनेच्या गोटातून कशाप्रकारे प्रत्युत्तर दिले जाणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
Kirit Somaiya | प्रताप सरनाईकांची विहंग गार्डन बिल्डींग अनधिकृत, लोकांची फसवणूक : किरीट सोमय्या
शिवसेनेने बुलेट ट्रेनविरोधात आणखी एक हत्यार उपसलं
शिवसेनेने ठाण्यातून जाणाऱ्या बुलेट ट्रेनच्या मार्गाला विरोध केला आहे. ठाणे महानगरपालिकेत बुलेट ट्रेनविरोधात ठराव मंजूर करण्यात आला. ठाणे महानगरपालिकेच्या बुधवारी झालेल्या ऑनलाईन सभेत शीळ- डायघर व इतर गावातून जाणाऱ्या बुलेट ट्रेनच्या जागेचा प्रस्ताव सर्वपक्षीयांनी नामंजूर केल्याची माहिती महापौर नरेश म्हस्के यांनी दिली.
मेट्रो कारशेडच्या जागेवर तोडगा काढण्यासाठी उद्धव ठाकरेचं भाजप नेत्यांना चर्चेसाठी आमंत्रण
कांजूरमार्ग येथील प्रस्तावित मेट्रो कारशेडच्या जागेसंदर्भात तोडगा काढण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी भाजप नेत्यांना चर्चेचे आमंत्रण दिले होते. केंद्राने आणि राज्याने एकत्र बसून वाद सोडवला तर जनतेची जागा त्यांच्याच वापरात येईल. मग खेचाखेची का? या बसा आणि चर्चा करा, असे उद्धव ठाकरे यांनी म्हटले होते.
संबंधित बातम्या:
ठाकरे सरकारचे सल्लागार कोण समजत नाही, महाराष्ट्र बुडवायला निघालेत : फडणवीस
मेट्रो कारशेड बुलेट ट्रेनच्या शेजारी हलवा, पर्यावरणप्रेमींच्या प्रस्तावाने भाजपची धाकधूक
Special Report | मेट्रो कारशेड विरुद्ध बुलेट ट्रेन, कोण नाक दाबणार, कुणाचं तोंड उघडणार?
(No one stop Bullet train project says BJP leader Kirit Somaiya)